Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

फरासखाना 81 तर सहकारनगर 82 …. शांतताप्रिय पुणे शहराने गाठली मोक्काची शंभरी… भाईगिरीचा नाद, पोलीसांनी घातली पेकाटात लाथ, आता बसा जर्मनच्या थाळ्या वाजवत जेलच्या आत

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
आम्ही इथले भाई आहोत, आता एक एकेला मारून टाकु म्हणत हवेत तलवारी आणि लोखंडी हत्यार फिरविणाऱ्या भाई आणि भाईच्या नम्रकारींना पुणे पोलीसांची चांगलीच पेकाटात लाथ घातली आहे. कालपर्यंत शांतताप्रिय समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात मोक्का कायदयाने शंभरी गाठत आणली आहे. काल फराखान्यात ऐक्क्यांशी तर सहकारनगरात 82 वी मोक्काची कारवाई झाली आहे. आता तरी भाईगिरीचा नाद करून पुणे पोलीसांना आव्हान देणाऱ्या व कायदया व सुव्यस्थेचे तीन तेरा करणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडविली असल्याचे आजच्या कारवाईवरून दिसून येत आहे.

भाईगिरीचा छंद बाळगणाऱ्यांनी लक्षात ठेवल पाहिजे –

  1. गुन्हेगारीचा एकदा शिक्का लागला की पुढील 30 वर्ष पोलीस रेकॉर्डला नाव राहते असे सांगितले जाते.
  2. कुठेही सरकारी तर सोडाच परंतु खाजगी नोकरीही मिळणार नाही.
  3. चारित्र्य पडताळणीत गुन्हेगार म्हणूनच उल्लेख होणार
  4. कुणीही कामावर ठेवणार नाही, व्यवसाय धंदा करायचा म्हटला तरी पायरीवरही कुणी उभे करणार नाही.
  5. भाईगिरीचा तो काळ गेला. आता केवळ गळ्यात सोन्याच्या साखळ्या घातलेले दिसत असले तरी ती जेल मधील फाँसीका फंदा म्हणूनच मिरवित असतात. उगाच पिवळ्या रंगावर जाऊ नका.
  6. नोकरी नाही, धंदा नाही मग पुढे काय… तर भाईच्या मटका, जुगार अड्डयावर पंटर, रायटर म्हणून काम कराव लागेल. भाईच्या बुटापासून ते गाडीपर्यंत पुसून द्याव लागेल. कदाचित भाईचा गेम झाला तर दुसरा तयारच असणार, त्यामुळे मुळशी पॅटर्न हे चित्रपटात शोभुन दिसते. वास्तवात नाही.
  7. पोलीसांना कलम माहिती नसतील, परंतु गुन्हेगारांना मात्र कलम पाठ आहेत, मग कशाला गुन्हेगारीचा शिक्का मारून घ्यायचा आहे.
  8. नम्रकारी वेगैरे काही नाही. जुन्या काळातील तमाशामध्ये एक नाच्या असायचा. अगदी, तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा कमीच किंमत नम्रकारीची असते, असे बऱ्याच अनुभवावरून दिसून आले आहे. (नाच्या, सोंगाड्या यांचा अवमान करायचा नाही परंतु सामाजात पारंपारीकपणे ज्या प्रकारची वागणूक नाच्यासह सोंगाड्याला दिली आहे, त्याचे उदाहरण म्हणून इथे दिले आहे)

फरासखाना पोलीस स्टेशनची कामगिरी-
फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत दि 15/10/2023 रोजी फिर्यादी हे त्यांचे बुधवार पेठ येथील दत्त मंदिराच्या लगत असलेल्या गल्लीतील व्हिडीओ पार्लरचे दुकानात त्यांच्या कामगारांसह व्यवसाय करीत असताना तीन अनोळखी इसम हे हातामध्ये लोखंडी तलवार घेवून दुकानात अचानक घुसले व त्यांनी फिर्यादी व त्यांचे कामगार ज्यांना शिवीगाळ करत त्यांना तलवारीचा धाक दाखवून व जीवे मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने गल्ल्यामधील रोख 5360/- रु. रक्कम चोरून नेली. त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फरासखाना पोलीस ठाणे गुरनं. 210/2023 भादंवि कलम 392, 504 व 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

आरोपींची पुनः लुटालुट-
दरम्यान फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा दि.19/10/2023 रोजी व्हिडीओ पार्लर बाहेरील पानटपरीवर व्यवसाय करत असतांना एकूण 06 अनोळखी इसम हे आले त्यापैकी 3 अनोळखी इसम हे हातामध्ये लोखंडी हत्यार घेवून व्हीडीओ गेम सेंटरमध्ये येवुन आज एक-एकाला मारुन टाकु असे म्हणून त्याच्या जवळ असलेले लोखंडी हत्यार हवेत फिरवुन त्यांची दहशत पाहुन आजुबाजूस असलेले लोक हे भिती पोटी पळून गेले. तसेच इतर 03 अनोळखी इसम हे साक्षीदाराच्या पानटपरी जवळ येवुन टपरीतील गल्यामधील रोख 1750/-( एक हजार सातशे पन्नास) रुपये काढून घेवुन मोठ मोठ्याने आरडा-ओरडा व दहशत निर्माण करीत पळून गेले.

