
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार आरोपी गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून एमपीडीए व मकोका अन्वये कारवाया केल्या जात आहेत. तथापि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार करण्यात आलेल्या आरोपी गुन्हेगारांचा पुणे शहरात मुक्तपणे संचार असल्याचे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन यांनी केलेल्या कारवाईवरून दिसून आलेले आहे.
सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील तडीपार आरोपीचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ने केला पर्दाफाश-
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत दिवसा व मध्यरात्री लुटालुटीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. असेच प्रकरण 28 एप्रिल 2023 रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत घडले होते. 28 एप्रिल 2023 रोजी डीपी कलेक्शन समोर चिंतामणी ज्ञानपीठ येथील रोडवर फिर्यादी त्यांची चार चाकी वाहन पार्क करून लघुशंका करण्यासाठी थांबले असता, तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या जवळ येऊन फिर्यादी यांना मारहाण करून शिवीगाळ करून त्यांच्याकडील 25 हजार 300 रुपयांची एक सोन्याची चैन व मोबाईल फोन व रोख रक्कम जबरदस्तीने चोरी केली आहे. तसेच याच तीन इसमांनी चिंतामणी ज्ञानपीठ समोरून सहफिर्यादी टँकर चालक यांचा दोन हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरी केला म्हणून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुण्यातील अज्ञात आरोपींचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार शोध घेत असताना पोलीस अंमलदार अभिनय चौधरी, अवधूत जमदाडे व मितेश चोरमले यांना गोपनीय माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी समीर शेख, सिद्धार्थ गायकवाड व त्याचा एक साथीदार असे तिघांनी मिळून एका कारचालकास लुटले आहे . भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याचा शोध घेतलेला असता पुणे सातारा रस्त्यावरील वाळवेकर लॉन्स ट्रेझस पॉइंट शेजारील नाल्याच्या पुलाजवळ आरोपी क्रमांक 1. समीर रज्जाक शेख वय-23 वर्ष, रा. अण्णाभाऊ साठे नगर, अरण्येश्वर पुणे 2. सिद्धार्थ विजय गायकवाड वय- 21 वर्ष, रा. अण्णाभाऊ साठे नगर अरणेश्वर पुणे हे मिळून आल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
अटके दरम्यान आरोपींकडे तपास करीत असताना आरोपी सिद्धार्थ विजय गायकवाड वय- 21 वर्ष हा तडीपार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून पुण्यातील चोरी केलेली तीस हजार रुपये किमतीची सोन्याची चैन जप्त करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे पुणे शहरामध्ये राजरोसपणे तडीपार आरोपी गुन्हेगार मुक्तपणे संचार करीत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आलेले आहे. पुणे शहरात ऑल आउट, कोंबिंग ऑपरेशन करीत असताना देखील काही शेकड्याच्या घरामध्ये तडीपार गुन्हेगार पुणे शहरात आढळून आले असल्याचे पुणे शहर पोलीस आयुक्तालय ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केलेले असते.
दरम्यान स्थानिक पोलीस स्टेशन यांनी तडीपार गुन्हेगारांचा आरोपींचा वेळोवेळी आढावा घेऊन त्याबाबत वरिष्ठ कार्यालयांना अवगत करण्याच्या सूचना पुणे शहर पोलीस आयुक्तलांने यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत. तथापि स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडून तडीपार गुन्हेगार यांच्याबाबत कुठलीही दखल घेत नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आलेले आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन यांच्याकडील ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणिक सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलीस अंमलदार अभिनय चौधरी, अवधूत जमदाडे, सचिन सरपाले, निलेश ढमढेरे, चेतन गोरे, हर्षल शिंदे, सचिन गाडे, मंगेश पवार, धनाजी धोत्रे, अभिजीत जाधव, शैलेश साठे, निलेश खैरमोडे, नितेश चोरमले, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे