Friday, January 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

दत्तवाडी- उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत चंदनचोरी,
गुन्हे शाखा युनिट 3 कडून चंदनचोरी करणारी टोळी गजाआड

पुणे/दि/ प्रतिनिधी/ नॅशनल फोरम/
पुणे शहरात चोरी, दरोडा, लुटालुटीच्या घटना घडत असतांना, विविध पोलीस स्टेशन हद्दीत बंदुका, पिस्तुल, घातक शस्त्रास्त्रे पकडली जात आहेत. जेवढी पकडली जात आहेत ती सर्वांना दिसत आहेत, परंतु जी हत्यारे अद्याप पर्यंत जप्त केली नाहीत त्यांची संख्या किती असू शकते याचा अंदाजही कुणी बांधु शकत नाही. चोरट्यांनी आता दरोड्यासह त्यांचा मोर्चा चंदनाच्या झाडकडे वळविला असल्याचे दिसून येत आहे. दत्तवाडी व उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत देखील चंदनाच्या झाडांची चोरी झाली, परंतु गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात दोन्ही पोलीस स्टेशनच्या यंत्रणा निकामी ठरल्या. अशावेळी गुन्हे युनिट शाखा क्र. 3 यांनी पुढे येऊन चंदन चोरांचा छडा लावला आहे. यामध्ये चोरांकडून आणखी पाच गुन्हे उघड झाले आहेत. दत्तवाडी, उत्तमनगर, डेक्कन, बंडगार्डन, वानवडी हद्दीतील चंदनाच्या झाडांची चोरी केल्याच्या गुन्ह्याची कबुली चोरट्यांनी दिली आहे.

दरम्यान अरणेश्वर इंग्लिश मिडीयम स्कुल, सहकार नगर नंबर 2 पुणे येथील शाळेमधील चंदनाचे झाडाची चोरी झालेबाबत दत्तवाडी पोलीस ठाणे , पुणे येथे गुन्हा दाखल असून  भादंविक 37 9 अन्वये गुन्हा नोंद झालेला आहे . तसेच यापुर्वी एन डि ए मध्ये चंदनचोरी झालेबाबत उत्तमनगर पोलीस ठाणे गुन्हा नोंद असून भादंविक 37 9 , 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे . 
सदर गुन्हयांचा समांतर तपास करताना आरोपी नामे अशोक मच्छिद्र तांदळे , वय -30 वर्षे रा . कोल्हेवाडी , ता - हवेली , जि - पुणे यास अटक करून त्याचेकडे केले तपासात एनडीए मधील चंदनाचे झाडाचे खोड त्याचे साथीदाराने कापुन चोरी करुन ते आरोपी अशोक मच्छिद्र तांदळे याचेकडे विकण्यास दिले असता त्याने चोरी केलेले चंदनाचे खोड इसम पाहिजे आरोपी याला विकल्याची माहिती मिळाली.
 त्या माहितीच्या अनुषंगाने पाहिजे आरोपी याचा त्याचे घरी जावून शोध घेता तो मिळून आला नाही . परंतु त्याची पत्नी उषा करडे हिचे कब्जात 85 किलो चंदनाचे लाकुड व एक इलेक्ट्रिक वजन काटा मिळून आल्याने ती जप्त करून उत्तमनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि . नंबर 107/2022 भादंविक 379 , 34 हा उघडकीस आणला आहे . 
सदर गुन्हयाचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार यांना सिहंगड रोडवरील पु.ल. देशपांडे उदयानाजवळ पुणे शहरात चंदनाची झाडे चोरी करणारे इसम हत्यारासह थांबले असल्याची बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावून सापळा रचून बातमीतील इसमांचा शोध घेवून त्यांना सिंहगड रोडवरील पु.ल. देशपांडे उदयानाजवळून ताब्यात घेतले . 
सदर आरोपीची नावे 1 ) लहु तानाजी जाधव वय 32 वर्ष रा . चौफुला चौक , पेट्रोल पंपामागे , धायगुडे वाडी , ता . दौंड , जि . पुणे 2 ) महादेव तानाजी जाधव वय 30 वर्षे रा . सदर 3 ) हनुमंत रमेश जाधव वय 30 वर्षे रा . सदर 4 ) रामदास शहाजी माने वय 28 वर्षे रा . मु.पो. मोडवे खोमणेवस्ती , ता , बारामती जि . पुणे अशी असून त्यांचेकडून चंदनाचे झाड कापण्याकरीता लागणारी हत्यारे त्यामध्ये 3 वाकस , गिरमिट , कु - हाड , रिकामी पोती असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . 
नमुद आरोपीकडे केले तपासात त्यांची चंदनचोरी करणारी टोळी असून ते चंदनाचे झाड कापून त्याचे खोड़ चोरी करून त्याची विक्री पाहिजे आरोपी यांस करीत असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे . आरोपीतांकडून 10 किला चंदनाचे लाकुड व एक करवत असा माल हस्तगत करून त्यांचेकडून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत . 1 ) दत्तवाडी पोलीस ठाणे 1 9 7 / 2022 भा.दं.वि. कलम 37 9 , 34 2 ) डेक्कन पोलीस ठाणेकडील गुन्हा रजि . नंबर 110/2022 भादंविक 37 9 3 ) डेक्कन पोलीस ठाणेकडील गुन्हा रजि . नंबर 87/2022 भादंविक 37 9 4 ) बंडगार्डन पोलीस ठाणे गुन्हा रजि . नंबर 173/2022 भादंविक 37 9 5 ) वानवडी पोलीस ठाणे गुन्हा रजि . नंबर 31 9 / 2022 भादंविक 37 9 एकंदरीत झाले तपासात आरोपीतांकडून 6 गुन्हे उघडकीस आणून एकुण 3.9 1,530 / - रू चा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे . दाखल गुन्हयाचा पुढिल तपास गुंगा जगताप पोलीस उपनिरीक्षक , गुन्हे शाखा युनिट 3. पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट -3 चे प्रभारी अधिकारी , वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अनिता मोरे , पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील , पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप , पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर , राजेंद्र मारणे , रामदास गोणते , शरद वाकसे , किरण पवार , सुजीत पवार ( चालक ) , संजिव कळंबे , प्रकाश कटटे , प्रताप पडवाळ , राकेश टेकावडे , ज्ञानेश्वर चित्ते , दिपक क्षिरसागर , सतिश कत्रांळे , गणेश शिंदे , सोनम नेवसे , भाग्यश्री वाघमारे यांचे पथकाने केली आहे.