Monday, December 30 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे शहर पोलीसः वरीष्ठ पोलीस निरीक्षक बदली- 2024, निवडणूकीची पार्श्वभूमी आणि ललित पाटील प्रकरणानंतर शहरांतर्गत प्रथम मोठ्या बदल्या, शुक्रवारी 15 तर सोमवारी 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
सार्वत्रिक निवडणूका आणि ललित पाटील प्रकरणांतर पुणे शहर पोलीस आयुक्तालयात प्रथम मोठ्या बदल्या केल्या आहेत. शुक्रवार दि. 12 जानेवारी रोजी सुमारे 15 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या. त्यानंतर काल मकरसंक्रातीचे दिवशी सोमवार दि.15 जानेवारी रोजी सुमारे 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. दरम्यान शुक्रवार दि. 12 जानेवारी रोजीच्या बदली आदेशात अंमली पदार्थ विरोधी पथक 1 व 2 मध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची अक्षरशः बोळवण करण्यात आली असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान काही अधिकारी फिल्डवर फिट असतात तर काही अधिकारी हे दरबारी कामातच तरबेज असतात. पुण्यात ललित पाटील प्रकरण झाल्यानंतर विनायक गायकवाड यांची बदली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर आता काही महिन्यानंतर पुन्हा त्यांची बदली दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक क्र. 1 येथे करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक 2 मध्ये कार्यरत असलेले सुनिल थोपटे यांचीही बदली करण्यात आली असून त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 व 2 मध्ये कार्यरत असलेले धडक पोलीस अधिकारी श्री. विनायक गायकवाड व सुनिल थोपटे यांची बोळवण करण्यात आल्याचे दिसून येत आहे. काल झालेल्या 23 बदल्या देखील मोठ्या आहेत.

शुक्रवारच्या बदली यादीनुसार गुन्हे शाखा युनिट क्र. 2 चे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांची बदली दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक येथे करण्यात आली. आता त्यांची बदली गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक 1 येथे करण्यात आली आहे. थोडक्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची वर्ष सव्वा वर्षात बदल्या होतात, काही अधिकाऱ्यांच्या वर्षानुवर्षे बदलीच होत नाही, हे सुत्र नक्की का असते याचे उत्तर आजही शोधून सापडत नाही.

पोलीस आयुक्त कार्यालयाकडून प्रत्येक गुन्हे शाखेकडे त्यांनी केलेल्या कारवाईचा अहवाल मागविला जातो. कारवाया कमी झाल्या तर मासिक बैठकीत खरडपट्टी काढली जाते. चांगली धडक कारवाई केली तर अशी बोळवण केली जाते. अधिकाऱ्यांनी काम करायचे तर कसे करायचे असाही प्रश्न उपस्थित होतो. विशेषतः विनायक गायकवाड व सुनिल थोपटे यांच्या कार्यकाळात पुणे शहरात सर्वाधिक अंमली पदार्थ विरोधी कारवाया झाल्या आहेत. ललित पाटील प्रकरणांनंतर मात्र ह्या कारवाया कमी झाल्याचे दिसून येते. अंतर्गत काहीही असले तरी दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांची बोळवण झाली आहे एवढ मात्र शुक्रवारच्या बदली आदेशावरून दिसून येत आहे. 

