Monday, December 30 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेत माहिती अधिकार अर्जदाराला पुन्हा मारहाण, हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष तुषार गाडे यांचे आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन

कोण हे अभिमन्यू गाडे, दहशतवाद्यांना मदत केली हे खरे आहे काय?
नॅशनल फोरम/ पुणे/दि./ प्रतिनिधी/
पथारी व्यवसायिकांच्या संदर्भामध्ये श्रमशक्ती विकास संस्थेचे पुणे व पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष तुषार गाडे यांना पुढे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. दरम्यान पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग झोन क्रमांक 7 मधील तत्कालीन माहिती अधिकारी कनिष्ठ अभियंता रामचंद्र शिंदे यांनी नाकारलेल्या माहिती संदर्भात, माहिती अधिकार कायद्यांतर्गत अपिलिय अधिकारी उपाभियंता श्री. गायकवाड यांचे समोर प्रथम अपिलाची सुनावणी, सुरू असताना माहिती अधिकार कार्यकर्ते श्री.शैलेंद्र दीक्षित यांना रामचंद्र शिंदे यांच्या पत्नीने कार्यालयात घुसून मारहाण केल्याचा प्रकार 12 नोव्हेंबर 2021 रोजी घडला होता. ही बातमी पुढे शहरातील सर्व वृत्तपत्रांसह संपूर्ण राज्यात वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केली होती. आज तोच प्रकार पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामध्ये घडला आहे.

 दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी हॉकर्स संघटनेचे शहर अध्यक्ष तुषार गाडे यांना माहिती अधिकारातील माहितीसाठी गेल्यानंतर त्यांना अभिमन्यू गाडे यांनी जबरी मारहाण केल्याची घटना घडली आहे. दरम्यान पुणे महानगरपालिकेमध्ये 70 ते 80 खाती व विभाग असून केवळ बांधकाम व अतिक्रमण विभागातच माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर दिवसेंदिवस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मानहाणी व जबरी हल्ले केले जात आहेत. त्यामुळे सर्वाधिक भ्रष्टाचार व गैरव्यवहार या दोन विभागांमध्ये असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

 तत्कालीन बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता रामचंद्र शिंदे यांनी बेकायदा बांधकामाची माहिती विचारल्याचा राग मनात धरून अपील सुनावणीवेळी स्वतःच्या पत्नी व मुलीला मनपा कार्यालयात बोलावून माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. दिक्षित यांना मारहाण केली होती. आता तर स्वतः अतिक्रमण विभागातील अभिमन्यू गाडे यांनी अर्जदार तुषार गाडे यांना जबरी मारहाण केली आहे. श्री. तुषार गाडे यांना कार्यालयात ढकलून दिल्याने टेबल वरील काच फुटली, त्यातून त्यांना जबरी दुखापत झाली आहे. याबाबत पुणे महापालिकेचे आयुक्त श्री.विक्रमकुमार यांना दिलेल्या तक्रार अर्ज नमूद केले आहे की,

तुषार गाडे यांना ढगात पाठविण्याची भाषा –
दि. 13 सप्टेंबर 2023 रोजी मी पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागामध्ये माझे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत गेलो असता, तेथील अपिलीय अधिकारी यांनी काही (कलंकित भ्रष्टाचारी) यांच्याशी संगनमत करून मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला .विशेषतः माझी शस्त्रक्रिया झाली असल्याचे त्यांना ज्ञात असल्याचे माहीत असूनही माझे शस्त्रक्रियेच्या भागावर अभिमन्यू अर्जुन गाडे नामक कलंकित व भ्रष्टाचारी व्यक्तीने मला मारहाण करून, तुझा सुरेश शेट्टी सारखे ढगात पाठवू अश्या स्वरूपाची धमकी मला दिलेली असल्याचे माहिती श्री. गाडे यांनी निवेदनाव्दारे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांना कळविले आहे.

