Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Criminal action against illegal day-night pubs

बेकायदेशिर डे-नाईट पब, क्लब वर फौजदारी कारवाई करून जागा सिल करण्याऐवजी… ढाणढाण वाजणाऱ्या साऊंड सिस्टिमवर कारवाई करून,  सामाजिक सुरक्षा विभागाने भिकार कारवाईचा कळस गाठला

बेकायदेशिर डे-नाईट पब, क्लब वर फौजदारी कारवाई करून जागा सिल करण्याऐवजी… ढाणढाण वाजणाऱ्या साऊंड सिस्टिमवर कारवाई करून, सामाजिक सुरक्षा विभागाने भिकार कारवाईचा कळस गाठला

सर्व साधारण
Criminal action against illegal day-night pubs, clubs pune पुणे/दि/ नॅशनल फोरम/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीसांचे आहे. तसचं कायदा आणि सुव्यवस्था मोडीत काढण्याचे, विस्कळीत करण्याचे काम गुन्हेगार करीत आहेत. जर कायदा मोडणाऱ्या गुन्हेगारांच्या तालावर पुण्यातील पोलीस मायकल जॅक्सन सारखा डान्स करीत असतील तर, गुन्हेगारांवर पोलीसांची दहशत राहणार तरी कशी…. गुंडगिरी, दादागिरी करणाऱ्यांवर पोलीसांचा वचक राहणार तरी कसा… आज पुणे शहरातील 32 पोलीस स्टेशन हद्दीत रोजचे रोज गुन्हेगारी टोळ्यांकडून दंगली घडविल्या जात आहेत… खुन, हत्याकांड घडत आहेत… त्यावर कुणाचेच लक्ष नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी जर कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाने राजकीय पुढाऱ्यांसारखे भाषणे ठोकत असतील, कनिष्ठ पोलीस अधिकारी गुन्हेगारांच्या तालावर ठेका धरत असतील तर सर्वसामान्य पुणेकरांनी दाद मागायची त...