Tuesday, January 28 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बेरोजगारांनाच अवैध धंदे चालु करायला परवाना दया, पुण्यात एवढे क्राईम का वाढले?

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
नॅशनल क्राईम आणि महाराष्ट्र क्राईम रेकॉर्डनुसार देशात व राज्यात गुन्हेगारी वाढली असल्याचे आकडेवारीनिशी प्रसिद्ध करण्यात आले आहे. दरम्यान गुन्हेगारीमध्ये वाढ का होत आहे याबाबत पुणे शहर पोलीसांनी काही निष्कर्ष काढले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच नागरीकांशी वाद काढुन आपल्या टोळीचे वर्चस्व वाढावे, जनमानसात दहशत राहावी यासाठी गुन्हेगारी टोळ्या संघटीतपणे दहशतीने स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता गुन्हे करीत असल्याचे निष्कर्ष पुणे शहर पोलीसांनी काढलेले आहेत. गुन्हेगारीतूनच अवैध धंदे व खाजगी सावकारी, कंपनी सावकारी अधिक वाढली लागली आहे. मुळशी पॅटर्न या चित्रपटात बऱ्यापैकी वास्तवातील गुन्हेगारीचे चित्रण करण्यात आले आहे. थोडक्यात आर्थिक फायदयाकरीता गुन्हेगारी वाढली आहे असाच त्याचा निष्कर्ष आहे. आता त्यामध्ये पोलीसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखायचे सोडून पोलीसच जर गुन्हेगारांच्या बेकायदेशिर धंदयात भागीदार म्हणून नावे पुढे येत असतील तर कारवाई करण्याची जबाबदारी ही मुळतः वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आहे, दरम्यान ज्या गुन्हेगारांनी पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशिर व अवैध धंदे सुरू केल्याच्या तक्रारी आल्यानंतर देखील कारवाई होत नसल्यास, गुन्हेगारांच्या पाठीशी वरिष्ठ पोलीस उभे असल्याचा भास व संशय व्यक्त होत आहे. मागील काही दिवसात पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी मकोका व एमपीडीए अंतर्गत करण्यात आलेल्या अनेक कारवायांमध्ये 18 ते 22 वर्षाचे तरूणांची संख्या अधिक दिसत आहे. त्यामुळे पुणे शहर पोलीस गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे की काय अशी शंका निर्माण होत आहे.

बेरोजगारांनाच अवैध धंदे चालु करायला परवाना दया-
पुणे शहरातील अवैध व बेकायदेशिर धंदे, खाजगी सावकारी याबाबत पोलीस नियंत्रण कक्षासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी नोंदवून देखील कारवाई होत नसतील तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाच या अवैध धंदयावर वरदस्त आहे असे म्हणण्यास जागा आहे. त्यामुळे अवैध धंदे सुरूच ठेवायचे असतील तर गुन्हेगार कशासाठी पाहिजेत… थेटच पुण्यातील बेरोजगार युवकांना मटका जुगार अड्डे, रमीचे क्बल, पणती-पाकोळी सोरट, मसाज पार्लर-स्पा, ऑनलाईन लॉटरी, व्हिडीओ गेम जुगार या सारख्या धंदयाची पोलीस स्टेशनमध्ये बेकायदा नोंदी ठेवून बेकायदेशीर धंदयालाच परवानगी देऊन टाका अशी उद्वविग्नता व्यक्त करीत आहोत.

