पुणे पोलीसांच्या 206 वर्षाच्या काळात प्रथम, पुण्यातील कुख्यात गुन्हेगारी टोळ्या समोरासमोर,मारणे, बोडके, घायवळ ते आंदेकरसह सुमारे 15 टोळ्या आणि 50 उपटोळ्यांसह 267 गुन्हेगारांची पुणे पोलीस आयुक्तालयात परेड
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे पोलीस दलाची स्थापना ब्रिटीश राजवटीत 1818 रोजी झाली. तर महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961 रोजी करण्यात आली. ब्रिटीश राजवटीपासून ते महाराष्ट्र राज्य निर्मितीपर्यंत आणि त्यापासून आज 2024 पर्यंत गुन्हेगारी टोळ्यांची आजपर्यंत कुणीच ओळखपरेड काढली नव्हती. पुण्याचे नव नियुक्त पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी, पुणे पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर पुणे शहरातील सुमारे 15 मुख्य, 50 उपमुख्य टोळ्यांसह सुमारे 267 गुन्हेगारांची ओळख परेड पोलीस आयुक्तालयात काढण्यात आली आहे. पुण्याच्या इतिहासात प्रथमच गुन्हेगारांची अशी ओळख परेड काढण्यात आली आहे. तसेच गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे व्हिडीओ, रिल्स बनवल्यास काय कारवाई केली जाईल याचा अजेंड यावेळी वाचुन दाखविण्यात आला आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच पुण्यातील कुख्यात गुन्ह...