पुणे/दि/ नॅशनल फोरम/
पोलीस स्टेशन हद्दीत घडलेले गुन्हे आणि त्यांचा तपास ही एक किचकट बाब ठरत आहे. त्यातच स्थानिक पोलिसांना वेगवेगळ्या कामगिरी व बंदोबस्तावर नेमणूक केल्यानंतर, गुन्ह्याच्या तपासासाठी वेळेचे नियोजन करावे लागते. पोलीस स्टेशनकडून कामगिरी करण्यात दिरंगाई झाल्यास, इतर गुन्हे शाखांकडे त्यांचा तपास दयावा लागतो ही एक नित्याची प्रशासकीय प्रक्रिया असली तरी चंदननगर पोलीसांनी देखील हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा कसुन तपास करुन, दोन्ही प्रकरणांतील आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. एका गुन्ह्यात दोन वर्षापासुन पोक्सो व बलात्काराच्या गुन्हयामध्ये ओडीसा येथे फरार असलेल्या आरोपीस बेड्या ठोकल्या असून, दुसऱ्या गुन्ह्यात चंदनाची चोरी करून फरार आरोपीस अटक करून त्याने केलेल्या चार गुन्ह्यांची उकल करण्यात चंदननगर पोलीसांना यश आले आहे.
दोन वर्षापासुन पोक्सो व बलात्काराच्या गुन्हयामध्ये ओडीसा येथे फरार असलेल्या आरोपीस बेड्या ठोकल्या –
चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा भादवि कलम 376 (2) (एन) पोक्सो कायदा कलम 4 (2) 6, 8, 12 अन्वये दिनांक 11/11/2021 रोजी नोंद असलेल्या गुन्हयातील दोन वर्षा पासुन पाहिजे असलेला आरोपी नामे सोन्या ऊर्फे स्वप्निल नागनाथ कांबळे, हा ओडीसा राज्यातील सव्हाईल प्रा.लि. या कंपनीत काम करीत असल्याचे चंदननगर पोलीसांच्या तपासात समोर आले होते. तसेच तो पुणे रेल्वे स्टेशनला येणार असल्याची खात्रीशिर बातमी पोशि 3933 जाधव व पोशि 4352 कोद्रे यांना मिळाल्याने, त्यांनी सदरची माहीती चंदननगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र लांडगे यांना कळविली.
श्री. राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील स्टाफने पुणे रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून फरार असलेला आरोपी नामे सोन्या ऊर्फे स्वप्निल नागनाथ कांबळे, वय 23. व्यवसाय नोकरी, रा. शिवतेजनगर, गणपती मंदीराच्या मागे, हिंजवडी पुणे यास ताब्यात घेतले असून, त्यास चंदननगर पोलीस स्टेशन येथे आणुन चंदननगर पोलीस स्टेशन भादवि कलम 376 (2) (एन) बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) अधि. कलम 4(2),6,8,12 चे तपासकामी ताब्यात घेणेत आले आहे व पुढील तपास सपोनिरी भगवान कांबळे हे करीत आहेत.
ही कारवाई चंदननगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. जगन्नाथ जानकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. निलेश घोरपडे, पोलीस अंमलदार श्रीकांत शेंडे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, शेखर शिंदे, गणेश हांडगर, शिवाजी धांडे यांनी केलेली आहे.
चंदन चोरास अटक-
चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत डिमोलो सर्व्हिस स्टेशन वडगाव शेरी, पुणे येथुन एक चंदनाचे झाड कशाच्यातरी सहाय्याने कापुन अज्ञात इसमांनी चोरून नेल्याबाबत चंदननगर पोलीस स्टेशने येथे गुन्हा नोंद करणेत आला होता. त्याअनुषंगाने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे तपास करत असताना, दि. 23/02/2023 रोजी चंदन चोरी करणारी टोळी रिवार्डीयल रोड नदी पात्रा लगत झाडा- झुडपां मध्ये चंदनाचे झाड शोधत असुन, त्यांचेकडे एक पांढऱ्या रंगाचे पोते आहेत, त्यामध्ये काहीतरी असल्याची खात्रीशिर माहीती मिळाल्याने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावण्यात आला.
पोलीस स्टाफ असल्याची चाहुल लागताच ते तेथुन पळुन जात असताना, त्यापैकी एक आरोपी सद्दाम बेसमिल्हाद लोद, वय-34 वर्षे, रा. औरंगाबाद यास ताब्यात घेवुन, त्याच्याकडे असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये दोन चंदनाचे झाडाचे खोड हे डिमोलो सर्व्हिस स्टेशन येथुन काल रात्री चोरल्याची कबुली दिल्याने, त्यास दाखल गुन्हयात अटक करून, त्याचेकडे पोलीस कस्टडीत असता अधिक तपास केला असता, त्याने वानवडी पो.स्टे गु.र.नं.84/2023, भादवि कलम 379, 34, चतुःश्रृंगी पो स्टे गु.र.नं. 101/2019 भादवि कलम 379, येरवडा पो. स्टे गु.र.नं. 437 / 2022 भादवि कलम 379 अन्वये गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याचेकडुन एकुण 12,000/-रू किचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक, राजेंद्र लांडगे, चंदननगर पो. स्टे. पुणे शहर, पोलीस निरीक्षक (गुन्हे),जगन्नाथ जानकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, निलेश घोरपडे, पो.उप निरी. अरविंद कुमरे, पोलीस अंमलदार, सचिन रणदिवे, सुहास निगडे, अविनाश संकपाळ, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, शिवा धांडे,नामदेवगडदरे, शेखरशिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, विकास कदम, सुभाष आव्हाड व गणेश हांडगर यांचे पथकाने केली आहे.