दरम्यान अनेक वर्षांपासून देहविक्री करणाऱ्या महिलांना सेक्स वर्कर म्हणून मान्यता दया,देह विक्रीला व्यवसायाचा दर्जा दया अशी मागणी होत आहे. सांविधानिक तरतुदीनुसार शासन मान्यता देत नाहीये. तरीही बेकायदेशिरपणे देहविक्री जोरात सुरू आहे. पूर्वी रेट लाईट एरिया ठरलेले होते. परंतु आता तर मसाज पार्लर आणि स्पाच्या नावाखाली ठायी ठायी देहविक्रीची ठिकाणे तयार झाली आहेत. त्यांच्यावर तर पोलीसी कारवाई होतच नाही. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग लुटूपुटची कारवाई करते. महिला व मुलींची बेकायदा वाहतुक या तुटपुंजा कायदयातील किरकोळ कलमांचा वापर करून आरोपींवर तत्काळ सुटका होईल असे आरोप लावले जातात. त्यामुळे देहविक्री अधिक वेगात सुरू आहे. त्याच धर्तीवर आता जुगार अड्डे सुरू करण्यासाठी गुन्हेगारांऐवजी बरोजगारांना अधिक प्राधान्य दिल्यास, पुणे अधिक प्रगतीपथावर पोहोचले असे म्हणायला जागा देखील राहिल यात शंकाच नाही.

गुन्हेगारी आणि जात वास्तव –
भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील सर्वोच्च न्यायाधिशांच्या परिषदेमध्ये देशातील तुरूंग आणि त्यातील कैदयांच्या संदर्भात मोठे विधान केले होते. देशाच्या बहुतांश तुरूंगामध्ये अनु. जाती व अनु. जमातीची संख्या लक्षणीय असून, यावर काहीतरी उपाययोजना करावी असे सूचित केले होते. दरम्यान शिवाजीनगर, खडकी आणि विश्रांतवाडीतील अवैध धंदे व गुन्हेगारीबाबत वरीष्ठ पोलीस कार्यालयाकडे तक्रारींच्या अनुषंगाने नॅशनल क्राईम ब्यूरो व महाराष्ट्र क्राईमच्या वार्षिक सांख्यिकींचा अभ्यास केला गेला. वार्षिक अहवाल व आकडेवारीतून काही तथ्य प्रथमच समोर आली आहेत. दरम्यान बहुतांश कारागृहात अनु. जाती व अनु. जमाती अर्थात दलित व आदिवासी समाजातील नागरीकांची संख्या अधिक आहे. मागील काही दिवसांमध्ये पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी मकोका व एमपीडीए अंतर्गत कारवाई केलेल्या बहुतांश प्रकरणांत अनु. जाती व जमातीची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. गुन्हेगारी कृत्य करणारांना जात नसते असे म्हणतात परंतु पोलीसांनी आरोपी ठरविलेले गुन्हेगार हे दलित व आदिवासी समाजाचे कसे असतात याचेही उत्तर पोलीसांकडे नाहीये. त्यामुळे पुणे शहर पोलीस, गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय अशी शंका उपस्थित होत आहे.

पुण्यातून अवैध धंदे बंद का होत नाहीत –
पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, तसेच नागरीकांशी वाद काढुन आपल्या टोळीचे वर्चस्व वाढावे, जनमानसात दहशत राहावी यासाठी गुन्हेगारी टोळ्या संघटीतपणे दहशतीने स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता गुन्हे करीत असल्याचे निष्कर्ष पुणे शहर पोलीसांनी काढलेले आहेत. परंतु याच दहशतीचा वापर करून पुढे जाऊन मटका जुगार अड्डे, रमीचे क्लब, पणती पाकोळी सारखे सोरट, अंमली पदार्थांची विक्री, पब, हुक्का पार्लर, मसाज पार्लर, स्पा आदिंसारखे अवैध व बेकायदेशिर धंदे करून ह्याच गुन्हेगारी टोळ्या आर्थिक संपन्न होत आहेत. त्यात पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान उभे करीत आहेत. त्यामुळे पुणे शहर पोलीसांनी पुणे शहरातील खाजगी सावकारी आणि अवैधपणे सुरू असलेले मटका जुगार अड्डयांवर कारवाई करून ते बंद का केले जात नाहीत हा एक प्रश्न उपस्थित होत आहे.

