
गणेशोत्सवापूर्वी पुणे शहरात लुटा-लूट, कोंढवा, शिवाजीनगर, स्वारगेट व लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत लुटीच्या घटना
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/पुणे शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने कोंबिंग ऑपरेशन केले. त्यात शेकडो गुन्हेगार डिटेक्ट करण्यात आले. असे असताना देखील पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अधिनस्त असलेल्या बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडी, लुटालुटीचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत.
कोंढवा पोलीस स्टेशन -कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील एक 47 वर्षीय नागरिक रा- कोंढवा खुर्द हे कौसरबाग मज्जिद कोंढवा येथे, दोन अनोळखी इसमांनी आपसात संगनमत करून 47 वर्षीय नागरिका जवळ येऊन त्यांना आम्ही पोलीस असल्याचे सांगून, एक ओळखपत्रासारखे असणारे कार्ड फिर्यादीस दाखवून त्यांच्या सोबत अरबी भाषेत बोलून फिर्यादी यांच्याकडे 4000 डॉलर (भारतीय चलनाप्रमाणे 3 लाख 20 हजार रुपये) रोख रक्कम तपासणीसाठी मागून फसवणूक करून घेऊन गेले आहेत. कोंढवा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे अधिक तपास करीत आह...