Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

श्री सम्मेद शिखर जी, पालीताना आणि गिरनार जी यांना तीर्थ स्थान घोषित करावे : जैन समाजाची मागणी

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
झारखंडमधील पारसनाथ येथे असलेल्या जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरबाबत केंद्र सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. याच निर्णयाप्रमाणे श्री सम्मेद शिखर जी तीर्थ स्थान घोषित करावे अशी मागणी करीत आणखी एक जैन समाजाचे पवित्र स्थान असलेल्या गुजरातमधील पालीताना तीर्थ आणि गिरनार तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात आले आहे, त्यामुळे हेही तीर्थ स्थान म्हणून घोषित करावे अशी मागणी आज आयोजित पत्रकार परिषदेत जैन समाजासाठी कार्यरत राष्ट्रीय पार्श्व भैरव भक्त परिवार संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनोदराज सांकला यांनी केली. पत्रकार परिषदेस अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलनचे नितीन अग्रवाल, अग्रवाल मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अन्ड एज्युकेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश अग्रवाल उपस्थित होते . यांनीही या मागणीस समर्थन दिले.

पुढे विनोदराज सांकला म्हणाले, आमची राष्ट्रीय पार्श्व भैरव भक्त परिवार संस्था देशभरातील जैन समाजाच्या सोबत कार्यरत आहे. याच माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित असतो . आज जी संपूर्ण जैन समाजाची मागणी आहे तीच आम्ही मांडत आहोत .

ज्याप्रमाणे केंद्र सरकाराकडून जैन समाजाचा विचार करून श्री सम्मेद शिखर जी बाबत जो निर्णय घेतला आहे. त्याच सोबत गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील पालिताना मंदिरात काही समाजकंटकांनी तोडफोड केली.  या परिसरात झालेली तोडफोड आणि सुरु असलेले उत्खनन तत्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी जैन समाजाकडून करण्यात येत आहे. तसेच पालिताना येथे चाललेल्या उत्खनन, ठिकाणी सुरु असलेली अवैध मद्यविक्री बंद व्हावी, ही देखील मागणी केली जात आहे.
तसेच गुजरातमधील गिरनार जी तीर्थ क्षेत्र आहे. श्री गिरनार महातीर्थवर अनेक वर्षापासून असामाजिक तत्वांकडून अतिक्रमण व विकास / पर्यटन स्थळाच्या नावाखाली अधीन करण्याचे षड्यंत्र देशात सुरु असून ते बंद व्हावे व जैन समाजाचेतीर्थ क्षेत्राला जैन तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे आणि तीर्थ क्षेत्राच्या आजुबाजूच्या 50 कि.मी. क्षेत्रात मांस-मदिरा विक्री बंदी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच स्थानिक गुंडाकडून अवैध रित्या कब्जा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जैन समाजाच्या लोकांना धमकाविले जात आहे. याकडेही लक्ष केंद्रीत करून जैन समाजाचे तीनही स्थान तीर्थ क्षेत्र घोषित करावे. अशी मागणी यावेळी केली.