Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

टूरिस्ट व्हिसावरील महिलांकडून पुण्यात वेश्याव्यवसाय

पुणे/वृत्तविश्लेषण/national forum
भारतात टूरिस्ट अर्थात पर्यटन व्हिसावर आलेल्या महिलांनी पुणे शहरातील मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील परकीय नागरीक नोंदणी शाखा यांनी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील एका खाजगी मसाज पार्लरमध्ये छापा टाकुन संबंधित महिलांना पकडून त्यांना त्यांच्या मायदेशी पाठविण्यात आले आहे.

पुणे शहर पोलीसांनी आजपर्यंत ज्या ज्या मसाज पार्लर स्पावर छापे मारले आहेत, त्या त्या सर्व ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले आहे. शेकडो मुली व महिलांना पकडून सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. तरी देखील आजही पुणे शहरात शेकडोने नव्हे तर हजारोंनी मजसा पार्लर व स्पा सेंटर सुरू आहेत. बहुतांश मसाज पार्लर व स्पा मध्ये मोठ्या संख्येने वेश्याव्यवासाय सुरू असल्याचे दिसून येत आहे. वेगवगळ्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. वेगवेगळ्या थेरपी आणि न्यू स्टाफ अशा जाहीरात केल्या जात आहेत. 
पुणे शहरात यापूर्वी टाकलेल्या छाप्यात महाराष्ट्र, कर्नाटक व उत्तर दक्षिण भारतातील महिला व मुलींची संख्या अधिक होती. परंतु हल्ली बहुतांश मजाज पार्लरमध्ये न्यू स्टाफ च्या नावाखाली, रशिया सहित बहुतांश देशातील महिला व मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे समोर आले आहे. कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, विमानतळ व मुंढवा परिसरात बहुतांश मसाज पार्लर व स्पा मध्ये देशी विदेशी महिला कार्यरत असल्याच्या अनेक तक्रारी पुणे शहर पोलीस आयुक्तांकडे सादर केल्याच्या बातम्या प्रसारित होत असतात. त्यामुळे कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, विमानतळ व मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीतही धडक कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. 

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील परदेशी महिला नागरीक टूरिस्ट व्हिसावर येवून नोकरी करत असल्याबाबतची गोपनिय माहिती परकिय नागरीक नोंदणी शाखा पुणे शहर यांना मिळाल्याने त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार परकिय नागरिक नोंदणी पथकाने कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील व एनआयबीएम रोडवरील एका मसाज पार्लरवर जावुन पाहणी केली. या ठिकाणी सुमारे एकुण पाच महिला ह्या 2022 मध्ये टुरिस्ट व्हिसावर भारतात आल्या होत्या. व नोकरी करण्याचा वैध व्हिसा नसतांना देखील मसाज पार्लरमध्ये नोकरी करीत असल्याचे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने प्रसारित केलेल्या पत्रकात नमूद केले आहेत. 
दरम्यान मसाज पार्लर मध्ये काम करीत असलेल्या महिलांना कोंढवा येथील शासकीय महिला सुधारगृहात निगराणीखाली ठेवुन, त्यांचे तत्काळ विमानतिकीट काढुन त्यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हद्दपारीची कारवाई करण्यात येऊन त्यांना मुळ देशात पाठविण्यात आले असल्याचे तसेच ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली परकिय नागरिक नोंदणी शाखा पुणे शहर (एफआरओ) पथकाने केली असल्याचे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.