Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

नवीन तयार होणाऱ्या टपरीछाप भाईंना, नियमित मिळणार पोलीसांचा तिर्थप्रसाद
पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर वचक बसविण्यासाठी आता, पुणे पोलीसांचे दररोज पेट्रोलिंग व चेकींग,

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
साऊथचे टपोरी चित्रपट, त्यातील जब्बर फायटींग, सोशल मिडीयावरील भाईंच्या वाढदिवसाचे पोस्टर, भाईंना घाबरून जाणारे दुकानदार, बिल्डर यामुळे आता, आपण भाई झालंच पाहिजे असे हल्लीच्या युवकामध्ये नवीन फॅशन तयार झाली असल्यासारखे वातावरण सध्या पुणे शहरात दिसून येत आहे. त्यातच खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. त्याच्या वसुलीसाठी त्यात अशा नवीन तयार होणाऱ्या भाईंना मोठी डिमांड वाढली असल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे मोठ्ठा भाई बनण्यासाठी पुणे शहरातील काही पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन भाईंनी तर कायदा आणि पोलीसांचा धाक मुळा मुठा नदीत विसर्जित केल्यासारखे वर्तन ठेवले होते. त्यातच हिंदी चित्रपटातील व्हिलन सारखे ड्रग्ज घेतल्यानंतर पॉवर येते की काय असे मनांशी बाळगुन आता शहरात ड्रग्जचेही फॅड अधिक वाढले आहे. परंतु आता नवीन भाईंनो, रस्त्यावर येवून राडा कराल तर पुणे शहर पोलीस नियमितपणे रस्त्यावर पेट्रोलिंग व चेकींग करणार आहेत. त्यात काही सापडले तर भाईगिरी रस्त्यावरच निघणार आहे. त्यामुळे सावधान… पुणे पोलीस शहरात तुमची वाटतच पाहत आहेत…..

क्राईम ब्रँच युनिट क्र. एक ने प्रसारित वृत्तात नमूद केलं आहे की, पुणे शहरामध्ये नुकतेच सिंहगड पोलीस स्टेशन, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, समर्थ पोलस स्टेशन, फरासखाना पोलीस स्टेशन व डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नवीन तयार होणारे गुन्हेगार यांनी आपली सर्वसामान्य नागरीकांमध्ये दशहत निर्माण होण्यासाठी भर दिवसा टपरी चालक, हॉटेल मालक,  रस्त्याने जणारे नागरीक यांना धमकी वजा दशहत निर्माण होण्यासाठी हातात कायेते व तलवारी घेवून वरील नागरीकांना त्यांचे हॉटेलमध्ये, टपरीमध्ये, दुकानांमध्ये तसेच नागरीकांच्या दुचाकी, चारचाकी गाड्यांवर कोयते मारून मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याचे व्हिडीओ काढुन नागरीक व्हायरल करून नागरीकांचा जीव किती धोक्यात आहे. याबाबत मॅसेज, व्हॉसअप, व्टिटर, फेसबुक या माध्यमातून पाठवत होते. यामुळे पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेवून, पुणे शहरातील गँगवॉर वर वचक बसविण्यासाठी गुन्हे शाखेकडून वारंवार आरोपी चेकींग तसेच दररोज पेट्रोलिंग नेमण्यात आली आहे व यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याबाबत सक्त पेट्रोलिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

दरम्यान क्राईम बँच युनिट एक चे पोलीस अंमलदार श्री. निलेश साबळे व श्री. अजय थोरात यांनी पुण्यातील बोहरी आळी येथे मोठी कारवाई करून सुमारे 105 कोयते जप्त करून हुसेन खोजेमा राजगरा वय 32 रा. उंड्री पुणे यास अटक करण्यात आली आहे. तसेच याच्याविरूद्ध फरासखाना पोलीस स्टेशन येथे ऑर्म ॲक्ट व महा. पोलीस ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान पेट्रोलिंग करतांना संशशित गुन्हेगार चेकींग करतांना, कोयते तलवारी सहित, अंमली पदार्थ आणि खाजगी सावकारी करणाऱ्यांची देखील माहिती घेवून, त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. नवीन भाई हे खरे तर खाजगी सावकारी मुळे अधिक वाढले असल्याचा अंदाज काही जणांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्याच्याकडे देखील यापुढील काळात अधिक लक्ष ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.