Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: mumbaipwd

पुण्यातही सार्वजनिक बांधकाम खात्यात 200 कोटींचा गैरव्यवहार… गैरव्यवहारांचे मास्टर माईंड अधीक्षक अभियंता बी एन बहिर?

पुण्यातही सार्वजनिक बांधकाम खात्यात 200 कोटींचा गैरव्यवहार… गैरव्यवहारांचे मास्टर माईंड अधीक्षक अभियंता बी एन बहिर?

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कोविड 19 अर्थात कोरोना महामारीनंतर पुण्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या महारोगाने ग्रासले असल्याचे अनेक प्रकरणावरून समोर आले आहे. तसे राज्यातील सार्वजनिक बांधकाम खात्यातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार ही तर नित्याचीच बाब झाली आहे. परंतु पुण्यात कोरोना महामारीनंतर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या महारोगाची एवढी मोठी लागण झाली आहे की त्याची उड्डाणे कोटीच्या कोटी आहेत. मुंबईतील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इज्जतीची लक्तरे मंत्रालयाच्या वेशीवटर टांगली आहेत. दरम्यान मुंबईत चालू पाच महिन्यात नूतनीकरणाच्या नावाखाली मंत्र्यांच्या बंगल्यावर सुमारे 30 कोटींचा खर्च करण्यात आल्याची बाब समोर आलेली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सर्व विरोधी पक्षाने लावून धरलेली आहे. मंत्र्यांच्या बंगल्यावर 30 कोटींचा खर्च करण्यात आला असून,...