Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत वेश्याव्यवसायाचा कहर झाला, सामाजिक सुरक्षा विभागाकडून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, फाईव्ह स्टार हॉटेलवर छापा

निको गार्डन रोडवरील हॉटेल इंटरनॅशनलमधील वेश्या व्यवसायावर पोलीसांची छापेमारी

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/(वृत्तविश्लेषण)
विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशिर व गैरकायदयाच्या राज्याचे थैमान घातले आहे. कॉलसेंटर, मॉल्सच्या बाजारपेठांमुळे उच्चभ्रु व गर्भश्रीमंतांचा येथे राबता वाढत आहे. त्यामुळे या भागात एैशोआराम आणि चैनीच्या सुविधांचा सुकाळ झाला आहे. बेकायदेशिर व गैरकायदयाचे असले तरीही त्यांचा विकास व विस्तार वाढत चालला आहे. अनेक स्थानिक सामाजिक व राजकीय संघटनांनी विमानतळ पोलीस स्टेशनला बँकॉक व दुबई अशी नावे दिली आहेत. याच देशात सर्वाधिक एैयाशी असल्याने त्याचे नाव विमानतळ पोलीस स्टेशनला दिले आहे. तसेच अनेक निवेदने देवून अशा प्रकारचे अवैध व बेकायदेशिर धंदे बंद करण्याची मागणी केली आहे. परंतु विमानतळ पोलीस स्टेशन स्वतःहून कारवाई करीत नसल्याचे सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील सामाजिक सुरक्षा विभाग यांनी विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल इंटरनॅशनल या फाईव्ह स्टार हॉटेलवर छापा टाकुन तिथे सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईमध्ये राजस्थान मधील एक अभिनेत्रीसह उझबेकिस्तान मधील तरूणींचा सहभाग असल्याचे छापा कारवाईमध्ये समोर आले आहे.

गुन्ह्याची हकीकत अशी की,
विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील निको गार्डन रोडवरील हॉटेल इंटरनॅशनलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला समजली. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर हॉटेलमधील दोन रुममध्ये छापा टाकून उझबेकिस्तान आणि राजस्थान येथील तीन तरुणींना ताब्यात घेतले. विमानतळ पोलीस ठाण्यात इरफान उर्फ राहुल मदन उर्फ मदन सन्यासी आणि रोहित (पूर्ण नाव पत्ता महित नाही) यांच्या विरुद्ध आयपीसी 370, 34 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी दि.16 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच/ सहा वाजण्याच्या सुमारास निको गार्डन रोडवरील एका हॉटेलच्या खोलीत करण्यात आली.

कसा चालत होता वेश्याव्यवसाय-
आरोपींनी हॉटेल इंटरनॅशनल मध्ये दोन रूम बुक करुन त्याठिकाणी पीडित मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते. वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका करीत असल्याचे तपासात समोर आले असून पोलिसांनी 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ह्याच आरोपीकडून कोरेगाव पार्क येथील द ओ हॉटेलमध्ये देखील रुम बुक करुन पीडित तरुणींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलस उपनिरीक्षक अनिकेत पोटे, सागर केकाण, राजेश माळेगावे, आश्विनी भोसले, पोलिस राजेंद्र कुमावत, तुषार भिवरकर, मनिषा पुकाळे, ओंकार कुंभार, रेश्मा कंक, हनुमंत कांबळे, अजय राणे, बाबा कर्पे, किशोर भुजबळ यांच्या पथकाने केली आहे.