Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत 10 ते 15 वर्षांपासून घुटमळणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा…

एकाच खात्याने सोईसाठी बनविलेल्या विभागात बदली म्हणजे, बदलीचा सौदा 5 लाख ते 25 लाख रुपयात मान्य झाल्याचे समजावे…

नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारावर संविधान परिषदेच्या वतीने 91 दिवसांचे हलगी बजाव धरणे आंदोलनाच्या माध्यमातून पुणे महापालिकेच्या महत्वाच्या खात्यात ठाण मांडून बसलेल्यांची पोलखोल अनिरूद्ध चव्हाण यांनी केली होती. तसेच बदलीचा दर 10 लाखापासून ते 50 लाख रुपयांपर्यंत पोहोचला असल्याचे उघडपणे जाहीर सभेत माहिती दिली होती. त्यामुळेच शिवाजीनगर पोलीसांकरवी आमची हलगी वाजविणे बंद करण्यात आले तसेच सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी बेकादेशिरपणे आमचा सभेचा साऊंड उचलुन नेला होता. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला परंतु पुढे दोन महिन्यानंतर, आम आदमी पार्टीसह, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पुणे महापालिकेतील बदली व पदोन्नतीतील लाखोंची बोली आणि कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांवर प्रहार केला. त्यामुळेच खडबडुन जागे झालेल्या प्रशासकांनी पहिल्या फेरीत शेकडो अभियंत्यांच्या बदल्या केल्या. तसेच क्लिरीकल संवर्गातील बदल्यांचा मुहूर्त आज सोमवार दि. 17 एप्रिल रोजी ठेवण्यात आला आहे. यातही सुमारे 650 बदल्या प्रस्तावित आहेत.

पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत 10 ते 15 वर्षांपासून घुटमळणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा –
पुणे महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन, आस्थापना विभाग, बांधकाम विभाग, टॅक्स विभाग, आकाशचिन्ह परवाना विभाग, अतिक्रमण विभाग याच्यासह इतर 8 महत्वांच्या खात्यात ठाण मांडून बसलेल्या लिपिक टंकलेखक, वरीष्ठ लिपिक, उपअधीक्षक, अधीक्षक व प्रशासन अधिकारी यांना तातडीने महापालिकेच्या मुख्य इमारतीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात यावा अशी मागणी होत आहे.
दरम्यान पगाराला एका खात्यात आणि कामाला दुसऱ्या खात्यात अशी बदली अधिनियमांची मोडतोड करणाऱ्या, शिस्तभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे पाऊल उचलणे आवश्यक आहे.

एकाच खात्याने सोईसाठी बनविलेल्या विभागात बदली म्हणजे, बदलीचा सौदा 5 लाख ते 25 लाख रुपयात मान्य झाल्याचे समजावे…
पुणे महापालिकेत बदलींचा भाव काय असतो हे आमच्यासह काँग्रेसने जाहीर केले असल्याने स्वतःची पोलखोल झाल्याने, खडबडुन जागे झालेल्या प्रशासकांनी सार्वजनिक बदल्यांचे सत्र हाती घेतले आहे. परंतु क्लिरिकल आणि खातेप्रमुख हे अतिशय चलाख असून, आपआपल्या सेवकांना ते बाहेर जाऊ देणार नाहीत. त्यासाठी पळवाटा काढल्या जातील यात शंकाच नाही. यापूर्वी देखील ह्याच पळवाटा काढण्यात आल्या आहेत.
उदाहरण दयायचे तर सामान्य प्रशासन विभागात 20 ते 25 सेवक मागील 10 ते 15 वर्षांपासून कार्यरत आहेत. यांची केवळ कागदोपत्री बदली होती. सामान्य प्रशासन विभागाचे 1. आस्थापना विभाग, 2. मागासवर्गीय कक्ष, 3. खातेनिहाय चौकशी असे वेगवेगळे विभाग आहेत. त्यामध्ये बदली दाखविली जाते. किंवा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या कार्यालयात बदली दाखवुन, प्रत्यक्षात पुनः सामन्य प्रशासन, आस्थापना विभागात कार्यरत असतात.