मागील दोन महिन्यांपासून तक्रारी, परंतु कारवाई नाही –
शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत मागील दोन महिन्यांपासून पुणे महापालिकेच्या दवाखान्यामागे अवैधपणे मटका जुगार अड्डा सुरू असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्ष यांच्याकडे केली होती. तथापी मागील दोन महिन्यांपासून शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मटका जुगार अड्ड्यांवर कारवाई होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

जे शिवाजीनगरात तेच- खडकी, विश्रांतवाडी व कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत घडते –
पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 1 यांच्या हद्दीतील बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व बेकायदेशीर धंदे बंद असल्याचे दिसून येत आहे. परंतु शिवाजीनगर पोलीस स्टेशन मधील भैय्यावाडी येथील जुगार अड्डे बंद होत नाहीत. दरम्यान शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ज्याने अवैध धंदे सुरू केले आहेत, त्याचे यापूर्वी खडकी व विश्रांतवाडीत अवैध धंदे सुरू होते व आहेत. खडकी मध्ये कारवाई होत नसल्याने सराईत गुन्हेगारांनी आता परिमंडळ एक मध्ये प्रवेश केला असल्याचे दिसून येत आहे. त्यातच कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीतही अंमली पदार्थांची विक्रीत देखील याच सराईत गुन्हेगाराकडून केली जात असल्याचे समोर येत आहे. सर्वसामान्य नागरीक व वार्ताहरांना ही माहिती मिळते मग पुणे पोलीसांना सराईत गुन्हेगाराची माहिती नाहीये असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कोणता राजकीय नेता व पोलीस अधिकारी या सराईत गुन्हेगाच्या पाठीशी उभा आहे हे समोर येणे आवश्यक ठरत आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात लाजिरवाणी घटना – पतीसमोरच पत्नीवर खाजगी सावकाराचा बलात्कार,
खाजगी सावकारी आणि अवैध धंदयातील पोलीसांच्या भागीदारीमुळेच पुणे शहरात गुन्हेगारी वाढली-
खाजगी सावकाराने हातउसने घेतलेले 40 हजार रुपये परत न दिल्याने, त्या व्यक्तीला समोर बसवून त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. एवढच नाही तर या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ तयार करुन हा व्हिडीओ आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल केला. पुण्यातील हडपसर परिसरात फेब्रुवारी 2023 मध्ये ही घटना घडली होती. 34 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी इम्तियाज हसीन शेख (वय 47 वर्षे) याच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीला आरोपीने उसने पैसे दिले होते. उसने घेतलेले हे पैसे फिर्यादीचा पती परत करु शकला नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत हडपसर येथील म्हाडा कॉलनीत बोलावून घेतले. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या पतीला समोर बसून चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. सोबतच तक्रारदार महिलेसोबत पतीसमोरच जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले.

पुन्हा शरिर संबंधाची मागणी, व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केल्यानंतर महिलेची पोलिसात धाव-
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आरोपीने मोबाईल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर पुन्हा आरोपीने फिर्यादी महिलेकडे शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र महिलेने नकार दिल्याने आरोपीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केला. यानंतर महिलेने हडपसर पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली. तक्रार आल्यानंतर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी इम्तियाज हसीन शेखला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सहकारनगर, बिबवेवाडी, दत्तवाडी, सिंहगड रोड व भारती विदयापीठ मध्ये काय घडले-
1.हातभट्टीवाल्याने क्बलवाल्यांवर दहशत बसावी म्हणून वाहनांची तोडफोड केली,
2.रिॲक्शन म्हणून क्बल -मटका जुगार अड्डा व क्लब चालकांनी हातभट्टीवाल्यांवर हल्लाबोल केला,

  1. सहकारनगर, बिबवेवाडी,दत्तवाडीतील गुन्हेगारांचा भारती विद्यापीठ व सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत राडा,
  2. तर सिंहगड रोड व भारती विद्यापीठातील गुन्हेगारांचा सहकारनगरात वाहनांचा सडा
  3. 18/20 वर्षांच्या मुलांवर मोक्का आणि तडीपारी सारखे गुन्हे दाखल होत असतील तर पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे,
  4. तरूण मुले गुन्हेगारीकडे का वळत आहेत,
  5. अवैध धंदयातील पोलीस आणि पोलीस नातेवाईकांची भागीदारी असल्याचे जेथे सांगितले जाते, तिथे कारवाई का होत नाही.
  6. पुणे शहर पोलीसांनीच गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना सुरू केला आहे काय,

