खडक पोलीस स्टेशन हद्दीतील अत्यंत कुर, खुनशी व भांडखोर गुन्हेगारास अमरावती कारागृहात केले स्थानबद्ध
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 1 व खडक पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार नजीर सलीम शेख वय 29 रा. काशेवाडी याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वागणूकीत काहीएक फरक पडत नव्हता. तसेच तो अत्यंत कु्रर, खुनशी व भांडखोर असल्याने तो लोकांमध्ये काहीना काही कुरापती काढुन मारहाण करून गुन्हे करीत होता. व्यापाऱ्यांना व बिल्डरांना खंडणी मागणे, नागरीकांना त्रास देवून त्याचे गुन्हेगारी कृत्य करीत असल्याने अखेर खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल माने याबाबत अहवाल पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांचेपुढे सादर करून सराईत गुन्हेगाला अमरावती मध्यवर्ती कारागृहात एमपीडीए कायदयानुसार स्थानबद्ध करण्यात आले आहे.
खडक पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे कृत्य -खडक पोलीस स्टेशन पुणे या गुन्हे अभिलेखावरील सराईत व अट्टल गुन्हेगार नजीर सलीम शेख, वय-22 ...