Tuesday, March 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: national forum

खडकी व विश्रांतवाडीतील अपराध्यांच्या गैरकृत्यांना वरीष्ठ पोलीसांची संमती… तडीपार व रेकॉर्डवरील गुन्हेगार अवैध धंदयावर रायटर,पंटर म्हणून काम करीत असल्यास त्याचे श्रेय नेमके कुणाला…

खडकी व विश्रांतवाडीतील अपराध्यांच्या गैरकृत्यांना वरीष्ठ पोलीसांची संमती… तडीपार व रेकॉर्डवरील गुन्हेगार अवैध धंदयावर रायटर,पंटर म्हणून काम करीत असल्यास त्याचे श्रेय नेमके कुणाला…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षमतेची पराकाष्ठा करून दखलपात्र अपराधांच्या घटनेसंबंधीची किंवा असे अपराध करण्याच्या बेतासंबंधीची माहिती मिळवणे, ते वरिष्ठांकडे सादर करणे, अपराद्यांना न्यायालयासमोर आणण्यासाठी तसेच अपराधास प्रतिबंध करण्यासाठी सर्वोत्तम अशा कायदा व वरिष्ठांचे आदेश यांच्याशी सुसंगत असलेल्या उपाययोजना करणे आणि गुन्ह्याचा प्रतिबंध व अन्वेषण करण्यासंबंधी मुंबई पोलीस अधिनियमात तरतुदी आहेत. तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने पोलिसांना कायदेशीरपणे दिलेल्या प्रत्येक आदेशिकेचे तत्परतेने पालन करणे, त्याची बजावणी करणे आणि वरिष्ठांनी दिलेल्या आज्ञा सर्व कायदेशीर मार्गाने अमंलात आणणे बाबत सक्त तरतुदी आहे.तथापी खडकी व विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अपराधाचा बेत आणि प्रत्यक्ष अपराध घडत असताना देखील, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कायद्याची व वरिष्ठांच्या आदेशांची अवज्ञा केली ...
गायरान जमीनधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक, 20 जुलैला विधानभवनावर मोर्चा

गायरान जमीनधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक, 20 जुलैला विधानभवनावर मोर्चा

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumराज्यातील गायरान जमीनधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसदर्भात येत्या 20 जुलैला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी राज्यभरातील वंचितनं मोठी तयारी सुरु केली आहे. याच मोर्चाच्या तयारीसाठी वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर मोठी मेहनत घेत आहेत. गुरूवार दि.20 जुलैच्या विधानभवनावरील मोर्चाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळेल. या मोर्चाची जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती सुजात आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. राज्यभरातील गायरानधारकांशी या मोर्चाच्या अनुषंगाने बोलणं सुरू असल्याचे आंबेडकर म्हणाले. गायरानधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी बाळासाहेब आंबेडक यांचे भावनिक नातं आहे. हा प्रश्न गायरानधारकांसाठी जीवन-मरणाचा असल्याचे सुजात आंबेडकर म्हणाले. हंगाम सुरु झाल्...
काल शिवसेना फुटली… आज राष्ट्रवादीत गट पडले, थोडक्यात… सत्ताधारी प्रबळ पक्ष लहान पक्षांना खिळखिळे करतात, फुट पाडतात हेच खरे

काल शिवसेना फुटली… आज राष्ट्रवादीत गट पडले, थोडक्यात… सत्ताधारी प्रबळ पक्ष लहान पक्षांना खिळखिळे करतात, फुट पाडतात हेच खरे

राजकीय
नॅशनल फोरम/अनिरूद्ध शालन चव्हाण…..काल पर्यंत कै. बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील गटातटांवर नेहमी भाष्य करीत असत. काय हे गट… काय हे तट… म्हणून खिल्ली उडवली जात होती. देशातवर स्वातंत्र्यानंतर 60 वर्ष सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने तर नेहमीच रिपब्लिकन पक्षाच्या गटाविषयी गरळ ओकली आहे. परंतु आता बाळासाहेबांची शिवसेना फुटली. त्यात ठाकरे गट, शिंदे गट तयार झाले. पुढे निवडणूकांनतर किती गट पडतील हे सांगताही येणार नाही. आता काल परवा राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, राष्ट्रवादीतही शरद पवार गट आणि अजित दादा पवार गट तयार झाले. काँग्रेस मध्ये देखील उघड फुट न पडतात, अंतर्गत मोठ मोठे गट कार्यरत आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीला या पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांनी भारतीय जनता पार्टीला दोष देण्यात येत आहे. खरं आहे. देश व राज्यातील प्रबळ सत्ताधारी पक्ष हा नेहमीच देशातील व राज्यातील दुब...
बीआरएस आणि वंचित आघाडीला दुर्लक्ष करून चालणार नाही – अजितदादा पवार

