Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

विधी विभागाच्या ऍड. निशा चव्हाण यांच्या चुकीच्या अभिप्रायांमुळे मेडीकल कॉलेजचे अदा केले कोट्यवधी रुपये

पुणे /दि/
पुणे महापालिकेला संलग्न असलेले अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज ट्रस्ट नव्याने स्थापन करण्यात आले आहे. ह्याचे कामकाज पुणे महापालिकेच्या नायडू कंपाऊंड मध्ये सुरू आहे. तथापी पुणे महापालिकेने मेडीकल कॉलेज सुरू करण्यात आले असले तरी कोविड १९ मुळे विद्यार्थीच नाहीत. विना विद्यार्थी मेडिकल कॉलेज मध्ये डॉक्टर प्राध्यापकांची भरती करून सुमारे ५ कोटी रुपयांचे वेतन अदा करून पुणे महापालिकेची फसवणूक करण्यात आली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेज साठी सहा महिन्याच्या मुदतीवर प्राध्यापक असलेले डॉक्टर घेतलेले आहे. कोविड १९ मुळे मेडिकल कॉलेजमध्ये विदयार्थी नसल्यामुळे त्यांना कमला नेहरू हॉस्पीटल मध्ये काम देण्यात आले. कमला नेहरू हॉस्पीटल मध्ये ते ओपीडी मध्ये काम करीत असल्याचे सांगण्यात आले तथापी त्या ठिकाणी संबधित प्राध्यापक असलेले डॉक्टर आढळुन आले नसल्याच्या तक्रारी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत.


पुणे महापालिकेच्या विधी विभागाच्या ऍड. निशा चव्हाण यांनी मेडीकल कॉलेज मधील प्राध्यापक पदांसाठी असलेली भरती ही मेडिकल कॉलेज सल्लागार या नात्याने, त्यांनी अभिप्राय दिला. सदर प्राध्यापकांना आज रोजी मागील काळात कोणतेही काम केलेले नसतांना, दर महिन्यांना ४० लाख रुपये, पुणे महापालिकेकडून मागील सात आठ महिन्यांपासून अदा केले जात आहेत. म्हणजे जवळपास बोगस कामांचे पाच कोटी रुपये अदा केलेले आहेत. दरम्यान पुणे महापालिकेच्या विधी खात्याने अभिप्राय देवून, पुणे महापालिकेच्या मुख्य सभेने २०० कोटी रुपयांचे कर्जरोखे घेण्यात सहमती दर्शविली आहे. त्यामुळे महापालिकेला प्रतिमहा या कर्जरोख्यांचे व्याज अदा करावे लागत आहे. यामध्ये ऍड. निशा चव्हाण विधी अधिकारी यांनी केलेल्या या गैरव्यवहारामुळे पुणे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी पुणे महापालिकेत दाखल केल्या आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी नमूद केलं आहे की, पुणेकर टॅक्स भरतो . त्या टॅक्स मधुन गरीबासाठी हॉस्पिटल उभारली जातात. कोट्यावधीचे साहित्य घेतले जाते . डॉ. उपलब्ध आहेत . मग असा आनागोदी कारभार कां? कायम स्वरूपी पुणे मनपाला आरोग्य प्रमुख कां मिळत नाही ? डेलीव्हेजसचे आरोग्य प्रमुख काय कामाचे ? विद्यमान आरोग्य प्रमुख यांना जवळजवळ दीड वर्षे झाले. त्यांनी पुणे शहरांत किती दवाखाने सुधारले ? स्वतःच्या पत्नीला मात्र तत्परतेने पुणे मनपाच्या आरोग्य विभागात रुजू करून घेतले ही सुधारणा तत्परतेने झाली असल्याची कोपरखळी त्यांनी मारली आहे.