फरासखाना पोलीसांनी केलेल्या तपासावरून नमुद गुन्हयात 05 आरोपींचा सहभाग असल्याचे निष्णन्न झाल्याने संबंधितांविरूद्ध भादंवि कलम 399 आर्म ॲक्ट 4 (25), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1) 135 व क्रिमीनल लॉ अमेंडमेंट कलम 7 अशी कलम वाढ करण्यात आली आहे.
दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना यातील आरोपी 1) किरण रमेश गालफाडे, वय 24 वर्षे, रा. 226, मंगळवार पेठ, पुणे व 2) जतिन संतोष पवार, वय 21 वर्षे, रा. बिबवेवाडी, पुणे 3) अक्षय संजय सगळगिळे, वय 20 वर्षे, रा. लोहगांव, पुणे (टोळी सदस्य) यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्याउ आलेली आहे. तसेच 1) रोहन जयदीप चव्हाण (टोळी प्रमुख) 2) ऋषिकेश फुलचंद खेलिया, वय 21 वर्षे, रा. लोहगांव, पुणे 3) रोहन चव्हाणचा एक साथीदार हे पाहिजे आरोपी आहेत.

या गुन्हयाचा तपास करीत असताना व आरोपींचे पूर्व रेकॉर्ड पाहणी करता टोळी प्रमुख रोहन जयदीप चव्हाण याने संघटीत टोळी तयार केली असुन त्यामध्ये वेगवेगळ्या साथीदारांना घेवुन टोळीच्या आर्थिक फायदयासाठी परिसरात वर्चस्व अबाधित राखण्यासाठी दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न करणे अशा प्रकाराचे गुन्हे केले आहेत. तसेच या टोळीने पुणे शहरामध्ये आपल्या टोळीची दहशत निर्माण केली आहे. त्यांच्या विरुध्द पुणे शहरातील वेग-वेगळ्या पोलीस ठाण्यास गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यांचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत..

अखेर प्रस्ताव मान्य झाला –
दाखल गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3(1) ()3 (2) 3(4) अंतर्भाव करणेकामी फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दादासाहेब चुडाप्पा यांनी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1 श्री. संदिपसिंह गिल यांचे मार्फतीने अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील यांचे कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावाची छाननी करून फरासखाना पोलीस ठाणे गु.र.नं 210 / 2023. मा. दं.वि. कलम 395,504, 506 भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) सह 135.क्रिमिनल लॉ अमेंटमेंट कलम 7 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3 (1) () 3 (2) 3 (4) अंतर्भाव करण्याची मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील यांनी मान्यता दिलेली आहे.

कारवाईचे शिलेदार –
ही कारवाई फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दादासाहेब चुडाप्पा, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. मंगेश जगताप व श्रीमती अनिता हिवरकर, सहा. पोलीस निरीक्षक, वैभव गायकवाड, पोलीस उप-निरीक्षक, निलेश मोकाशी, निगराणी पथकातील पोलीस अंमलदार, तुषार खडके, अजित शिंदे, पंकज देशमुख व शशिकांत ननावरे यांनी केलेली आहे.

सहकारनगर पोलीस स्टेशन –
भांडणे मिटवण्यसााठी बोलावले असता मारहाण करुन एकावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच आम्ही इथले भाई आहोत असे म्हणत हातातील कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत पसरवल्याची घटना 25 ऑक्टोबर रोजी बालाजीनगर येथील के.के. मार्केट येथे घडली होती. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात भादवी 307,323,504,506,34, सह आर्म ॲक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी सलमान उर्फ सल्या हमीद शेख(वय-23 रा. बालाजीनगर, पुणे), वैभव उर्फ बबलु उर्फ मनोज विवेक कोठारी (वय-27 रा. काशीनाथ पाटील नगर, धनकवडी) यांना अटक केली आहे. तर टोळी प्रमुख सनी शंकर जाधव (वय-21 रा. चैत्रबन वसाहत, अप्पर बिबवेवाडी, पुणे) हा फरार आहे.
आरोपी सनी जाधव व इतर साथीदारांनी संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली. टोळीचे धनकवडी परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आरोपींनी सहकारनगर व बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, दरोडा, मनुष्यवधाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, लोकांमध्ये हल्ले करणे, घातक शस्त्र बाळगणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अखेर प्रस्ताव मान्य झाला-
सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम3 (1)(), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी परिमंडळ- 2 पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील यांना सादर केला होता.या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.

कामगिरीचे शिलेदार –
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे संदिप देशमाने, पोलीस अंमलदार संजय गायकवाड, मंगेश खेडकर, पुजा तिडके, भाऊसाहेब आहेर यांच्या पथकाने केली.