Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: परंतु पकडलेले सर्व गुन्हेगार हे एस.सी

पोलीसांकडून पुण्यात गैरकायदयाचा कारभार… गुन्हेगारीला जात-धर्म नसतो, परंतु पकडलेले सर्व गुन्हेगार हे एस.सी,एस.टी ओबीसीचे कसे

पोलीसांकडून पुण्यात गैरकायदयाचा कारभार… गुन्हेगारीला जात-धर्म नसतो, परंतु पकडलेले सर्व गुन्हेगार हे एस.सी,एस.टी ओबीसीचे कसे

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीसांकडून गुन्हेगारीचे उदात्तिकरण सुरू आहे काय, पुणे शहर पोलीस हे गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय, गुन्हेगारीला जात किंवा धर्म नसतो, परंतु पकडण्यात आलेले, तडीपार केलेले, मोक्का व एमपीडीए सर्वाधिक संख्येने लावलेले आरोपी गुन्हेगार हे दलित, आदिवासींसह ओबीसी समाजाचेच कसे… त्यातल्या त्यात अनु.जातीतील बौद्ध, मातंग व पारधी समाजाची संख्या अधिक कशी होत आहे, असे प्रश्न घेवून 2 ऑक्टोंबर ( म. गांधी जयंतीपासून) अभियान सुरू केले आहे. तसेच इजी अर्थात सहज पैसे मिळणारे अवैध व बेकायदेशिर धंदयाबाबत उघडपणे आवाज उठविल्यानंतर, त्यात स्वारगेट, पर्वती व सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गैरकायदयाच्या कृत्यांची बाजू मांडण्यात आली आहे. तथापी मागील 10 दिवसात दोन्ही पोलीस स्टेशन मधील एकाही मटका जुगार अड्डे, रमीचे क्लब, खाजगी सावकारी, देहव्यापार, बिल्डर लॉबीसह गोल्ड माफिया...