Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यातील पोलीस स्टेशन व गुन्हे शाखांकडून पुण्यातील अंमली पदार्थांवर धाडी,

राजेश पुराणिकांच्या सोबत हम साथ, साथ है चा 32 पोलीस स्टेशनचा नारा

विमानतळ पोलीस स्टेशनने सराईत गुन्हेगाराकडुन पकडले एक कोटीचे एम.डी. ड्रग्ज
अंमली पदार्थ विभागाकडून बाणेरमध्ये कोट्यवधी रुपयांचे कोकेन-एम.डी. जप्त तर
खंडणी विभागाने वानवडीत पाऊन लाखाचा गांजा केला जप्त

पुणे/दि/ प्रतिनिधी/
सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी संसद व विधीमंडळ कायदयाव्दारे स्थापित, कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करून गुन्हेगार व अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत. दाक्षिणात्य किंवा हिंदी चित्रपटातील हिरोसारखी भूमिका ते प्रत्यक्षात साकारत आहेत. कायदा आणि न्यायालयीन आदेशांच्या अधिन राहून त्यांनी पुणे शहरातील सर्वच प्रकारचे अवैध धंदे, जुगार अड्डे, वेश्याव्यवसाय, ऑनलाईन दरोडेखोरीविरूद्ध रणशिंग फुंकले आहे. त्यातच महाराष्ट्र शासनाचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान करून सरकारची फसवणूक करणाऱ्या ऑनलाईन लॉटरी चालविणाऱ्यांविरूद्ध कठोर भूमिका घेतल्याने, कारवाईचे लोण राज्यभर पसरले आहे. इतकं की राजधानी मुंबईत देखील ऑनलाईन लॉटरी विरूद्ध आवाज उठविला गेला आहे. आता पुणे शहरातील 32 पोलीस स्टेशन आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखांनी, राजेश पुराणिक यांच्या सोबत हम साथ -साथ है चा नारा दिला आहे. त्यामुळे अंमली पदार्थ विभाग, खंडणी विभागांसह विमानतळ, कोरेगाव पार्क व इतर पोलीस स्टेशन यांनी त्यांच्या हद्दीतील अंमली पदार्थांवर धडाधड धाडी टाकून ते अंमली पदार्थ जप्त करण्याचा सपाटा सुरू केला आहे. राजेश पुराणिक यांची दमकार कारवाई पाहून इतरही विभाग कारवाईसाठी पुढे सरसावले असल्याचे दिसून येत आहे.

विमानतळ पोलीस स्टेशन यांनी सराईत गुन्हेगाराकडुन पकडले एक कोटी , सात लाख दहा हजार रुपये किंमतीचे एम.डी. ड्रग्ज –
विमानतळ पोलीस ठाणे कडील तपास पथकातील पोलीस नाईक सचिन जाधव यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की , सिम्बॉयसेस कॉलेज जवळ , विमाननगर , पुणे या ठिकाणी एक इसम अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार आहे . त्याप्रमाणे ही बाब श्री भरत जाधव , वरिष्ठ पोलीस निरीक्षक व श्री . मंगेश जगताप , पोलीस निरीक्षक गुन्हे , विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांना कळविली . मिळालेल्या बातमी मधील ठिकाणी पोलीस निरीक्षक गुन्हे व तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक ढावरे व स्टाफ यांनी सापळा लावुन इसम नाम अरविंद रविंद्र बिऱ्हाडे वय 36 वर्ष रा. राजे संभाजीनगर धान्य मार्केटचे पाठीमागे अमळनेर ता . अमळनेर जि. जळगाव यास पकडले असता त्याचेकडे 1,07,10,000 / – ( एक कोटी सात लाख दहा हजार रुपये ) किंमतीचे 714 ग्रॅम एम.डी. नावाचा अंमली पदार्थ मिळुन आला असुन तो जप्त करण्यात आलेला आहे .
तसेच सदरचा माल कोठून आणला याबाबत तपास चालु असुन नमुद आरोपी यांचेवर खुनाचा प्रयत्न , बलात्कार , खंडणी , जबरी चोरी असे अंमळनेर पोलीस स्टेशन , जिल्हा जळगाव येथे एकुण 07 गुन्हे दाखल असुन , एका खुनाचा प्रयत्न करण्याचे गुन्ह्यामध्ये फरारी आहे .
श्री भरत जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक , विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर व श्री मंगेश जगताप पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) विमानतळ पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रविंद्र ढायरे पोलीस अंमलदार अविनाश शेवाळे , सचिन कदम, सचिन जाधव, प्रदिप मोटे, रुपेश पिसाळ, गिरीष नाणेकर,अंकुश जोगदंडे संजय असवले यांचे पथकाने केली आहे .

