Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील एमपीडीएतील सराईत गुन्हेगाराला पुणे शहर पोलीसांकडून मटका, जुगार अड्डयांची खिरापत, कारवाईत क्राईम युनिटच्या पोलीसावर हात उगारला, समर्थ पोलीस हे विसरले काय…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
मटका जुगार अड्डयावर पोलीसांनी कारवाई केली, म्हणून पोलीसांवर हात उगारणाऱ्या मटका अड्डयाच्या मालकाला पोलीसांनी तडीपारीची का करू नये अशी नोटीस काढली… मग काय… त्याने सहायक पोलीस आयुक्त फरासखान्याला दरदिवशी 10 प्रदक्षिणा घालण्याचा उपक्रम सुरू केला. पुढे एमपीडीएची तरतुद ठेवण्यात आली. तेंव्हा तर देवाला जेवढ्या प्रदक्षिणा घातल्या नसतील तेवढ्या प्रदक्षिणा फरासखाना इमारतीला घातल्या. पुढे कारवाई नाममात्र करून, मोठी कारवाई संस्थगित ठेवण्यात आली आणि आता पुनः समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत नव्याने धुमाकुळ घालण्यास सुरूवात केली आहे. भिमनगराकडे जाणाऱ्या ऑईलच्या दुकानापासून ते पॉवर हाऊसपर्यंत त्याने रान पेटवुन ठेवले आहे. सगळीकडे गप्पाही गप्पामय वातावरण निर्माण झाले आहे. जागोजाग रायटर आणि पंटरचा धुमाकुळ सुरू आहे. एवढी मेहेरबानी समर्थ पोलीस स्टेशन आणि पुणे शहर पोलीसांनी का केली असावी बरे….

कायदयाच्या कार्यकक्षेत –
कायदयातील तरतुदीनुसार एखादया व्यक्तीने अवैध मार्गाने आर्थिक लाभ मिळविण्याच्या किंवा स्वतःसाठी किंवा कोणत्याही अन्य व्यक्तींसाठी गैरवाजवी आर्थिक किंवा इतर फायदा मिळविण्याच्या किंवा उठाव करण्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एक तर संघटीत गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणून किंवा अशा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करून किंवा हिंसाचार करण्याची धमकी देऊन किंवा धाकदपटशा किंवा जबरदस्ती करून किंवा अन्य बेकायदेशिर मार्गांनी चालु ठेवलेले कोणतेही बेकायदेशिर कृत्य करणाऱ्या संघटीत गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांविरूद्ध मोक्का कायदयानुसार कारवाई करण्यात येते.
समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत सुरू करण्यात आलेले अवैध जुगार मटका अड्डयाचा मालकही याच कायदयाच्या कार्यकक्षेत येत असतांना देखील त्याच्यावर निव्वळ तडीपारीची कारवाई प्रस्तावित केली, पुढे सौम्य कारवाई करून सर्व प्रकरण संस्थगित ठेवण्यात आले आहे. त्याचा परिणाम पुनः समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत धुडगूस घालण्यास सुरूवात केली असल्याचे दिसून येत आहे.

बारणे रस्ता ते पावर हॉऊस- व्हाया समर्थ पोलीस स्टेशन-
सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर श्री. राजेश पुराणिक नावाचे अधिकारी कार्यरत असतांना, मोठ्या शिताफीने, समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व जुगार अड्डंयावर कारवाई करून, हद्दीतील झुंडशाही संपुष्टात आणली होती. दरम्यान ह्या कारवाईवेळी जुगार अड्याच्या मालकाच्या चिरंजिवाने पोलीस पथकावर हल्ला केला, पोलीसांवर हात उगारल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे पोलीसांवर उगारलेल्या हातांसह पायांना देखील कामाला लावले असल्याचे ज्ञात आहे.
त्यामुळे राजेश पुराणिकांनंतर समर्थ हद्दीत पुनः अशा प्रकारचे गैरकृत्य करण्यास सहजासहजी धजावत नव्हते. एवढी पोलीसांची कायदयाची जरब होती. परंतु काळाच्या ओघात ही जरब कमी होत गेली आणि पुनः सुरू झाला, मटका जुगाराचा धुमाकुळ. बारणे रस्ता ते पॉवर हाऊस पर्यंत हा धुराळा उडालेला आहे. परंतु त्यात महत्वाची बाब म्हणजे जे हात पोलीसांवर उगारले गेले, त्याच हाताला पुनः पोलीसांनी साथ देणे कितपत योग्य आहे हे आता पुणे शहर पोलीसांनीच ठरवावे.