पप्पुभाई, पिंटूभाई, बब्लुभाईचे लाड आता पुरे झाले,
5/6 पोलीस स्टेशन नंतर आता मध्यवर्ती पुणे शहरातील लष्कर, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत कोयता गँगचा धुडगुस,
- अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे एवढे आकर्षण कसे वाढले…
- शहरात कोयते उगारून दशहत माजविण्यामागचा उद्देश काय…
पप्पुभाईच्या नादाला लागाल तर एकेकाला खल्लास करून टाकेन…
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum
पुण्यातील बत्तीस पोलीस स्टेशन पैकी मुंढवा, वानवडी लोणी परिसरात कोयता गँगने दहशत माजविल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात पुनः कात्रज, भारती सिंहगड मधील अल्पवयीनांनी धुडगूस घातला. आता तर मध्यवर्ती पुणे शहरातील लष्कर परिसरात राडा केल्यानंतर, पुन्हा त्याच दिवशी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील जंगली महाराज खाऊ गल्लीत कोयताखोरांनी दहशत माजविली आहे. जिकडे तिकडे कोयता, पालघन आणि हॉकीस्टीक घेवून अल्पवयीनांचा धुडगूस सुरू असतांना, पुणे शहर पोलीस एवढे गप्प कसे… हिवाळी अधिवेशनात कोयता गँगचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर, देखील पुणे शहर पोलीस अद्याप आक्रमक का झाले नाहीत असा सवाल पुणेकर नागरीक व्यक्त करीत आहे. दरम्यान कोयता गँगच्या दहशतीमुळे संपूर्ण पुणे शहर हादरले असून, 32 पोलीस स्टेशन हद्दीत याची लागण होत आहे. त्यामुळे वेळीच कोयता गँगला आवरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
भारतीच्या पोलीसांना जे जमलं, ते इतर पोलीसांना का जमत नाही –
भारती पोलीस स्टेशन लगत असलेल्या सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिंहगड इन्स्टिटयुट जवळ अल्पवयीनांनी हातात कोयते घेवून घुडगूस घातली. भारतीच्या पोलीसांनी वेळेवर येवून एक एकेला साऊथच्या चित्रपटासारखे भर रस्त्यात धु.. धु.. धुतले. याचे सगळीकडे कौतूकही झाले. परंतु इतर पोलीस स्टेशन हद्दीत तुकडे- तुकडे कोयता गँगचा धुडगूस असताना, पोलीसांनी भारती विद्यापीठ पोलीसांसारखे धाडस का दाखविले नाही हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
तसं पहायला गेलं तर भारतीच्या ज्या पोलीसांनी कोयता गँगला धु.. धु.. धुतले, ते पोलीस नवीन भरतीतील आहेत. नव्या दमाचे होते. इतरही पोलीस स्टेशनमध्ये नवीन पोलीसांची भरती केलेली आहे. परंतु त्यांना संधी नसल्याने, त्यांना कदाचित शौर्य दाखविता आले नाही. जुन्या पोलीसांना कायदा माहिती आहे. त्यात मानवाधिकारवाले पुढे आले तर उत्तर देता, देता नाकी नऊ येते. त्यामुळे ही रिस्क साधारण पोलीस घेत नाहीत. परंतु आता कोयता गँगची एवढी दशहत निर्माण झाली आहे की, नियम बाजूला ठेवून, ठोककाम करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
30 दिवसातील 720 तासांपैकी आम्हाला केवळ 72 तास द्या, गुन्हेगारी कमरेतून नाही तर मुळासकट उखडून काढतो-
पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही याबाबत मागील काही दिवसांपासून नॅशनल फोरमध्ये प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर एका पोलीस कर्मचाऱ्याने आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, 30 दिवसात 720 तास होतात. या 720 तासापैकी आम्हाला केवळ 72 तास दया, साऊथचे चित्रपटही पुणे पोलसांपुढे फिक्के पडतील. आम्हाला कारवाई करतांना, बंदूक नको, आणि विशेष म्हणजे मोबाईलही नको. ऐके काळात नेपाळची कुकरी देखील आम्ही गाडून टाकली आहे.
कोयता काय घेवून बसता, गुन्हेगारच काय, खाटकाकडं देखील कोयता पहायला मिळणार नाही. गुन्हेगारांना कमरेतून न्हाई तर मुळासकट उखडून फेकु. महिन्यातील फक्त चारच दिवस… पोलीसांना दया. अशी थेटच गर्जना पोलीसांनी केली आहे. दरम्यान पुणे शहर पोलीसातील वरीष्ठ अधिकारी प्रस्तावावर विचार करणार आहेत की नाही हा संशोधनाचा विषय आहे. परंतु पोलीस गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी तयार असतील तर त्यांना 72 तास दयायला काहीच हरकत नसावी असे वाटते. अट एवढीच आहे की, ॲट द टाईम सापडतील त्यांना ठोककाम करणे, केवळ संशयावरून उचलुन आकडा फुगवू नये एवढीच माफक अपेक्षा आहे.