बीआरएस आणि वंचित आघाडीला दुर्लक्ष करून चालणार नाही – अजितदादा पवार

राजकीय
नॅशनल फोरम/मुंबई/दि/ प्रतिनिधी/2019 साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवारांना मोठा फटका बसला होता. अशातच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती ( बीआरएस ) या पक्षाने राज्यात हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सूचक इशारा दिला आहे. “बीआरएस आणि वंचित आघाडीला दुर्लक्ष करून चालणार नाही,” असं अजित पवारांनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा षण्मुखानंद सभागृह येथे पार पडला. तेव्हा अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. उद्याच्या निवडणुकीत बीआरएस आणि वंचित बहुजन आघाडीला दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही, हे लक्षात ठेवा. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला फटका बसला आहे. 5 ते 10 ...
पुण्यात तडीपार गुन्हेगारांचा मुक्त संचार ,मध्यरात्रीस खेळ चाले लुटालुटीचा

पुण्यात तडीपार गुन्हेगारांचा मुक्त संचार ,मध्यरात्रीस खेळ चाले लुटालुटीचा

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार आरोपी गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून एमपीडीए व मकोका अन्वये कारवाया केल्या जात आहेत. तथापि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार करण्यात आलेल्या आरोपी गुन्हेगारांचा पुणे शहरात मुक्तपणे संचार असल्याचे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन यांनी केलेल्या कारवाईवरून दिसून आलेले आहे. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील तडीपार आरोपीचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ने केला पर्दाफाश-भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत दिवसा व मध्यरात्री लुटालुटीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. असेच प्रकरण 28 एप्रिल 2023 रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत घडले होते. 28 एप्रिल 2023 रोजी डीपी कलेक्शन समोर चिंतामणी ज्ञानपीठ येथील रोडवर फिर्यादी त्यांची चार चाकी वाहन पार्क करून लघुशंका करण्यासाठी थांबले असता,...
कोरेगाव पार्क मधील वेश्याव्यवसायाला पोलीसांचा वरदहस्त?

कोरेगाव पार्क मधील वेश्याव्यवसायाला पोलीसांचा वरदहस्त?

पोलीस क्राइम
सामाजिक सुरक्षा विभागाची कोरेगाव पार्क मध्ये धडक कारवाई, कलम 370 सह 3,4 व 5 अन्वये कारवाईकोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर वरीष्ठांची एवढी मर्जी कशासाठी? नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कोरेगाव पार्क सारख्या उच्चुभू्र ठिकाणी नेमकं काय चाललं आहे. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे लक्ष आहे की नाही… की या गोरख धंदयात स्थानिक पोलीसांचा वरदहस्त आहे… प्रश्न अनेक असले तरी, कोरेगाव पार्क सारख्या उच्चभू्र ठिकाणी स्थानिक पोलीसांच्या वरदहस्त खेरीज कुणीही असे धाडस करू शकणार नाहीये. कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन हद्दीत आज मसाज पार्लर व स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईवरून दिसून आले आहे. सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने कोरेगाव पार्क परिसरातील, स्पावर छापा टाकुन 3 परदेशी व दोन भारतीय अशा एकुण पिडीत मुलींची सुटका केली आहे. सामाजिक...
महिला-मुलींचा अपव्यापार करणाऱ्यांविरूद्ध पुण्याच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पुढचे पाऊल, पुणे पोलीसांच्या सासुचा कलम 370 बडगा

महिला-मुलींचा अपव्यापार करणाऱ्यांविरूद्ध पुण्याच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पुढचे पाऊल, पुणे पोलीसांच्या सासुचा कलम 370 बडगा