शुक्रवार दि. 12 जानेवारी रोजी बदली झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कुठून कोठे बदली झाली पहा-
1) दत्तात्रय विश्वनाथ भापकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा)
2) कांचन मोहन जाधव (पोलीस निरीक्षक (गुन्हे), येरवडा पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन)
3) विजय रघुनाथ पुराणिक (पोलीस निरीक्षक (गुन्हे) भारती विद्यापीठ, पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा)
4) अनिता रामचंद्र हिवरकर (पोलीस निरीक्षक (गुन्हे) फरासखाना पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अमली पदार्थ विरोधी पथक -1)
5) सुनील गजानन थोपटे (पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, अमली पदार्थ विरोधी पथक एक ते नियंत्रण कक्ष)
6) संदीप देशमाने (पोलीस निरीक्षक, सहकारनगर पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलंकार पोलीस स्टेशन)
7) क्रांतीकुमार पाटील (पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक ते गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक 1)
8) विनायक दौलतराव गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ते गुन्हे शाखा दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक 1)
9) दशरथ शिवाजी पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लष्कर पोलीस स्टेशन ते भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक)
10) संतोष उत्तमराव पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बंडगार्डन पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन)
11) बाळकृष्ण सीताराम कदम (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन ते आर्थिक गुन्हे शाखा)
12) राजेश रामचंद्र तटकरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अलंकार पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक कोर्ट कंपनी)
13) महेश गुंडप्पा बोळकोटगी (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट 5 ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंडवा पोलीस स्टेशन)
14) विष्णू नाथा ताम्हणे ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 5)
15) विजय गणपतराव कुंभार (पोलीस निरीक्षक, विशेष शाखा ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, अभयोग कक्ष)
दरम्यान लष्कर आणि बंडगार्डन पोलीस स्टेशन येथील गुन्हे पोलीस निरीक्षक हे पुढील आदेश होईपर्यंत सदर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहतील असे शुक्रवारी नमुद केले होते. दरम्यान सोमवार दि. 15 जानेवारी रोजी पदस्थापनेचे आदेश काढण्यात आले आहेत.

सोमवार दि. 15 जानेवारी रोजी बदली झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कुठून कोठे बदली झाली पहा-
1) पोलीस निरीक्षक नरेंद्र मोरे (गुन्हे शाखा, प्रशासन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लष्कर पोलीस स्टेशन)
2) पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड (मार्केट यार्ड पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस स्टेशन)
3) पोलीस निरीक्षक संदिपान पवार (वाहतूक शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बंडगार्डन पोलीस स्टेशन)
4) पोलीस निरीक्षक किरण बालवडकर (उत्तम नगर पोलीस स्टेशन ते नियंत्रण कक्ष)
5) पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल (आर्थिक गुन्हे शाखा ते गुन्हे शाखा, प्रशासन)
6) पोलीस निरीक्षक मनीषा हेमंत पाटील (चंदन नगर पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदन नगर)
7) पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे (मार्केट यार्ड पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्केट यार्ड पोलीस स्टेशन)
8) पोलीस निरीक्षक विनय पाटणकर (वानवडी पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बिबेवाडी पोलीस स्टेशन)
9) पोलीस निरीक्षक गणेश माने पोलीस निरीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा ते पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, एमओबी)
10) पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ (गुन्हे शाखा, एमओबी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तम नगर पोलीस स्टेशन)
11) पोलीस निरीक्षक नीलिमा पवार (कोरेगाव पार्क, पोलीस स्टेशन ते वाहतूक शाखा)
12) पोलीस निरीक्षक सुनील झावरे (स्वारगेट पोलीस स्टेशन ते आर्थिक गुन्हे शाखा)
13) निरीक्षक अरविंद माने (शिवाजीनगर पोलीस स्टेशन ते आर्थिक गुन्हे शाखा)
14) पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत (सायबर पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर)
15) पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे (पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस स्टेशन ते आर्थिक गुन्हे शाखा)
16) पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड (गुन्हे शाखा, दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक दोन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस स्टेशन)
17) पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (चंदन नगर पोलीस स्टेशन ते नियंत्रण कक्ष)
18) पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे (बिबवेवाडी पोलीस स्टेशन ते विशेष शाखा)
19) पोलीस निरीक्षक गणेश उगले (आर्थिक गुन्हे शाखा ते पोलीस निरीक्षक, कल्याण)
20) पोलीस निरीक्षक संदीप भोसले (कोंढवा पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक सायबर)
21) पोलीस निरीक्षक दादा सोमनाथ गायकवाड विश्रामबाग पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा)
22) पोलीस निरीक्षक विजय खोमणे (पोलीस निरीक्षक, पर्वती पोलीस स्टेशन ते सायबर पोलीस स्टेशन)
23) पोलीस निरीक्षक अजय भीमराव वाघमारे (गुन्हे शाखा, खंडणी विरोधी पथक एक ते पुणे शाखा दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक दोन)