Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: #Eknath Shinde

पवारांनी दुबईतील दाऊदसोबतच्या भेटीबाबत खुलासा करावा; बाळासाहेब आंबेडकरांची मागणी

पवारांनी दुबईतील दाऊदसोबतच्या भेटीबाबत खुलासा करावा; बाळासाहेब आंबेडकरांची मागणी

राजकीय
सन 1988 ते 1991, शरद पवार - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भेट … कशासाठी? नॅशनल फोरम/मुंबई/दि/ प्रतिनिधी/विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुती, महाविकास आघाडी आणि इतर छोट्या पक्षांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप होतानाही दिसत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. शरद पवार यांनी दुबईतील कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम सोबतच्या भेटीबाबत खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, 1988 ते 1991 साली शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. या काळात ते एका दौऱ्यासाठी परदेशात गेले होते. शरद पवार भारतातून लंडनला गेले होते आणि तिथून कॅलिफोर्नियाला जाऊन 2 दिवस थांब...
पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील बदल्यांचा तिढा

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील बदल्यांचा तिढा

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेतील कनिष्ठ व वरिष्ठ लिपिकांसह अधीक्षक संवर्गातील बदल्यांचे सुप 23 ऑगस्ट रोजी वाजले तरी, बहुतांश सेवक त्यांच्या बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठी तयार नाहीत. पुणे महापालिकेतील बांधकाम, टॅक्स, ऑडीट, अतिक्रमण, आरोग्य, विधी व कामगार ही महत्वाची खाती म्हणून ओळखली जातात. महत्वाची खाती म्हणजे काय तर… क्रिमी खाती म्हणून ओळखली जातात. बक्कळ वरकड पैसा मिळतो. पुणेकर नागरीकांना भीती आणि दम देवून पैसे काढता येतात म्हणून त्याला क्रिमी किंवा महत्वाची खाती म्हटले जाते. पुणे महापालिकेतील प्रत्येक सेवकाला या खात्यात येण्याची ओढ असते. परंतु ह्या बदल्या सहज होत नाहीत, त्यासाठी प्रत्येकाला आयुक्तांचे नाही तर माननियांचे पाय धरावे लागतात. त्यांची सेवा करावी लागते. आता सेवा म्हणजे काय तर… ते सांगतील ती कामे स्वतःचा पदाचा अधिकार वापरून करणे, मग ते कायदेशिर असो की बेकायदेशिर… ती ...
PMC PUNE- टॅक्स मध्ये दडलय काय ? खुर्चीसाठी दहा लाखाचा टोल, नव्यांना संधी मिळणार कशी?

PMC PUNE- टॅक्स मध्ये दडलय काय ? खुर्चीसाठी दहा लाखाचा टोल, नव्यांना संधी मिळणार कशी?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात सार्वत्रिक बदली आणि पदोन्नतीचे सनई चौघडा वाजत असतात. यावर्षी देखील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत बदली आणि पदोन्नतीचा सनई चौघडा वाजला. तसं म्हणायला गेल्यास सेवकांच्या पसंती क्रमानुसार व समुपदेशाने बदली केल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात काही क्रिमी खात्यात वर्णी लागावी, म्हणून अनेकांनी माननीयांचे पाय अजून सोडलेले नाहीत. बदल्यांचे आदेश निघाले आहेत, परंतु क्रिमी खात्यातील काही सेवक खुर्ची सोडायला तयार नाहीत. हवं तर पाच लाखावरून दहा लाखाचा टोल घ्या पण मला इथेच राहू द्या, अशी गळ माननीय घातली जात आहे. नको परकेपणा मला तुमची म्हणा, घरच्यावाणी मला वागवा, रात धुंदीत ही जागवा, असं सर्वत्र सुरू आहे. दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभाग प्रमुख पदावर माधव जगताप ...
पुणे महापालिकेत पदांसाठी पैशांचा बाजार भरलाय?

पुणे महापालिकेत पदांसाठी पैशांचा बाजार भरलाय?

शासन यंत्रणा
जो जास्त भ्रष्टाचार करणार, त्यालाच मोठ्या पदावर पदस्थापना मिळणार,मेरिट/गुणवत्तेच्या निव्वळ बाताच मारणार, प्रत्यक्षात थैली किती वजनदार आहे, त्यावरच सर्व अवलंबुन असते. नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाणपुणे महापालिकेत पैशांचा बाजार भरलाय… जो उठतो तो प्रभारी पदभार घेवून त्याच्या सध्याच्या पदापेक्षा मोठ्या पदांवर पदस्थापना घेतल्याचे दिसते. पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागात तर ज्या अभियंत्याला पहिल्या टप्प्यातील पदोन्नती देखील मिळाली नाही, त्याला थेटच प्रभारी उपअभियंता म्हणून पदस्थापना दिली, कालपर्यंत अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका सेवकाला थेटच प्रशासन अधिकारी या पदाचा अनुभव डिलिट मारून त्याला थेट सहायक आयुक्त पदावर बसविले. मागील आठवड्यात उपआयुक्त पदांचा तपशील जाहीर केला, त्यात संदीप कदम, सोमनाथ बनकर, चेतना केरूरे,आशा राऊत यांना थेट महत्वाच्या व मोठ्या पदांवर नियुक्ती दिल्याचे दि...
बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभा- विधानसभा निडणूकीतून हरविणे का आवश्यक आहे…?

बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभा- विधानसभा निडणूकीतून हरविणे का आवश्यक आहे…?

सर्व साधारण
महाराष्ट्रातील 800 पैकी 799 जातींना डोक्यावर घेणे परवडणारे नाही. त्यामुळे ह्यांना जाती- जाती आणि धर्मा धर्मात… हिंदू - मुस्लिम खेळात गुंतवून ठेवून 70 वर्ष सत्ता राखली व आताही पुढील 70 वर्ष आमचेच असतील. विषय प्रवेश -बाळासाहेब आंबेडकर व त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला निवडणूकीतून हरविणे का आवश्यक आहे याचा खालील प्रमाणे उहापोह केला आहे. देशात एकुण 6 हजार जाती आहेत. तर महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटींच्या आसपास असून राज्यात 800 पेक्षा अधिक जाती धर्माचे लोक राहतात. दरम्यान मागील महिन्यांत पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत 800 जातीपैंकी केवळ एकाच जातीचे 31 खासदार निवडणूक आणण्यात आपल्यास यश आले आहे. आता विधानसभेच्या निवडणूका देखील तोंडावर आहेत. त्यातच सध्याच्या विधानसभेत एकाट्या मराठा समाजाचे 190 आमदार आहेत. तर ओबीसींचे 11 आमदार आहेत. एससी/एसटीच्या आरक्षणाच्या 58 आमदार आहेत. दरम्यान बाळासाहेब आंबेडक...