अमरावतीत काँग्रेस-भाजपाचा जातीय-धार्मिक थयथयाट
राहुल गांधी दिल्लीत राहतात, निवडणूक उत्तर प्रदेशातील अमेठीत व आता देशाचे शेवटचे टोक असलेल्या केरळ मधील वायनाड मध्ये निवडणूक लढवित आहेत, हे काँग्रेसवाल्यांना चालते मग आंबेडकर अमरावतीत का चालत नाहीत…काँग्रेस भाजपाचा कपटी डाव ओळखा
नॅशनल फोरम/अमरावती/दि/राहूल गांधी दिल्लीत राहतात आणि उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा निवडणूकीत उभे राहतात. आता तर अमेठी सोडून ते केरळ मधील वायनाड मध्ये निवडणूकीला उभे राहत आहेत, हे सर्व काँग्रेसवाल्यांना चालते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर हे अमरावती मध्ये उभे राहिल्यानंतर कॉंग्रेसवाल्यांनी थयथयाट सुरू केला आहे. दरम्यान संपूर्ण विदर्भात आंबेडकरी जनतेची प्रत्येक मतदारसंघात मोठी संख्या आहे. स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील भंडारा लोकसभा निवडणूकीत उभे होते. आंबेडकरी घराण्याची व विदर्भाची जवळची नाळ आहे. त्यामुळे आनंदराज आंबेडकर अमरावतीत उ...