खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील मोक्का, एमपीडीए व तडीपारीतील गुन्हेगारांना पुणे शहर पोलीसांकडून मटका, जुगार अड्डयांची खिरापत
खडकी पोलीस आणि पाटील इस्टेट झोपडपट्टी म्हणजे मटका, जुगार अड्डे आणि अंमली पदार्थांची बाजारपेठ…
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/(वृत्तविश्लेषण)पुणे शहरात सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्याच्या प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या उद्देशाने काल खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील अजमेर शेख वय 22 वर्ष रा. पाटील इस्टेट झोपडपट्टी शिवाजीनगर पुणे येथील गुन्हेगारावर 78 वी एमपीडीए कायदयानुसार कारवाई करण्यात आली आहे. अजमेर शेख याच्या विरूद्ध मागील 5 वर्षात एकुण 4 गंभीर गुन्हे दाखल होते. तसेच त्याने त्याच्या साथीदारांसह खूनाचा प्रयत्न, घातक हत्याराने दुखापतीसह जबरी चोरी, गंभीर दुखापत, खंडणी, दंगा, बेकायदेशिर हत्यार बाळगणे या सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले असल्याने त्याच्यावर एमपीडीए नुसार कारवाई करून त्याची रवानगी नागपुर कारागृहात केल्याचे पुणे शहर पोलीसांकडून 2 जानेवारीच्या प्रसिद्धी प...