पप्पुभाईच्या नादाला लागाल तर एकेकाला खल्लास करून टाकेन…
वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीत वैभव उर्फ पप्या ऊकरे वय 24, आशितोष साठे वय 19 व गणेश माने वय 22 वर्ष त्यांच्या 8 ते 9 साथीदारांनी हवेत कोयता फिरवला पप्पुभाई हा इथला भाई आहे, पप्पु भाईच्या नादाला लागाल तर एकेकाला खल्लास करून टाकेन अशी धमकी देवून राडा घातल्या प्रकरणी त्यांच्याविद्ध मोक्का कायदयानुसार कारवाई करण्यात आली आहे. मागील दोन वर्षात मोक्का व एमपीडीए कायदयानुसार प्रत्येकी शतक गाठण्यात आले असून सुमारे 700 गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई केल्याचे पुणे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे. तथापी एवढया मोठ्या संख्येने कारवाई करून देखील अल्पवयीन मुले गुन्हे करण्यात पुढे कशी आली हा प्रश्न आजही अनुत्तरीत राहत आहे. यातुन दोन प्रश्न निर्माण होत आहेत की, 1. अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे एवढे आकर्षण कसे वाढले…
- शहरात कोयते उगारून दशहत माजविण्यामागचा उद्देश काय…
तसेच पुणे शहर पोलीसांबाबत काही प्रश्न उपस्थित झाले आहेत पैकी – - अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे एवढे आकर्षण कसे वाढले…
- शहरात कोयते उगारून दशहत माजविण्यामागचा उद्देश काय…
- मागील एक महिन्यात लष्कर- शिवाजीनगरची आठवी घटना होवून देखील पुणे शहर पोलीस गप्प कसे….
- गुन्ह्यातील आरोपींना 24 तासाच्या आत न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे करण्याचे बंधन असले तरी, कोयत्यासहि अन्य गुन्हे प्रकणांतील अल्पवयीनांना, आता त्याच्या पालक व संपूर्ण कुटूंबियांचे पोलीस स्टेशन मध्ये 48 नव्हे 72 तास समुपदेशन करायला कोणत्या कायदयाची बंधने आहेत….
- मोक्का, एमपीडीए व तडीपार प्रकरणांतील गुन्हेगारांच्या बर्थडे केक तलवारीने कापत असतांना आजपर्यंत पुणे पोलीसांनी सहन केले, आता कोयता सुरू झालं आहे, उदया गावठी बॉम्बफेक केल्यानंतर पप्पुभाईंवर कारवाई होणार आहे काय,
- मोक्का, एमपीडीए गतकालीन पोलीस आयुक्तांनी शतक काढुन नेमकं पुणे शहराची कायदा सुव्यवस्था सुधारली की वधारली…
- गुन्हेगाराला जात (कास्ट) नसते, एस.सी/एस.टी./ओबीसी/ मायनॉरिटजच्या गुन्हेगारांमागे नेमकं डोक कुणाचं आहे… कुणाच्या सांगण्यावरून पोलीस आणि कायदयाला आव्हान देत आहेत…
- मोक्का, एमपीडीए गुन्हे दाखल करून संबंधित गुन्हेगाराला भाई असल्याचं प्रमाणपत्र देत असतांना, त्याच आरोपीला शनिवारवाड्यावर उभं करून 100 मेरी आवाज सुनो चे षटकार काढणे शक्य आहे काय… नसल्यास, भारतीच्या पोलीसांकडून काही धडे गिरविता येतात काय याची तपासणी होणे आवश्यक आहे.
- पोलीस आणि राजकीय पक्षांतील मंडळींचा यामध्ये काही सहभाग आहे काय…
- पुण्यात दरदिवशी भाग 1 ते 5 गंभिर गुन्ह्यांची मोठी मालिका सुरू आहे, शेवटी पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे काय याचेही उत्तर मिळणे अपेक्षित आहे.
कोयता गँग विरोधात पोलीसांच्या बैठका
पुणे शहरात भररस्त्यात कोयते उगारून दहशत माजविणाऱ्यांच्या विरोधात कारवाईसाठी पोलिसांनी व्यूहरचना आखली असल्याचे पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत नमूद केलं आहे. तसेच गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आयुक्तालयस्तरावरील बैठकीत देण्यात आले आहेत. तसेच गेल्या 5 ते 6 वर्षात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारंची यादी तयारकरण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत.
तसेच त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जाणार आहे. अल्पवयीन मुलांबाबत समुपदेशन हा पर्याय असल्याचे नमूद करून येत्या दोन तीन महिन्यात याचे दृष्य परिणाम पहायला मिळतील असा आशावाद देखील पोलीस आयुक्तांनी बोलून दाखविला आहे.
दरम्यान कोयता गँग विरूद्ध पुणे शहर पोलीस आक्रमकपणे कधी भूमिका घेणार आहेत हा प्रश्न देखील अनुत्तरीत आहे. केवळ मोक्का, एमपीडीए, तडीपारीने गुन्हेगारी नियंत्रणात येणार आहे काय हा प्रश्न देखील अनुत्तरी आहेत. मागील पोलीस आयुक्तांनी 700 जणांवर कारवाई करून स्वतःची वाहवा करून घेतली. परंतु त्यात कोयता गँग सारखी नवीन टोळी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये निर्माण झाली हे लक्षात घ्यावे लागेल. एकंदरीत 1. अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे एवढे आकर्षण कसे वाढले… 2. शहरात कोयते उगारून दशहत माजविण्यामागचा उद्देश काय… याचे उत्तर अजूनही अनुत्तरीत आहे.