Thursday, April 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

खाजगी सुरक्षा रक्षक नवीन टेंडर मध्ये, निविदा मंजुर करण्यासाठी 1 कोटीची मागणी करणाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करा

पुणे महापालिकेतील खाजगी सुरक्षा रक्षकांना, सेवेत कायम करण्याची मागणी
खाजगी सुरक्षा रक्षक नवीन टेंडर मध्ये, निविदा मंजुर करण्यासाठी 1 कोटीची मागणी करणाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करा
पुणे/दि/ नॅशनल फोरम/प्रतिनिधी/
पुणे महानगरपालिकेतील खाजगी सुरक्षा रक्षकांना मागील पाच महिन्यांपासून पगार मिळाले नसल्यामुळे सगळीकडे हाःहाःकार उडाला आहे. ज्या खाजगी सावकरांकडून हात उसने पैसे घेतले होते, त्यांनी पैसे परत मिळण्यासाठी तगादा लावला आहे. नातेवाईक देखील पैसे देण्यास हात आखडता घेत आहेत, मुलांच्या शाळेचे पैसे भरायचे आहेत, कपडे नाहीत, पुस्तके नाहीत, एक वेळचं जेवण करून संपूर्ण दिवसभर उपाशी रहावे लागत आहे इत्यादी… इत्यादी सारख्या अनेक प्रश्नांनी खाजगी सुरक्षा रक्षकांनी नॅशनल फोरम कडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काही सुरक्षा रक्षकांनी तर, काहीतरी करुन पगार मिळावा अशी विनंती आहे. खाजगी सुरक्षा रक्षकांच्या बातमीने संपूर्ण महापालिकेच्या मिळकतींची सुरक्षा करणाऱ्या सेवकांनी आपल्या भावानांचा बांध तोडत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे नवीन टेंडर प्रक्रिया जेंव्हा होईल तेंव्हा होईल, परंतु सध्या तरी खाजगी सुरक्षा रक्षकांना त्यांची उपजिविका करण्यासाठी तरी पुणे महापालिकेने माणूकीचा हात पुढे करण्याची मागणी होत आहे.


नवीन टेंडर प्रक्रिया आणि टक्केवारीचा घोळ –
पुणे महापालिकेतील खाजगी सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नांशी संबंधित असलेले उपायुक्त श्री. माधव जगताप, अतिरिक्त आयुक्त श्री. कुणाल खेमणार यांची भेट घेवून खाजगी सुरक्षा रक्षकांच्या समस्या नॅशनल फोरमने त्यांच्यापुढे मांडल्या होत्या. त्यावेळी श्री. माधव जगताप व श्री. कुणाल कुमार यांनी सध्या कार्यरत असलेल्या एजन्सीबाबत अनेक तक्रारी आल्याने त्यांचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. तसेच खाजगी सुरक्षा रक्षकांच्या नवीन टेंडरची स्क्रुटीनी झाली असल्याचे सांगितले होते.
तथापी मागील आठवड्यात नवीन टेंडर प्रक्रियेची माहिती घेतांना समोर आलेले वास्तव अतिशय धक्कादायक आहे. खाजगी सुरक्षा रक्षकांच्या नवीन टेंडर मध्ये क्रिस्टल या कंपनीने छुपा प्रवेश केला आहे हे उघड असले तरी नवीन टेंडरनुसार निविदा मंजुर करण्यासाठी कामगार कल्याण अधिकारी यांनी सुमारे 50 लाख ते एक कोटीची मागणी केली असल्याचे समोर आले आहे.
तसेच सुरक्षा अधिकारी श्री. राकेश विटकर हे देखील पैसे मागत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही बाब खरी आहे की अन्य याची चौकशी महापालिका आयुक्तां मार्फत करावी असे नॅशनल फोरमचे वार्ताहर श्री. श्रीनाथ चव्हाण यांनी नमूद केंल आहे. त्यामुळे वास्तवातील चित्र अतिशय भयानक असल्याचे दिसून येत आहे.
सध्या कार्यरत असलेल्या एजन्सी विरूद्ध अनेक तक्रारी असतांना देखील त्या कंपनीने दुसऱ्या संस्थेच्या नावाने टेंडर भरले असल्याची चर्चा आहे. उदया याच ठेकेदाराने नवीन टेंडर मिळण्यासाठी अधिकाऱ्यांना टक्केवारी देवून पुन्हा टेंडर स्वतःचे बाजुने मंजुर करून घेतले तर समस्या अजुन जटील होणार आहेत. त्यामुळे नवीन टेंडर मंजुर करतांना सगळ्या बाबींची तपासणी होणे आवश्यक आहे. या शिवाय जुन्या एजन्सीने कुणा संस्थेबरोबर संगनमत करून पुनः महापालिकेतील सुरक्षा रक्षकांचे टेंडर मिळविण्यासाठी ताकद लावली आहे किंवा कसे हे पाहणे आवश्यक आहे.
दरम्यान टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल तेंव्हा होईल, परंतु सध्या कार्यरत असलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकांना त्यांचे दैनंदिन जीवन जगण्यापुरते तरी वेतन देण्याची विनंती होत आहे. तसेच पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांचेशी चर्चा करून सध्याच्या खाजगी सुरक्षा रक्षकांची नोंद त्यांच्याकडे शासकीय नियमानुसार करण्याची देखील मागणीह होत आहे.