खंडणी विरोधी पथक-2 यांनी वानवडी परीसरात गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या इसमासांवर कारवाई-


सहा . पोलीस निरीक्षक चांगदेव सजगने, खंडणी विरोधी पथक 2 गुन्हे शाखा पुणे हे पथकातील स्टाफसह वानवडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना महानगरपालिका विलासराव देशमुख क्रिडा प्रबोधनीचे गेट समोर विठ्ठलराव शिवरकर मार्ग वानवडीगाव पुणे येथे सार्वजनिक ठिकाणी इसम 1 ) सोहेल मोदीन आसंगी वय 21 रा.हेमी गार्डन सोसायटी दत्तनगर जांभुळवाडी कात्रज पुण 2 ) सोनी रविंद्र हिरे वय 21 रा . शनीनगर 3 चाळ खोली नं . 2 जांभुळवाडी रोड कात्रज पुणे यांनी त्यांच्या ताब्यातील होन्डा ॲक्टीव्हा गाडी क्र.एम.एच 12 आर.सी. 6788 हिचे डिकी मध्ये रु .20,000 / – किमतीचा 2 किलो गांजा हा अंमली पदार्थ अनाधिकाराने बेकायदेशीर रित्या जवळ बाळगला असताना मिळुन आले .
तसेच दोन मोबाईल हॅन्डसेट , होन्डा ॲक्टीव्हा मोटारसायकल एकुण रक्कम 45,500 / – असा सर्व मिळुन एकुण रु . 65.500 / – किमतीचा ऐवजासह मिळुन आल्याने पो.हवा . 3125 प्रदीप शितोळे यांनी त्याचे विरुध्द फिर्याद दिल्याने वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. 2 9 1 / 2022 . एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8 ( क) . 20 (ब) ( ब2 9 ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
वरील कारवाई खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे , सहा . पो . निरी . चांगदेव सजगणे , पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण , मोहनदास जाधव , पोलीस अंमलदार विजय गुरव , प्रदिप शितोळे , शैलेश सुर्वे , विनोद साळुंके , राहुल उत्तरकर अनिल मेंगडे , संग्राम शिनगारे सैदोबा भोजराव , सचिन अहिवळे , अमोल पिलाणे , चेतन आपटे , चेतन शिरोळकर , प्रदिप गाडे , किशोर बर्गे , पवन भोसले , रवि सपकाळ , महीला पोलीस अंमलदार आशा कोळेकर , रुपाली कर्णवर यांनी केलेली आहे .

अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून बाणेर येथे नायजेरियन पती – पत्नी कडुन कोटयावधी रुपयांचे कोकेन, एम . डी जप्त


अंमली पदार्थ विरोधी पथक एक गुन्हे शाखे कडे नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नालंदा गार्डन रेसीडन्सी , बाणेर पुणे या ठिकाणी एक नायजेरियन पती पत्नी राहत असुन ते रहाते घरातुन कोकेन एम डी असे अंमली पदार्थाची मोठया प्रमाणावर विक्री करीत आहेत.
नमुद प्रमाणे मिळालेले खबरीचे अनुषंगाने, पोलीस अंमलदार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक , विनायक गायकवाड , सहा.पो. निरीक्षक , लक्ष्मण ढेगळे , शैलजा जानकर यांना कळविली असता त्याबाबत मिळालेल्या बातमीचे ठिकाणी छापा कारवाई करुन , नायजेरियन इसम नामे 1 ) उगुचुकु इम्यॅन्युअल वय 43 वर्षे , रा . नालंदा गार्डन रेसीडन्सी सी विंग फ्लॅट नंब 13 बाणेर पुणे . मुळ नायजेरीया देश व महिला नामे 2 ) ऐनीवेली ओमामा व्हिवान वय 30 वर्षे रा . नालंदा गार्डन रेसीडन्सी सी विंग फ्लॅट नं . 13 बाणेर पुणे मुळ नायजेरीया देश हे बेकायदेशीररित्या विक्रीसाठी 644 ग्रॅम ( एम.डी ) मॅफेड्रॉन कि.रु. 9,660,000 / – व 201 ग्रॅम 120 मिलीग्रॅम कोकेन किरु 30,16,800 / – व रोख रुपये 02,16,000 / – मोबाईल फोन , इलेक्ट्रॉनिक वजन काटा , प्लास्टिक पिशव्या व डब्या असा 02.16.000 / – चा असा एकुण 1,31,08,800 / – ( एक कोटी एकतीस लाख आठ हजार आठशे ) चा अंमली पदार्थ व ऐवज ते रहात असलेल्या घरात अनाधिकाराने बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळुन आले .
त्यांचे विरुध्द एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8 (क). 21(क) , 22 (क) .2 9 अन्वये म.सहा.पो.निरीक्षक , शैलजा जानकर यांनी फिर्याद दिल्याने आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास लक्ष्मण ढेंगळे , सहा. पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक 1 गुन्हे शाखा पुणे शहर हे करीत आहेत .
वरील उल्लेखनीय कामगिरी ही पोलिस आयुक्त , पुणे शहर , श्री अमिताभ गुप्ता , सह पोलीस आयुक्त श्री . संदिप कर्णिक , मा. अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे , मा.पोलीस उप आयुक्त, गुन्हे , श्री . श्रीनिवास घाडगे , मा. सहा. पो आयुक्त , गुन्हे 1. श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली
अंमली पदार्थ विरोधी पथक , 1 गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड, सपोनिलक्ष्मण देंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, मारुती पारधी, मनोज साळुंके , राहुल जोशी, पांडुरंग पवार, विशाल दळवी , संदिप शिर्के , प्रविण उत्तेकर , रेहना शेख , संदेश काकडे , नितेश जाधव , योगेश मोहिते यांनी केली आहे .