नॅशनल फोरम/पुणे/दि/
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील एका दारूच्या दुकानात अजय पांचाळ, तेजस वाडेकर, सोहेल आसंगी, गोविंद लोखंडे, सोन्या कांबळे, अमोल ढावरे यांनी दुकानामध्ये येवुन फिर्यादी व मॅनेजर यांना शिवीगाळ करुन अजय पांचाळ याने फिर्यादी यांचे दुकान मालकांना फोन करुन “ मी अजय पांचाळ असुन मी आताच जेल मधुन बाहेर सुटुन आलोय, तुला आलोय कळत नाही का… हप्ता चालु करायला, हप्ता चालु केला नाही तर तुला सोडणार नाही” अशी धमकी दिली. त्यानंतर वर नमुद सर्वांनी फिर्यादी यांच्या दुकानातील दारुच्या बाटल्या, थंड पेयाच्या बाटल्या, काचेचे ग्लास, दगड फेकुन दुकानातील दारुच्या बाटल्या. टीव्हीचे नुकसान केले.. त्यानंतर अजय पांचाळ याने दुकानातील काऊंन्टर मध्ये असलेले दहा हजार रुपये जबरदस्तीने घेवुन दुकानाचे बाहेर येवुन दगडी फेकुन आरडओरड केली आहे म्हणुन फिर्यादी यांनी दिनांक 24/05/2023 रोजी तक्रार दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर 326 / 2023 भादंवि कलम 385.392.504, 506,427, क्रिमीनल अर्मेन्टमेंन्ट ॲक्ट कलम 19 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, राहुल तांबे, विक्रम सावंत यांचे गोपनीय बातमीदारांचे मार्फेतीने आरोपी 1. सोहेल मोदीन आसंगी, वय 22 वर्षे, रा. इंद्रायणीनगर, आंबेगाव, पुणे 2. अमोल तानाजी ढावरे, वय 19 वर्षे, रा. विश्व हाईटस, जांभुळवाडी रोड, आंबेगाव, पुणे 3. आदित्य ऊर्फे सोन्या खंड कांबळे, वय 20 वर्षे, रा. हनुमाननगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव, पुणे यांचा शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्यांना अटक केली असुन गुन्हयातील विधीसघर्षीत बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, सचिन धामणे, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, राहुल तांबे, विक्रम सावंत, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, नितीन जाधव यांच्या पथकाने केली आहे.