Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

कोरेगाव पार्क मधील वेश्याव्यवसायाला पोलीसांचा वरदहस्त?

सामाजिक सुरक्षा विभागाची कोरेगाव पार्क मध्ये धडक कारवाई, कलम 370 सह 3,4 व 5 अन्वये कारवाई
कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर वरीष्ठांची एवढी मर्जी कशासाठी?

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
कोरेगाव पार्क सारख्या उच्चुभू्र ठिकाणी नेमकं काय चाललं आहे. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे लक्ष आहे की नाही… की या गोरख धंदयात स्थानिक पोलीसांचा वरदहस्त आहे… प्रश्न अनेक असले तरी, कोरेगाव पार्क सारख्या उच्चभू्र ठिकाणी स्थानिक पोलीसांच्या वरदहस्त खेरीज कुणीही असे धाडस करू शकणार नाहीये. कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन हद्दीत आज मसाज पार्लर व स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईवरून दिसून आले आहे.

सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने कोरेगाव पार्क परिसरातील, स्पावर छापा टाकुन 3 परदेशी व दोन भारतीय अशा एकुण पिडीत मुलींची सुटका केली आहे. सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा पुणे शहर यांना गोपनिय माहिती मिळाली की, हेल्थ लँड क्लिनीक, थाई स्पा व हेल्थ स्पॉट क्लिनीक, थाई स्पा, कोरेगाव पार्क पुणे येथे मसाजच्या नावाखाली मुलींना वेश्या व्यवसायासाठी ठेवुन त्यांचेकडुन वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे.

दरम्यान सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी बनावट ग्राहक पाठवुन खात्री केली असता वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने तात्काळ छापा कारवाई करून सदर ठिकाणावरून एकुण पाच पिडीत मुलींची सुटका करण्यात आली. त्यामध्ये तीन परदेशी महिला व दोन भारतीय महिला असे एकुण पाच पिडीतांना संरक्षणकामी रेस्क्यु फाउंडेशन येथे ठेवण्यात आले आहे. 

या प्रकरणी ताब्यात घेतलेला एक आरोपी व एक पाहिजे असे दाने आरोपी विरूध्द कोरेगाव पोलीस स्टेशन येथे भादवि 370,34 सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम 3, 4 व 5 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच ताब्यात घेतलेल्या आरोपींना कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत अनेक कारवाया झाल्या तरी पोलीसांवर कारवाई का नाही –
दरम्यान कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही महिन्यांत स्पा व मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय अधिक वाढला आहे. तसेच या अवैध धंदयात स्थानिक पोलीसांचा सहभाग असल्याचेही मागील एका कारवाई दरम्यान समोर आले होते. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा छळ करीत असल्याचेही समोर आलेले आहे. असे असतांना देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक यांच्यावर अद्याप पर्यंत कारवाई का केली जात नाही, वरिष्ठ पोलीस अधिकारीच पोलीस निरीक्षकांना वाचवित असल्याचा संभ्रम पोलीस आणि नागरीकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने कारवाईची मागणी होत आहे.

ही धडक कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे, महिला पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे, रेश्मा केक पोलीस अंमलदार अजय राणे, सागर केकाण, अमेय रसाळ, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार या पथकाने यशस्वी केली आहे.