नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरात घरफोडी आणि चोऱ्यांचे सत्र सतत वाढत चालले आहे. घर कुलूप लावून बंद असताना घरफोडी करण्याचे प्रकार घडत आहेत. आता तर चोरांनी दुकानांवर लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून येत आहे. येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील, एका मेडिकल क्लिनिक मध्ये चोरी करून ड्रॉवर मध्ये ठेवलेले सुमारे 2 लाख पाच 5 रुपये चोरी करून नेले आहेत. तर चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीतील एका वाईन शॉपचे शटर उचकटून एक लाख रुपयांच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्या आहेत. तसेच स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत स्वारगेट एसटी स्टँड मध्ये 1 लाख 10 हजार रुपयांची सोन्याची चैन चोरी करून नेल्याचा प्रकार घडला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,
येरवडा पोलीस स्टेशन –
येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील आनंद क्लिनिक, जावळे कॉम्प्लेक्स, गणपती मंदिरासमोर वडगाव शेरी, फिर्यादी मदन राठी, वय -58 वर्ष, रा. विमान नगर यांचे आनंद क्लिनिक हे 16 जानेवारी रोजी रात्री व 17 जानेवारी रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान कुलूप लावून बंद असताना, अज्ञात इसमाने मेडिकल क्लिनिकचे शटर कशाच्या तरी साह्याने उचकटून ड्रॉवरमध्ये ठेवलेले 2 लाख 5 हजार रुपये चोरून नेले आहेत. याबाबतचा तपास येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे करीत आहेत.
चतुःर्श्रुंगी पोलीस स्टेशन- चोरांनी दारूच्या बाटल्या लांबविल्या-
चतुशृंगी पोलीस स्टेशन हद्दीतील लक्ष्मण पार्क, ग्रीन पार्क हॉटेल, बाणेर रोड येथे सनी नावाचे वाईन शॉप असून 17 जानेवारी रोजी रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने सनी वाईन शॉप चे शटर उचकटून वाईन शॉप मधील रॅक मध्ये ठेवलेल्या 1 लाख 780 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्या आहेत. याबाबत दिलीपकुमार पंजवानी यांनी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके अधिक तपास करीत आहेत.
स्वारगेट पोलीस स्टेशन- एसटी स्टँडवर चोरी-
स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील, स्वारगेट एसटी स्टँड येथे 17 जानेवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एक 63 वर्षीय इसम राहणार सोनेरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे हे एसटी बस मध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने बसमधील गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी यांच्या गळ्यातील 1 लाख 10 हजार रुपये किमतीचे सोन्याची चैन चोरून नेली आहे. याबाबतचा तपास स्वारगेट पोलीस स्टेशनचे सहाय्य पोलीस निरीक्षक अश्विनी बावचे अधिक तपास करीत आहेत.