Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Balasaheb Ambedkar blasts name of Modi-Adani in Manipur

1977 ची पुनरावृत्ती होऊ दयायची नसेल, तर आता किमान समान कार्यक्रमावर राजकीय पक्षांनी एकत्र येणे लोकशाहीसाठी आवश्यक

1977 ची पुनरावृत्ती होऊ दयायची नसेल, तर आता किमान समान कार्यक्रमावर राजकीय पक्षांनी एकत्र येणे लोकशाहीसाठी आवश्यक

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/देशात मोदी हटाव, लोकशाही वाचवा म्हणून सर्व विरोधी पक्ष टाहो फोडत आहेत. लहान मोठ्या प्रसार माध्यमांतुन देखील मोदी हटाव ची घोषणा होत आहे. परंतु देशात हे पहिल्यांदाच होत नाहीये. तर यापूर्वी देखील इंदिरा गांधीच्या आणीबाणीनंतर, देशात असंतोष निर्माण झाला होता. त्यावेळी देखील इंदिरा हटाव, लोकशाही बचाव म्हणून सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहे. जनता पार्टीच्या माध्यमातून देशात सर्व विरोधी पक्ष एक झाले होते. परंतु किमान समान कार्यक्रम नसल्यामुळे व वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र आल्यामुळे त्यांच्यात एक वाक्यता राहिली नाही. त्यामुळे जनता पार्टीचे विघटन झाले. चौधरी चरणसिंग देशाचे काही काळ पंतप्रधान राहिले. परंतु पुन्हा इंदिरा गांधी सत्तेत आल्या. पुढे राजीव गांधी व काँग्रेस विरूद्ध देशात वातावरण निर्माण झाल्यानंतर, पुन्हा देशात विरोधी पक्ष एक झाले व त्यांनी राजीव ...
सोन्यापेक्षा महागड्या प्लॅटिनमच्या खाणींसाठी मणिपूरमध्ये, मोदी-अदाणींचं नाव घेत बाळासाहेब आंबेडकरांचा गौप्यस्फोट

सोन्यापेक्षा महागड्या प्लॅटिनमच्या खाणींसाठी मणिपूरमध्ये, मोदी-अदाणींचं नाव घेत बाळासाहेब आंबेडकरांचा गौप्यस्फोट

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/औरंगाबाद/दि/ प्रतिनिधी/मागील तीन महिन्याहून अधिक काळापासून भारताचं ईशान्यकडील राज्य मणिपूमध्ये जातीय हिंसाचार उफाळला आहे. दररोज हिंसाचाराच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत 160 हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. तर हजारो कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. आरक्षणाच्या प्रश्नावरून मणिपूरमध्ये हिंसाचार होत असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मणिपूरमध्ये सोन्यापेक्षा महागडा धातू असणाऱ्या प्लॅटिनमची खाण सापडली आहे. या खाणीचं उत्खनन करण्याचं कंत्राट पंतप्रधान मोदी यांचा जवळचा मित्र गौतम अदाणींना देण्यात आलं आहे. पण मणिपूरमधील आदिवासी हिल काऊन्सिलनं याला विरोध केला आहे. यामुळे मणिपूरमध्ये हिंसाचार घडवला जात आहे, असा खळबळजनक आरोप ॲड. आंबेडकर यांनी केला. ते औरंगाबाद येथे जाहीरसभ...