Monday, March 3 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: सिंहगडरोड पोलीस स्टेशन

पुण्यात मोक्काने शंभरी गाठली, एमपीडीएने देखील अर्धशतक पार केले तरीही पुण्यात गुन्हेगारी सुसाट,थ्री-नाईन-फाईव्ह (395)च्या विशेष ट्रेनमुळे खास पोलीस सुखावुन गेले

पुण्यात मोक्काने शंभरी गाठली, एमपीडीएने देखील अर्धशतक पार केले तरीही पुण्यात गुन्हेगारी सुसाट,थ्री-नाईन-फाईव्ह (395)च्या विशेष ट्रेनमुळे खास पोलीस सुखावुन गेले

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आज बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे 16 डिसेंबर 2022 रोजी पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार तत्कालिन मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून स्वीकारला. अमिताभ गुप्ता यांच्या कार्यकाळापासूनच पुणे शहरात मकोका आणि एमपीडीए कायदयाखालील दाखल गुन्ह्यांचे काऊंटींग सुरू झाले. श्री. गुप्ता यांच्या दोन वर्षाच्या काळात त्यांनी मोक्का व एमपीडीएचे प्रत्येकी शतक काढले होते. मात्र एक वर्षापूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेले श्री. रितेश कुमार यांनी एका वर्षाच्या आत मोक्काची शंभरी गाठली आहे तर एमपीडीए चे तर अर्धशतक पूर्ण करून आता शंभरीकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांविरूद्ध एवढ्या जबरी कारवाया सुरू असतांना देखील पुण्यात गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता भादवीच्या 395 ...
पुण्यात आज गुन्हेगारीचा पाढा चढला…फरासखान्यात तुफान राडा, तर समर्थ मध्ये खंडणी,सिंहगड मध्ये खुनी हल्ला, खडकमध्ये पुर्ववैमनस्यातून दण्णादण्णी तर दत्तवाडी महिलेचा विनयभंग…

पुण्यात आज गुन्हेगारीचा पाढा चढला…फरासखान्यात तुफान राडा, तर समर्थ मध्ये खंडणी,सिंहगड मध्ये खुनी हल्ला, खडकमध्ये पुर्ववैमनस्यातून दण्णादण्णी तर दत्तवाडी महिलेचा विनयभंग…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात शनिवार, रविवार आणि आज सोमवारी देखील गुन्ह्याचा पारा चढलेला होता. फरासखान्यात तुफान राडा, तर समर्थ मध्ये खंडणी,सिंहगड मध्ये खुनी हल्ला, खडकमध्ये पुर्ववैमनस्यातून दण्णादण्णी तर दत्तवाडी मध्ये महिलेच्या विनयभंगाचे प्रकार घडले आहेत. पोलीस आणि कायदयाची भिती कुठच्या कुठे पळून गेली असुन सराईत गुन्हेगारासारखी हाणामारी सुरू होती. पोलीसांनी गुन्हे दाखल केले असले तरी, नागरीकांच्या मनांत पोलीस आणि कायदयाविषयी काही भिती का उरली नाही, यावर विचार मंथन होणे गरजेचे झाले आहे. ऐऽऽ पुढं बघुन जा अस्सं म्हणाला अन्‌‍ कुंभारवाड्यात तुफानी राडा -फरासखाना पोलीस स्टेशन पुणे/फरासखाना पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील व कसबा पेठेतील कुंभारवेस परिसरात एकमेकांचे सख्या शेजाऱ्यात अगदी किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यवासन तुफान हाणामारीत झाले. या प्रकरणी फरासखाना पो...