पोलीस क्राइम
वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांविरूद्ध आजीवन कारावासाची शिक्षा नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/गुन्हे करणारा आणि गुन्हे करवुन घेणाऱ्याविरूद्ध कठोर कारवाई करणारे कायदे अस्तित्वात आहेत. परंतु कायदयांच्या परिणामकारक अंमलबजावणी अभावी गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. यामुळेच संपूर्ण देशातील न्यायालयात कोट्यवधीचे कोर्ट केसेस आजही प्रलंबित आहेत. दरम्यान पोलीसांनी कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी केली तर गुन्हे करणारा आणि गुन्हे करवुन घेणाऱ्यांची गुन्हे करण्याची हिंमत होणार नाही. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील सामाजिक सुरक्षा विभागाने महिला व मुलींच्या देहव्यापाराविरूद्ध मागील सप्ताहात जबरी कारवाया केल्यामुळे वेश्याव्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महिला व मुलींच्या देहव्यापाराविरूद्ध अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध अधिनियम अतिशय सक्षम असा कायदा आहे. त्याच बरोबर फौजदारी कायदे व भादविमधील परस्पर पुरक का...
राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका, ते सरड्यासारखे रंग बदलतील : बाळासाहेब आंबेडकर

राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका, ते सरड्यासारखे रंग बदलतील : बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
नॅशनल फोरम/बदलापुर/दि/ प्रतिनिधी/राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका, ते सरड्यासारखे रंग बदलतील असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे. दरम्यान या देशात बदल अपेक्षित असून कर्नाटक मार्ग दाखवून देईल. तसेच 2024 मध्ये बऱ्याच घटना घडतील असंही त्यांनी बदलापुर येथील सभेत वक्तव्य केले आहे.यावेळी ते म्हणाले की, मी कित्येकवेळा सांगितले आहे की, या राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका, हे सरड्यासारखे कधी कलर बदलतील हे सांगता येणार नाही. फुले, शाहू, आंबेडकरांचे नावे हे केवळ एक कलर दाखविण्यासाठी आहे. परंतु यांचा असणारा खरा कलर आत्ता दिसायला लागला आहे. आज जातील की उद्या जातील, की परवा जातील अशी चर्चा आपणांस दिसते. 2024 च्या अगोदर बऱ्याच घटना याच्या अगोदर घडणार आहेत. कदाचित कर्नाटक हा मार्ग दाखवु शकतो. या देशाला बदल अपेक्षित आहे. फक्त बदलाचे शब्द ठरेल आणि त्याचा हुंकार हा पण झाला पाह...
दरोड्याच्या गुन्ह्यातून जामीनावर सुटून ड्रग्जची तस्करी करणाऱ्याला अटक, 4 लाख 24 हजाराचा 21 किलो गांजा जप्त

दरोड्याच्या गुन्ह्यातून जामीनावर सुटून ड्रग्जची तस्करी करणाऱ्याला अटक, 4 लाख 24 हजाराचा 21 किलो गांजा जप्त

पोलीस क्राइम
crime u02cppune पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumदरोडयाच्या गुन्हयातुन नुकताच जामीनावर सुटलेला व अंमली पदार्थाच्या तस्करीत सक्रिय असणाऱ्या गुन्हेगाराला 4 लाख 24 हजार रुपयाच्या 21 किलो 200 ग्रॅम गांजासह केले अंमली पदार्थ विभाग क्र. 2 ने जेरबंद करून त्याच्या विरूद्ध वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आयुक्त, श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदिप कर्णिक यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता तसेच अंमली पदार्थाच्या होणा-या तस्करीवर निर्बंध घालण्याकरीता आदेश दिले होते. त्याअनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक दोन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे, सहा. पोलीस निरीक्षक, शैलजा जानकर व स्टाफ वानवडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार, विशाल दळवी यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम पुणे वानवडी येथील हुतात्मा ...
सामाजिक सुरक्षा विभागाची विमानतळ, हडपसरसह कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत धडक कारवाई,

सामाजिक सुरक्षा विभागाची विमानतळ, हडपसरसह कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत धडक कारवाई,

पोलीस क्राइम
sscellpune शिवाजीनगरात कारवाईसाठी जाणिवपूर्वक दिरंगाई कोण करीत आहे…. पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumपुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा यांनी विमानतळ, हडपसर पोलीस स्टेशनसह कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व बेकायदेशिर मटका जुगार अड्डयांवर कारवाई केली आहे. तीन पोलीस स्टेशन हद्दीतील कारवाईत एकुण 1 लाख 88 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच एकुण 36 इसमांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत दळवी हॉस्पीटलसह इंडिया बुल्स कंपनीजवळील झोपडपट्टीत सुरू असलेल्या मटका जुगार अड्डा, पत्ता क्लबवर कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच शिवाजीनगरातील कारवाई करण्यास पोलीस विभागातील काही कर्मचारी जाणिपूर्वक दिरंगाई करीत असल्याचा आरोप होत आहे. जुगार अड्डयावर छापा टाकुन 24 जणांवर ...