2) सामान्य प्रशासन विभागातील प्रकाश मोहिते हे उपअधीक्षक, अधीक्षक, प्रशासन अधिकारी म्हणून त्याच विभागात यांनी वारंवार पदोन्नती घेतलेली आहे. तसेच मागील पंधरा वर्षांपासून याच खात्यात हे काम करत आहेत. यांच्यासारखेच यांचे सहकारी उपअधीक्षक 1.राजेश उरडे वरिष्ठ लिपिक, 2. योगेश यादव कनिष्ठ लिपिक 3.दिनेश घुमे 4. विजय पवार (अभियंता टेबल) 5.गोवंडे हे बदलीस पात्र आहेत. परंतु सेवकवर्गातील हे सर्व सेवक हे बदली करून टॅक्स, बांधकाम, ऑडिट विभागांमध्ये जातात. त्यामुळे या सेवकांना वॉर्ड ऑफिसला क्षेत्रीय कार्यालयात पाठवण्यात यावे. यांना कुठल्याही स्वरूपात पुणे महानगरपालिका मुख्य इमारत/ मनपा भवन/ मेन बिल्डिंग या ठिकाणी बदली देण्यात येऊ नये. यातील अतिहुशार लोक हे अतिरिक्त आयुक्त , आयुक्त याच खात्यांमध्ये फिरताना दिसतात.
3) त्यानुसार विधी विभागातील 1.गोहर सय्यद, 2.स्वाती साळवी स्टेनो 3.वंदना पाटसकर, 4. अमोल गोलांडे लिपिक हे मागील पंधरा वर्षांपासून याच खात्यामध्ये असून यांनी अनेक केसेस मध्ये व टीडीआर प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार केले असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच याच खात्यात कामास असलेले गोवर्धन साळुंखे (शिपाई) हे पदोन्नती घेऊन कामगार कल्याण मध्ये लिपिक म्हणून काम करत आहेत. यांचीही बदलीची मागणी मुख्य इमारती बाहेर करण्याची विनंती केलेली होती. परंतु त्यांना तेथेच ठेवण्यात आले. याची कारण अस्पष्ट आहे हे आपण समजू शकता.
4)कामगार कल्याण विभागातील ज्योती भोसले स्टेनो या मागील पंधरा वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यामुळे यांची बदली करण्यात यावी. तसेच रेवती थिटे राजापुरे व इतर जे सेवक बदलीस पात्र आहेत त्यांची बदली करण्यात यावी. नितीन कारबळ बिगारी हे मागील 15 ते 20 वर्षापासून याच खात्यात कार्यरत आहे यांचीही बदली करण्यात यावी.
5)पुणे महानगरपालिकेमध्ये खाते प्रमुखांच्या सोयीनुसार वर्ग चारच्या बदल्या करण्यात याव्यात असे कार्यालयीन परिपत्रक काढण्यात आलेले आहे हे अतिशय चुकीचे असून टॅक्स, बांधकाम, सामान्य प्रशासन विभाग, ऑडिट विभाग, विधि विभाग, कामगार कल्याण विभाग येथील वर्ग 4 कामगार यांची तात्काळ बदली करण्यात येऊन.
6)वर्ग एक ते चार या सर्व विभागातील जे सर्व सेवक बदली अधिनियम 2005 नुसार बदलीस पात्र असतील त्या सर्वांची अधिकाऱ्यांसहित सर्व कर्मचाऱ्यांची तात्काळ अन्य खात्यात बदली करण्यात यावी. तसेच अनेक सेवक हे अनेक वर्षांपासून मुख्यमारत बिल्डिंग/ मेन इमारत/ मनपा भवन येथेच कार्यरत आहेत. या सर्वांना वॉर्ड ऑफिसला क्षेत्रीय कार्यालयात पाठविण्यात यावे व क्षेत्रीय कार्यालयातील सेवकांना मुख्य इमारत / मनपा भवन येथे काम करण्याची संधी देण्यात यावी.
