
गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पुणे शहर पोलीस रस्त्यावर उतरले…. वाड्या-वस्त्या, गल्ली-बोळातून पोलीसांचे लेफ्ट- राईट…
पोलीस उपआयुक्त संदीपसिंह गिल यांच्याकडील सर्व पोलीस ठाण्यांची धडक कारवाई….
पुणे/दि/ प्रतिनिधी/natioanl forumदुसऱ्या पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार तिसऱ्या पोलीस स्टेशन हद्दीत येऊन राडा करतात, वाहनांची जाळपोळ, तोडफोड करतात, चौथ्या पोलीस स्टेशन हद्दीत कोयते, तलवारी हवेत फिरवून मस्तवाल गुन्हेगार पोलीसांना आव्हान देत लुटालूट करतात, पुनः हॉटेल फोडले, पेट्रोलपंप लुटला असे गुन्हे देखील कमी नाहीत, तोच अंमली पदार्थांची विक्री, देशी विदेशी दारूची तस्करी, रोजच्या रोज शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या गुन्ह्यांच्या घटना घडत असल्याने, पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्या त्या पोलीस स्टेशन हद्दीत कोंम्बिग ऑपरेशन आणि पेट्रोलिंग वाढविण्याच्या सुचना दिल्यानंतर, आज संपूर्ण पुणे शहरातील पोलीस अक्षरशः रस्त्यावर उतरले आहेत. मध्यवर्ती पुणे ...