नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/
लोकसभेचे भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी बहूजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली. यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी गंभीर आरोप केला आहे. संसदेत मुस्लीम खासदाराला शिवीगाळ होत असताना काँग्रेसचे खासदार गप्प होते असं म्हणत त्यांनी काँग्रेस खासदार गप्प का होते असा प्रश्न विचारला आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत हा आरोप केला.
ॲड.आंबेडकर म्हणाले, “लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत एका भाजप खासदाराने मुस्लीम खासदारासाठी भडवा, कटवा (खंता झालेला), मुल्ला दहशतवादी आणि कट्टरवादी अशा अत्यंत अपमानास्पद शब्दांचा वापर केला आणि अपमान केला. मला आश्चर्य वाटते की, विरोधी बाकावरील एका मुस्लीम खासदाराला शिवीगाळ होत असताना काँग्रेस खासदार काय करत होते?”
नेमकं काय घडलं?
रमेश बिधुरी संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी लोकसभेचा चांद्रयान-3 च्या यशबाबत बोलत होते. तेव्हा बसपाचे खासदार दानिश अली यांनी चांद्रयान-3 मोहिमेचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाटल्याचा आरोप केला. त्यावर रमेश बिधुरी संतापले आणि अपशब्दांचा उपयोग केला.
रमेश बिधुरी काय म्हणाले?
“मोदीजी श्रेय घेत नाहीयेत. श्रेय देशाचे वैज्ञानिक घेत आहेत. ए भ**ए उग्रवादी..बोलू देणार नाही तुला कधी उभं राहून. सांगून ठेवतोय. ए उग्रवादी..कठुवेहे दहशतवादी आहेत उग्रवादी आहेत.. हे मुल्ला दहशतवादी आहेत. याचं काही ऐकू नका, बाहेर फेका याला”, असं रमेश बिधुरी म्हणत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.