गायरान जमीनधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक, 20 जुलैला विधानभवनावर मोर्चा
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumराज्यातील गायरान जमीनधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसदर्भात येत्या 20 जुलैला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी राज्यभरातील वंचितनं मोठी तयारी सुरु केली आहे. याच मोर्चाच्या तयारीसाठी वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर मोठी मेहनत घेत आहेत.
गुरूवार दि.20 जुलैच्या विधानभवनावरील मोर्चाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळेल. या मोर्चाची जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती सुजात आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. राज्यभरातील गायरानधारकांशी या मोर्चाच्या अनुषंगाने बोलणं सुरू असल्याचे आंबेडकर म्हणाले. गायरानधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी बाळासाहेब आंबेडक यांचे भावनिक नातं आहे. हा प्रश्न गायरानधारकांसाठी जीवन-मरणाचा असल्याचे सुजात आंबेडकर म्हणाले. हंगाम सुरु झाल्...