Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Make a separate budget law for castes/tribes

दलित-आदिवासींवर सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा-सेनेचा दरोडा, घटनात्मक तरतुदी असलेले 30 हजार कोटी रुपये संगनमताने पळविले,

दलित-आदिवासींवर सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा-सेनेचा दरोडा, घटनात्मक तरतुदी असलेले 30 हजार कोटी रुपये संगनमताने पळविले,

सर्व साधारण
sc-st अनु. जाती/ जमातींचा बजेटचा स्वतंत्र कायदा करा पुणे/दि/ नॅशनल फोरम/ राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापन झाले तरी, दलित व आदिवासी अर्थात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या घटनात्मक बजेट तरतुदींवर दरोडा घालण्याचे काम केले आहे. त्यामुळे मागील 20 वर्षात सत्ताधारी असलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा-सेना व महाविकास आघाडी असलेल्या काँग्र्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना यांनी सुमारे 30 हजार कोटी रुपयांवर दरोडा टाकल्याची माहिती राज्याचे माजी सनदी अधिकारी श्री. इ.झेड खोब्रागडे यांनी दिली आहे. त्यांनी नमूद केले आहे की, राज्याचा अर्थसंकल्प 5 ध्येयावर आधारित आहे, सर्व समावेशक आहे हे पहिल्यांदा सांगितले नाही यापूर्वी सुद्धा बजेट भाषणात हेच सांगितले होते. मग बजेट तरतुदींचे काय झाले? खर्च किती आणि कशावर झाला हे सरकारने सांगावे? गेल्या 20 वर्षात सामाजिक न्यायाला प्रत्यक्ष कि...