रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार, खडक पोलीसांची धडक कारवाई
khadak police pune
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/रेशनिंगचे सरकारी धान्य, रेशनदुकानदारांकडून काळ्या बाजारातून विकत घेवून त्याची विक्री दौंड तालुक्यात विक्रीसाठी घेवून जाणाऱ्या आरोपींवर खडक पोलीस स्टेशनने धडक कारवाई केली आहे. यात 54 पांढऱ्या पोत्यातील 40 हजार 500 रुपये किंमतीचा तांदळासह तीन लाख रुपयांचा मालवाहतुक टेम्पो जप्त करण्यात आला आहे. ही घटना राजीव गांधी सोसायटी समोर, कासेवाडी भवानी पेठ येथे दुपारी 12.30 वाजता घडली आहे.
गुन्ह्याची हकीकत अशी की, आरोपी 1. जावेद लालु शेख वय-35, रा. कासेवाडी, 2. अब्बास अब्दुल सरकावस वय 34, रा. अशोकनगर कॉलनी कासेवाडी, व 3. इम्रान अब्दुल शेख वय 30 वर्ष रा. गोल्डन ज्युबली कासेवाडी ह्या तीन आरोपींनी वेगवेगळ्या रेशनिंग दुकानदारांकडून माल काळ्या बाजारात विकत घेवून तो एकत्र केला. तो माल अशोक लेलंड कंपनीच्या मालवाहतुक टेम्पोमध्ये भरून केडगाव ता. दौंड जि. पु...