7) सामान्य प्रशासन विभाग सर्व नागरिकांची दिशाभूल करीत असून कामगारांचे 20 टक्केच बदली करता येते असे सांगत आहे मुळात म्हणजे मागील 20/20 वर्षांपासून काही कामगारांच्या बदल्या झालेले नसून, काही कामगार मात्र नियमानुसार दर तीन वर्षांना कुठेही वशिला न लावता येईल ते खाते मिळेल ते खाते तेथे काम करत आहे. त्यांच्यावर हा एक प्रकारचा अन्याय होत आहे. त्यामुळे तीन वर्षांपेक्षा जास्त काळ जे सेवक काम करत आहेत त्यांना तात्काळ इतर खात्यांमध्ये बदली करण्यात यावी व पुणे महानगरपालिकेत अनेक खाती अशी आहेत की, जेथे बदली करता येईल. काही सेवक हे फिरून फिरून पुन्हा त्याच खात्यामध्ये कामास येत आहेत, जसे राजेश उरडे (उपाधीक्षक) हे अगोदर सामान्य प्रशासन विभागात त्याच टेबलला काम करत होते व आजही पुन्हा त्याच टेबलला काम करत आहे याचाच अर्थ यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार चालू असून यांची इथं काहीतरी गुपित दडलेली आहेत हे निश्चित आहे.
8) उदाहरण नमुना –
पुणे महापालिकेकडील जकात खाते बंद झाल्यानंतर खालील मनपा सेवकांनी फक्त टॅक्स विभागातच काम केलेले आहे. पगार व कागदोपत्री अन्य खाते दाखऊन प्रत्यक्ष कामास फक्त टॅक्स विभागातच काम केलेले आहे. त्याचप्रमाणे बदलीच्या याद्या बनवताना सामान्य प्रशासन, आस्थापना विभाग व जवळच्या सेवकांची नावे यादीत वरच्या नंबरला घेऊन त्यांना मनासारखी खाती वेळोवेळी पुरवण्यात आलेली आहेत.
वरीष्ठ लिपीक –
कमलेश प्रधान, मोनीष बधे, सचिन बोडके, गजानन नवघणे, सचिन नलावडे, वाघचौरे, पांडुरंग अडसूळ, किशोर दळवी, सुभाष नरसप्पा कांबळे, रवींद्र जगदाळे, सागर शिंदे, अरुण शिंदे, सचिन शिंदे, मच्छिंद्र लोहकरे,
उपअधीक्षक –
कमलाकर काटकर, आनंद केमसे, गिरीष बहिरट, प्रकाश कदम, सुहास महाजन, रासकर प्रदीप,
प्रशासन अधिकारी – राजेश कामठे अशी नावे आहेत.
दरम्यान 2018 पासून जे ग्रामपंचायत सेवक टॅक्स विभागाकडे दिलेले आहेत. त्यातील कोणाचीही बदली अद्याप घेतलेली नाही. आणि त्या सर्व सेवकांना आस्थापना विभागातून श्री योगेश यादव यांच्यामार्फत ते खाते देण्यात आलेले होते. सद्यस्थितीत आस्थापना विभागामध्ये श्री. योगेश यादव हे कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे संबंधित ग्रामपंचायत सेवक त्यांच्या संपर्कात वेळोवेळी असतात. तसेच नव्याने समाविष्ट ग्रामपंचायतीतील सेवकांनाही खाते देण्यासाठी व कायम करण्यासाठी श्री यादव यांची भेट घेण्यास सांगण्यात येतं आहे.
बदल्यांवर नॅशनल फोरमची करडी नजर आहेच. ज्या ठिकाणी घाऊक बाजारात पदे विकली गेली आहेत, त्याचा समाचार पुढील काळात घेतला जाणार आहे.