पुणे मनपा सेवक अभिमन्यु गाडे यांनी दहशतवाद्यांना मदत केली –
ते पुढे म्हणतात की, वास्तविक श्री. अभिमन्यू गाडे यांची पार्श्वभूमी भ्रष्टाचारी असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना त्यांच्या अधोरेखित नियमानुसार अकार्यकारी पदावर, जेथे आर्थिक व्यवहार नाहीत, अशा ठिकाणी कार्यरत करण्याचे सूचित निर्देश दिले असतानाही, त्यांना तिथे साईड पोस्टिंग दिलेली आहे. अभिमन्यु गाडे हे 2008 साली कसबा क्षेत्रीय कार्यालय याठिकाणी कायम बिगारी सेवक म्हणून नियुक्त असताना, त्याने दहशतवादी इसमाला मदत केली होती, अशी पुणे मनपा येथील काही कर्मचाऱ्यांची दबक्या आवाजात चर्चा आहे. तसेच अतिक्रमण विभागात ठेकेदाराचे बायोमेट्रिक मध्ये फेरफार करून ते आर्थिक गैरव्यवहार करत असल्याचे हे सर्वश्रुत आहे. तसेच अनेक शहरातील नागरिकांचे बायोमेट्रिक प्रलंबित असतानाही श्री गाडे यांचे रविवार पेठ, सोन्या मारुती चौक याठिकाणी अनेक स्टॉल आणि हातगाडी आहेत, त्यामुळे त्यांच्या वर्तनाबद्दल आणि कार्यपद्धतीबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले असल्याची बाब श्रमशक्ती विकास संस्थेचे अध्यक्ष श्री. तुषार गाडे यांनी नमूद केले आहे.

पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील भ्रष्टाचाऱ्यांची पोलखोल –
हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष श्री. तुषार गाडे यांनी अतिक्रमण विभागातील भ्रष्टाचार व गैरव्यवहारांवर आसुड ओढले आहेत. ते म्हणाले की, शासनाच्या धोरणानुसार गतिमान व पारदर्शक प्रशासन या उद्देशाने अतिक्रमण विभागातील अनेक सहा. अतिक्रमण निरीक्षक आणि अतिक्रमण निरीक्षक यांचे भ्रष्टाचार व बेहिशोबी मालमत्ता, उत्पन्न पेक्षा अधिक स्त्रोत, करदात्या नागरिकांच्या पैशांचा अपव्याप उघडकीस आणल्या मुळे मला मारहाण करण्यात आलेली आहे. तसेच या व्यक्तीकडून भविष्यातही मला व माझ्या कुटुंबीयांना जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भिती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

न्याय दया, नाहीतर आंदोलनाचा इशारा-
वरील प्रकरणी पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांनी अभिमन्यू गाडे यांच्यावर योग्य ते कठोर शासन करून न्यायदान करावे ही अपेक्षा आहे. अन्यथा या प्रकरणी मला सनदशील मार्गाने पुणे महापालिकेच्या बाहेर आंदोलनाचा मार्ग ना इलाजास्त्व स्वीकारावा लागेल याची नोंद घ्यावी असाही इशारा श्री. तुषार गाडे यांनी दिला आहे. दरम्यान आयुक्त श्री. विक्रम कुमार यांच्यासारखे कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात जर माझ्यासारख्या पथ विक्रेते संघटनेच्या शहर अध्यक्षावर अशी वेळ येऊ शकते तर सामान्य जनतेने न्याय कुणाकडे मागावा असा सवालही त्यांनी केला आहे.

तसेच झालेल्या मारहाण प्रकरणी श्री. तुषार गाडे यांनी ॲन्टी करप्शन ब्युरो पुणे व मुंबई, सीबीआय, सीआयडी,  केंद्रीय चौकशी पथक, अखिल महाराष्ट्र गुन्हेगार पुनर्वसन संस्था,महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय एकता सद्भावना प्रतिष्ठान, छत्रपती शासन युवा संघटना, भीमछावा संघटना सलीम बाबा युथ फाऊंडेशनङ्ग मा.दीपकभाऊ मानकर, शहराध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(अजित पवार गट) पुणे शहर., जगन्नाथ बापू शेवाळे,जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) पुणे जिल्हा, आम आदमी पक्ष पुणे शहर, शिवसेना (शिंदे गट) पुणे शहर, शिवसेना (उबाठा) पुणे शहर खासदार सुप्रियाताई सुळे यांना देखील निवेदन दिले आहे.