Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: #Nationalist Sharad Pawar

सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष मतदारांना मुर्ख समजतात, निवडणूक काळात मतदार देखील मुर्ख होतात… आता काय करू…हसु की रडू…

सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष मतदारांना मुर्ख समजतात, निवडणूक काळात मतदार देखील मुर्ख होतात… आता काय करू…हसु की रडू…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण -राज्यात विधानसभा निवडणूकीचे वातावरण तापले आहे. सगळीकडे निवडणूकीचा ज्वर चढला आहे. राज्यात कायम सत्तेत असलेले पक्ष म्हणजे काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे गट हे आहेत. याच पक्षात सर्वाधिक सधन मराठा समाज आहे. त्यांना त्यांची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्न करतात. प्रत्येक निवडणूकीत कोट्यवधी रुपये खर्च करतात. मतदार आणि कार्यकर्ते विकत घेण्याची त्यांची खुमखुमी आजही आहे. जाती जातीत भांडण लावणे, धर्माधर्मात भांडण लावणे हाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम असतो. विकासाच्या मुद्यावर यांची निवडणूक कधीच नसते. कारण तेच आमदार, तेच खासदार असल्याने त्यांनी 5 वर्षात काय दिवे लावले आहेत, ते मतदारांना माहिती असते. त्यामुळे विकासाच्या मुद्यावर निवडणूक न लढविता ते थेट जाती आणि धर्मावर वाता...