Saturday, May 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Former Mayor and Senior Advocate

तळेगाव दाभाडे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा उद्या वर्धापन दिन, बाबासाहेबांनी 1947 साली 41 एकर जमीन विद्यापीठ स्थापन करण्यासाठी खरेदी केली होती

तळेगाव दाभाडे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा उद्या वर्धापन दिन, बाबासाहेबांनी 1947 साली 41 एकर जमीन विद्यापीठ स्थापन करण्यासाठी खरेदी केली होती

सामाजिक
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1947 साली वडगाव मावळ व कातवी या ठिकाणी एक मोठे शैक्षणिक संकुल, विद्यापीठ स्थापन करण्यासाठी 41 एकर जागा बंगल्यासह खरेदी केली होती. परंतु भारतीय राज्यघटनेची महत्वाची जबाबदारी बाबासाहेबांवर येवून ठेपल्याने त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. परंतु 26 एप्रिल 2012 रोजी तळेगाव दाभाडे येथील रंजनाताई भोसले, माजी नगराध्यक्षा व ज्येष्ठ विधिज्ञ, मुंबई उच्च न्यायालय यांनी अथक प्रयत्न करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तळेगाव दाभाडे येथील बंगला शोधुन काढला आणि तो सर्वांसाठी खुला केला. आज त्या घटनेला 12 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्याचा 13 वा वर्धापन दिन उद्या तळेगाव दाभाडे, ता. मावळ जि. पुणे येथे संपन्न होत असल्याची माहिती ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. सुरेंद्र जानराव यांनी नॅशनल फोरमला दिली आहे. याबाबत विश्वरत्न डॉ. बाब...