पुण्यातील वाढती गुन्हेगारी –
पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी मागील महिनाभरात पोलीसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. हजारोनी गुन्हेगार चेक करण्यात आले, त्यानंतर अनेक गुन्हेगारांवर कारवाई झाली. काही जणांवर मकोका लावण्यात आला. एमपीडीएच्या कारवाया करण्यात आल्या. त्यातच मध्येच कोयता गँग डोके वर काढत असते. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी काही पोलीसांचे निलंबन केले तर काहींना समज देण्यात आली आहे. असे असतांना देखील पुणे शहरात गुन्हेगारी अटोक्यात येत नसल्याचे या घटनेने दिसून आले आहे.
खाजगी सावकारी आणि मटका,जुगार अड्ड्यातील पोलीसांच्या भागीदारीमुळे पुणे शहरातील गुन्हेगारी अधिक वाढली आहे. खाजगी सावकारी, कंपनी सावकारी आणि त्याच बरोबरीने पुणे शहरात सुरू असलेले मटका, जुगार अड्डे, रमीचे क्लब यामध्ये पोलीसांची भागीदारी असल्यानेच पुणे शहरात गुन्हेगारी वेगाने वाढत आहे. गुन्हेगारांनी याच्याही पुढे एक पाऊल टाकत, पोलीसांना मारहाण करणे, पोलीस स्टेशनसह, पोलीस वसाहतीत चोरीचे प्रकार घडत आहेत.त्यातच आता पुणे शहरात बांग्लादेशी नागरीक बेकायदा वास्तव्य करीत असल्याची बाब समोर आली आहेच. शिवाय पुणे शहरात दहशतवादयांनी आश्रय घेतल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे पुणे शहराची कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता खाजगी सावकारीने डोके वर काढले आहे. मागील एक वर्षापासून आम्ही नॅशनल फोरम मधुन खाजगी सावकारी बाबत आवाज उठवित आहोत. परंतु तक्रार आली नाही म्हणून कारवाई नाही असे उत्तर देत आहेत. त्यामुळे पुणे शहरात खाजगी सावकारी करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करून पुणे शहरातील सर्व मटका जुगार अड्डे तातडीने बंद होणे आवश्यक आहे. याबाबतही नॅशनल फोरम मधुन मागील काही महिन्यांपासून आवाज उठविला जात आहे. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नॅशनल फोरम मधील बातमीची दखल घेतली असून, पुण्याचे आमदार श्री. रविंद्र धंगेकर यांनी पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत भाष्य करून अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे.

गुन्हे दाखल करण्याची स्पर्धा नकोच –
पुणे शहराचे तत्कालिन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी मकोका व एमपीडीए दाखल करण्याची स्पर्धा लागली होती. एका कार्यकाळात त्यांनी प्रत्येकी शतक गाठले होते. शतक गाठुन पुण्यातील गुन्हेगारी कमी झाली नाही. आता श्री. रितेश कुमार यांनी गुप्ता यांच्याशी स्पर्धा चालु ठेवली आहे. पदभार स्वीकारल्यापासून आता चार पाच महिन्याच्या काळात मकोका व एमपीडीए पस्तीशी पर्यंत पोहोचले आहे. दोन /तीन वर्षाची पूर्ण टर्म होईपर्यंत याच गतीने गेल्यास, मकोका 500 आणि एमपीडीए 500 पर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान या कारवायामुळे तरी पुण्यातील गुन्हेगारी थांबणार आहे काय याचेही उत्तर पोलीसांनी देणे आवश्यक आहे. दर महिन्यात शेकडो तडीपार होत आहेत, तरीही ते पुण्यात वास्तव्याला असल्याचे अनेक कोंम्बिग ऑपरेशन मधुन समोर आले आहे. गुन्हेगार चेकींग करतांना, गुन्हेगार लपुन बसणारच यात शंका नाही. परंतु गुन्हेगारीवर औषध शोधण्याऐवजी पोलीस हे नवीन गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना मात्र होता कामा नये एवढीच अपेक्षा.