Friday, January 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस कर्मचाऱ्याला गावगुंडांनी केलेल्या मारहाणीचे प्रकरण दडपण्यासाठीच, पुणे शहर पोलीस दलात बदल्यांचे सत्र…

पुणे/दि/ नॅशनल फोरम प्रतिनिधी/
गणेशोत्सवानंतर पुणे शहर पोलीस दलात डोकी बदलण्याचे, बदल्यांचे वारे वेगाने वाहत आहेत. काल पुणे शहर पोलीस दलात आणखी सात पोलीस निरीक्षक दर्जांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव बदल्यांचे कारण दिले असले तरी, जो अधिकारी मेरीटचे अर्थात गुणवत्तापूर्ण काम करेल त्याला बदली करण्याचा सौम्य झटका देण्याचे काम सध्या पुणे शहर पोलीस आयुक्तालयातून सुरू आहे. ज्या ठिकाणी बदली करण्याचे काहीच कारण नव्हते, तेथे देखील बदल्या करण्यात आलेल्या आहेत. प्रशासकीय कारण म्हणजे काय असते हे आता पुणेकरांना तरी नवीन राहिलेले नाही. आज एकुण सात पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश डॉ. जालिंदर सुपेकर (अपर पोलीस आयुक्त प्रशासन) यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने काढले आहेत. दरम्यान विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस कर्मचाऱ्याला गावगुंडांनी केलेल्या मारहाणीचे प्रकरण दडपण्यासाठीच, पुणे शहर पोलीस दलात बदल्यांचे सत्र सुरू असल्याची गोपनिय माहिती समोर आली आहे.


मागील आठवड्यात करण्यात आलेल्या बदल्या आणि काल करण्यात आलेल्या बदल्यांवरून एकच दिसून येते की, काही अधिकाऱ्यांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी बदली केली आहे तर काही पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा म्हणून बदली देण्यात आली आहे. जिसका बडा आवॉज, त्यांना मोठ्या पदावर व ज्यांच्या लहान आवाज त्यांना काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठविण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. नोकरी तर कुठेही करावी लागणार आहे, यात शंकाच नसली तरी ही शिक्षा कशासाठी हा प्रश्न राहतोच.
अगदीच ताजे उदाहरण घेतले तर श्री. राजेश पुराणिक यांचे घेणे संयुक्तिक ठरेल. धाडसीपणाने त्यांनी पुणे शहरात कर्तृत्व गाजविल्यानंतर, अगदी शुल्लक कारणांवरून त्यांची बदली करण्यात आली. रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या सिंघमला थेट बंदिस्त अशा विशेष शाखेत पाठविण्यात आले. थोडक्यात हेडक्वॉर्टरला पाठविण्यासारखे झाले आहे. शहरातील अवैध धंदे बंद करायला देखील धाडस लागते. ते धाडस श्री. पुराणिक यांच्यात होते, लोणीकाळभोरला कारवाई करणे शक्य नव्हते. एवढच कशाला, भारतीय पोलीस दलातील अधिकाऱ्याला देखील कारवाई करणे शक्य झाले नसते. परंतु तिथे देखील श्री. पुराणिक यांनी कारवाई करून दाखविली होती. तथापी टिव्ही चॅनेलवरील बातमी पाहून पोलीस आयुक्तांनी बदली करणे संयुक्तिक नव्हते.
आमच्या पुण्यात कसे अधिकारी असावेत हा आमच्या पुणेकरांचा विषय आहे, धाडसी काम करणाऱ्यांच्या पाठशी पुणेकर उभे राहतात. त्याबाबत बोलण्याचा आमचा अधिकार अबाधित आहेच. त्यात भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांनी कोलदांडा धालुन, नागरीकांच्या मर्जीविरूद्ध अधिकारी पाठविणे योग्य नाही. गुन्हेगारी व अपराधी वर्तन करणाऱ्या इसमांना काही अधिकारी चांगले वाटतात, तर काही अधिकारी नकोसे वाटतात. मग चांगल्या अधिकाऱ्यांचा काटा वरीष्ठ अधिकारी काढत असतील तर निश्चितच या बदल्यांमागे काहीतरी आहे अशी शंका येते.

  1. श्री. सुनिल धोंडीराम जाधव वरीष्ठ पोलीस निरीक्षक – चंदननगर पोलीस स्टेशन वरून त्यांची बदली गुन्हे शाखेत केली आहे.
  2. विलास तुळशिराम सोंडे – वरीष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी यांची बदली थेट विमानतळ पोलीस स्टेशन येथे करून त्यांना पदोन्नतीपेक्षा मोठे बक्षीस पोलीस आयुक्तांनी दिले आहे.
  3. भरत शिवाजी जाधव – वरीष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ यांची बदली थेट विशेष शाखेत करण्यात आली आहे. विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत एका पोलीस कर्मचाऱ्याला लोहगाव येथील काही गावगुंडांनी जबर मारहाण केली आहे. ती बातमी अद्याप पर्यंत प्रकाशित झाली नाही. ते सगळे प्रकरण स्वतःवर शेकणार म्हणून त्यांनी स्वतःहून विशेष शाखेत बदली करवुन घेतली असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्याला लोहगावात मारहाण झाली, त्यांच्याशी अद्याप पर्यंत संपर्क झालेला नाही.
  4. श्री. राजेंद्र लांडगे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना यांची बदली चंदननगर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. कोरोना व गणेशोत्सव काळात अतिश मोलाची कामगिरी श्री. लांडगे यांनी पार पाडली, त्यांना शहरातून काढून शहराबाहेर सोडले आहे.
  5. संगिता जाधव – खडकी पोलीस स्टेशन गुन्हे निरीक्षक यांची बदली वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बिबवेवाडी येथे करण्यात आली आहे. आश्चर्य करण्यासारखी बाब आहे असेच म्हणावे लागेल.
  6. प्रकाश पासलकर – यांची बदली विशेष शाखेतून पोलीस निरीक्षक गुन्हे सहकारनगर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे.
  7. शब्बीर सत्तार सय्यद – पोलीस निरीक्षक गुन्हे फरासखाना यांची बदली, अंतर्गत पदोन्नतीने आहे त्याच जागेवर अर्थात वरीष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना येथे करण्यात आली आहे. शब्बीरभाईं बद्दल आत्ताच मत व्यक्त होणार नाही ते पुढे पाहू.
  8. श्री. राजु थानसिंग चव्हाण- पोलीस निरीक्षक विशेष शाखा यांची पोलीस निरीक्षक गुन्हे सरकार येथे नेमणूक केली आहे. तथापी काही कारणास्तव सहकारनगर ऐवजी त्यांची बदली वाहतूक शाखेत करण्यात आली आहे. सगळ्या बदल्या ठरवुन केल्या आहेत. विमानतळ पोलीस स्टेशन येथील प्रकार गंभिर आहे. प्रकरण बाहेर आल्यास, राज्य शासनाला उत्तर दयावी लागणार आहेत. प्रशासकीय कारणास्तव अशा बदल्या असतात हे आता नव्यानेच समजले आहे.