Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

जुगाऱ्यांकडून राजेश पुराणिक यांच्या बदलीसाठी देव पाण्यात ठेवले

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांची बदली कधी होणार… 1 जुलैला नक्की बदली होणार… सरकार बदलले आहे, नक्की बदली होणार… कोण अजबच तर्क लावत आहेत, काय म्हणे, साहेब रिटायर्ट होणार आहेत… संपूर्ण पुणे शहरात जुगार अड्डा मालकांनी राजेश पुराणिक यांचा धसका घेतला आहे. एक एक अटकळी बांधत आहेत.
ही शासनाची यंत्रणा आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या ह्या ठरलेल्या असतात. परंतु जिथे बदली व पदस्थापना दिली जाते तिथे किती अधिकारी, पदाचा अधिकार वापरत असतात हे आपण पाहतच आहोत. दरम्यान शंभरात एक तरी पुराणिक यांच्या सारखे लढवय्ये असतातच.
बदली जेंव्हा होईल तेंव्हा होईल. त्यांच्या बदलीसाठी देव पाण्यात ठेवून बसलेले पुण्यात काही कमी नाहीत हे देखील तितकेच खरे आहे. श्री. राजेश पुराणिक यांच्या बदलीसाठी पुण्यातून विशिष्ठ स्वरूपाची ताकद लावली गेली असल्याचे समजते. थेट महासंचालनालयात जातांना हायकोर्टाच्या कॅन्टीनसह सम्राट पर्यंत कुणी कुणी खलबते केली आहेत त्याची वार्ता आता पसरत आहे. दरम्यान गृहमंत्रालयपर्यंत पाहोचण्याच्या आतच सरकारवर गडांतर आले आहे. आता बदलीसाठी आकांत करणारे देखील राजकीय वाताहत पाहून हवालदिल झाले आहेत. बदली होईल तेंव्हा होईल परंतु पुणे शहर स्वच्छ करण्याचा विडा पुराणिकांनी उचलला आहे एवढं मात्र नक्की.