पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील बदल्यांचा तिढा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेतील कनिष्ठ व वरिष्ठ लिपिकांसह अधीक्षक संवर्गातील बदल्यांचे सुप 23 ऑगस्ट रोजी वाजले तरी, बहुतांश सेवक त्यांच्या बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठी तयार नाहीत. पुणे महापालिकेतील बांधकाम, टॅक्स, ऑडीट, अतिक्रमण, आरोग्य, विधी व कामगार ही महत्वाची खाती म्हणून ओळखली जातात. महत्वाची खाती म्हणजे काय तर… क्रिमी खाती म्हणून ओळखली जातात. बक्कळ वरकड पैसा मिळतो. पुणेकर नागरीकांना भीती आणि दम देवून पैसे काढता येतात म्हणून त्याला क्रिमी किंवा महत्वाची खाती म्हटले जाते. पुणे महापालिकेतील प्रत्येक सेवकाला या खात्यात येण्याची ओढ असते. परंतु ह्या बदल्या सहज होत नाहीत, त्यासाठी प्रत्येकाला आयुक्तांचे नाही तर माननियांचे पाय धरावे लागतात. त्यांची सेवा करावी लागते. आता सेवा म्हणजे काय तर… ते सांगतील ती कामे स्वतःचा पदाचा अधिकार वापरून करणे, मग ते कायदेशिर असो की बेकायदेशिर...