Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: 50 lakh Nai for the post of Chief Accounts and Finance Officer

कैलास वाळेकर नियुक्ती प्रकरणांत आयुक्त विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांची सीबीआय, ईडीसह ॲन्टी करप्शन ब्युरो मार्फत चौकशी करा , मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदासाठी 50 लाख नाय, कोट्यवधी रुपयांची उड्डाणे…

कैलास वाळेकर नियुक्ती प्रकरणांत आयुक्त विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांची सीबीआय, ईडीसह ॲन्टी करप्शन ब्युरो मार्फत चौकशी करा , मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदासाठी 50 लाख नाय, कोट्यवधी रुपयांची उड्डाणे…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेतील उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावर कार्यरत असलेले श्री. कैलास वाळेकर हे पुणे महापालिकेच्या सेवेत 2011 साली नेमणूक झाली. परंतु ते रुजु झाले नाहीत. त्यांच्या 16/12/2011 च्या आज्ञापत्रकात अट क्र. 8 मध्ये नमूद आहे की, संबंधित उमेदवार हे आज्ञापत्रकाच्या दिनांकापासून 15 दिवसांचे आत कामावर हजर न झाल्यास त्यांची नेमणूक रद्द समजण्यात येईल असे नमूद केले आहे. तरी देखील श्री. वाळेकर हे रुजु झाले नाहीत. आज्ञापत्रकाच्या चार वर्षानंतर त्यांना पुणे महापालिकेत रुजु करून घेण्यात आले. तथापी वाळेकर यांनी पुणे महापालिका नियमभंग केलेला असतांना देखील तसेच प्रोव्हिबिशन परियड पूर्ण केलेला नसतांना देखील त्यांची सेवा विलोपित करून सेवेत कायम करून घेवून त्यांना थेट टॅक्स विभागात नियुक्ती देण्यात आली आहे. तत्कालिन अति. आयुक्त श्री. राजेंद्र जगताप व उपआयुक्त सामान्य प्रशास...