Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शिवाजीनगर पोलीस हेडक्वॉर्टरला जुगार अड्डा-वेश्याव्यवसायाचा विळखा,

5 लाखांच्या मुद्देमालांसह 55 आरोपींविरूद्ध कारवाईला-
100 दिवस उलटण्याच्या आतच
गांधी जयंतीपासून- अवैध धंदयाचा (कु)आरंभ….
पुणे महानगरपालिकेच्या बाहेरच जुगार अड्ड्यांचा बाजार भरला,

पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, सहआयुक्त श्री. रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाटगे, पोलीस उपआयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाने 19 जुलै 2022 रोजी कारवाई केली….
…. आता 2 ऑक्टोंबर 2022 रोजी पासून कुणाच्या आदेशानुसार अवैध व बेकादेशिर धंदे सुरू झाले….?

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी 19 जुलै 2022 रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील ऑनलाईन लॉटरी जुगार, मटका अड्डे, लॉजमध्ये सुरू असणारा वेश्याव्यवसाय यांच्या विरूद्ध धडक कारवाई करून सुमारे 5 लाखांच्या मुद्देमालासह 55 आरोपींविरूद्ध कठोर कारवाई करण्यात आली होती. तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 107/22 नुसार गुन्हा दाखल करून आरोपींविरूद्ध भादवी, जुगार प्रतिबंध कायदा व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कायदयानुसार गुन्ह दाखल करण्यात आला होता. तथापी महात्मा गांधी जयंती दिन 2 ऑक्टोंबर 2022 रोजीपासून शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा अवैध व बेकायदेशिर धंदे सुरू झाले असल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील, पोलीस हेडक्वॉर्टर, आकाशवाणी, माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्ड, साखर संकुल, एलआयसी सारखी अति संवेदनशिल ठिकाणे असतांना देखील, या भागात अवैध व बेकायदेशिर धंदे थाटल्याने, अतिसंवेदनशिल ठिकाणांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

महात्मा गांधी जयंती पासून शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत पुनः जुगार अड्डे, मटका अड्डे, तसेच ऑनलॉटरीच्या नावाखाली सुरू असलेला जुगार, लॉज मधील वेश्याव्यवसायाने पुनः डोके वर काढले आहे. 

महाराष्ट्र शासनाची फसवणूक व आर्थिक नुकसान करून सुरू असलेले 14 ऑनलाईन लॉटरी जुगार अड्डे –
पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या लगत असलेल्या रामसर बेकरी ते अलोक रेस्टोबार व सिंध पंजाब हॉटेलच्या एकाच लाईनीत एकुण 14 दुकानांमधुन ऑनलाईन लॉटरी, पणती- पाकोळी सारखे जुगारावर पैसे लावुन खेळले जात आहेत. महाराष्ट्र शासनाची फसवणूक करून, सरकारची आर्थिक नुकसान करून अशा प्रकारचे अवैध व बेकादेशिर धंदे शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत सुरू आहेत सलग 3 दिवस पोलीस नियंत्रण कक्षाला वेगवेगळ्या संस्थांनी कॉल करून देखील अवैध धंदे आजही सुरू आहेत.

महाभारतातील कौरव-पांडवांच्या गिर्दीचा जुगार- प्रत्यक्षात अवतरला भैय्यावाडीतील शिंदेच्या घरात –
2 ऑक्टोंबर 2022 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील, दळवी हॉस्पीटलमागील भैय्यावाडीतील राजु शिंदे यांच्या घरात मोठ्ठा जुगार अड्डा सुरू झाला आहे. महाभारतातील कौरव – पांडवांचे युद्ध ज्या जुगारापासून सुरू झाले, द्रौपदी मातेचे वस्त्रहरण ज्या जुगारामुळे झाले, त्याच गिर्दी चा जुगार या ठिकाणी सुरू झाला आहे. 24 बाय 7 असा हा धंदा सुरू असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये मध्यवर्ती पुणे शहरातील एका कुप्रसिद्ध व्यक्तीचा हा धंदा असल्याचे सांगितले जात आहे.

एस.टी स्टँड समोरील मटका अड्डा –
जुन्या शिवाजीनगर एस. टी. स्टँड समोर देखील मटक्याचा अड्डा चालविला जात असल्याचे दिसून आले आहे.

अबबऽऽ…. वेश्याव्यवसायाची साखळी पहा –
शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत सध्या ठुबे पार्क, बांबु हाऊस , पार्क हॉटेल, सफारी सहित अन्य छोट्या मोठ्या सर्व हॉटेल कम लॉजेस मध्ये वेश्याव्यवायाने उग्र स्वरूप धारण केले असल्याचे दिसून येत आहे. सध्या येथे मेट्रोचे काम सुरू असल्याने अनेक बडे आंबटशौकिन प्रस्थ या ठिकाणी रंगरलिया साजरा करण्यासाठी येत असल्याचे अनेकांनी सांगितले आहे.
(क्रमशः) सोमवारी नॅशनल फोरमच्या अंकात – शिवाजीनगर मधील बेकायदेशिर व गैरकृत्यांचा थेट पंचनामा…