Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

खडक पोलीस स्टेशन मध्ये डीओंची दादागिरी, जो देगा उसका भला, जो नही देगा … तो आगे चला..

khadak police pune

खडक पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकाऱ्यांची पाचही बोटे तुपातच असतात हे खरे आहे काय…

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
पुणे शहरातील बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुले हातात कोयता, हॉकीस्टीक सारखी हत्यारे घेवून दहशत माजवित सुटले आहेत. चिल्लर पार्टी सारखी वानर सेना संपूर्ण शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेला आग लावत सुटली आहेत. सगळीकडे दशहतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुख्यात असलेल्या गुन्हेगारांच्या टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. असे असतांना खडक पोलीस स्टेशन मधील डीओंची दादागिरी समोर आली असुन अनेक पोलीस कर्मचारी त्रस्त झाले असल्याची माहिती नॅशनल फोरमला मिळाली आहे. त्यामुळे त्या दादागिरी करणाऱ्या डीओंवर सहायक पोलीस आयुक्त किंवा उपआयुक्तांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

नॅशनल फोरम प्रतिनिधीला दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 1 यांच्या अधिनस्थ खडक पोलीस स्टेशन असून, त्यामध्ये अंतर्गत वाद सातत्याने पेटत असल्याचे समोर आले आहे. मध्यंतरी, वरीष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदली प्रकरणांत एका पोलीस कर्मचाऱ्याने थेटच पोलस निरीक्षकांवर सोशलमिडीयाच्या माध्यमांतून तोंडसुख घेतले होते. त्यात त्यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना उद्देशून, तुमची पाचही बोटे तुपात आणि आम्ही मात्र कोरडे राहिलो असल्याचे विधान त्यावेळस सोशल मिडीयावर झळकले होते. काही खाजगी वृत्तवाहीन्यांनी देखील हे वृत्त प्रसारित केले होते. 
अगदी तसाच प्रकार सध्या खडक पोलीस स्टेशन मध्ये समोर आला आहे. खडक पोलीस स्टेशन मधील ड्युटी ऑफिसर पोलीस कर्मचाऱ्यांची तोंडे पाहून ड्युटी वाटप करीत असल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. काही विशिष्ठ पोलीसांना कायम क्रिमी पॉईंट दिले जात आहेत, तर काही पोलीसांना कायम दर्गा, मंदिर, मस्जिद, राजकीय पक्षांचा कार्यक्रम, आमदार मंत्र्यांचे कार्यक्रमात बंदोबस्तावर पाठविले जाते. काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांना तर सातत्याने नाईट ड्युटी दिली जाते, तर काहींना जाणुन बुजून नाईट ड्युटी दिल्या जात आहेत. काही कर्मचारी तर कर्तव्यावर हजर नसतांना देखील हजेरी मांडून दिवस-दिवसभर गायब असतात. अशी काही पोलीस कर्मचाऱ्यांची ओरड आहे. 
दरम्यान यामागचे कारण मिमांसा विचारली असता, जो देगा उसका भला आणि जो नही देगा, तो आगे चला... अशी आजची खडक पोलीस स्टेशनची अवस्था असल्याचे सांगितले जात आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना ही बाब माहिती असतांना देखील त्यांच्याच आशिर्वादाने हा प्रकार सुरू असल्याचे काही पोलीस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. वस्तुस्थिती काय आहे हे आता पोलीस उपआयुक्त कार्यालयाने साप्ताहिक मासिक बैठकीत जाणून घेणे आवश्यक आहे. 

सिंहगड-भारतीचे पार्सल खडकमध्ये नकोच –
सिंहगड मध्ये आठ महिने, भारतीमध्ये तीन महिने आणि आता थेट खडकमध्ये कर्तव्यावर. ह्यांच्याच बदल्या लगेच कशा होतात, ज्यांना पाहिजे तिथेच बदली कशी होते अशी जब्बरी ओरड होत असून, सिंहगड भारतीचे पार्सल खडक मध्ये नको म्हणून अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी टाहो फोडला आहे. खरं तर त्या कामासाठी माझा हक्क प्रथम होता, मीच इथ जुना आहे, त्यामुळे मला न्याय मिळणे आवश्यक होते. त्याकामासाठी मी देखील इच्छुक आहे, मी जवळच राहत आहे, त्यामुळे आमा एवढ्या वर्षाने तरी मला न्याय मिळणे आवश्यक आहे, या सारखी देखील मोठ्ठी कारणे समोर येत आहेत.
सध्या पुण्यामध्ये पिंटू भाई, पप्पुभाई, पिंटू भाई यांनी दहशत माजविली आहे. त्यामुळे खात्यांतर्गत अशा प्रकारची धुसूपुस योग्य नाही. तसेच प्रत्येक मुद्यावर बातमी करणे देखील योग्य वाटत नाही. केवळ आपल्या भावना वरीष्ठांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने खरं तर ही बातमी दिली आहे.

खडक वरीष्ठांची पाचही बोटे तुपात कशी असतात –
खडक हद्दीतील राजेवाडी, कासेवाडी, लोहियानगर, गंजपेठ, खडकमाळ या गरीब व अठराविश्व दारिद्र असलेल्या ठिकाणी सुरू असलेले हातभट्टीचे उद्योग, मटका जुगार अड्डयांचे उद्योग,ऑनलाईन लॉटरी जुगाराचे उद्योग शेख, ढावरे व अन्य मार्फत होत असल्याचे नमूद आहे. खडक वरीष्ठ पोलीसांची बोटे कायम तुपात कशी असतात याचा आढावा पुढील बातमीत घेवू. तुर्तास इतकेच.