Wednesday, February 8 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: dcpzon1pune

पुणे शहरातील उपनगरापाठोपाठ मध्यवर्ती शहरातील लष्करसह शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत कोयता गँगचा धुडगूस

पुणे शहरातील उपनगरापाठोपाठ मध्यवर्ती शहरातील लष्करसह शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत कोयता गँगचा धुडगूस

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे काय, कायदयाचा आणि पोलीसांचा धाक कुठे नाहीसा झाला या विषयावर मागील तीन आठवड्यांपासून गुन्ह्यांच्या घटना आणि कोयता खोरांच्या दहशतीच्या अनुषंगाने नॅशनल फोरमध्ये प्रश्नमालिका सुरू असतांनाच आज लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतही अल्पवयीन मुलांनी दिवसाढवळ्या हातात कोयता घेवून दहशत माजविली आहे. तत्कालिन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी मोक्का आणि एमपीडीए मध्ये प्रत्येकी शतक गाठल्याचा गवगवा केला, परंतु त्याचे उलट परिणाम तर होत नाहीयेत ना ही देखील आज तपासून पाहण्याची वेळ आली आहे. मोक्का, एमपीडीए आणि तडीपारीची होऊन होऊन दोन तीन वर्षे शिक्षा होईल. परंतु आपणही भाई होणार या विषारी अमिषातून तर हे कृत्य पुणे शहरात होत नाहीयेत ना याचीही मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासणी होणे आवश्यक आहे. दरम्यान कायदयाला आणि पोलीसांना आव्हान देणाऱ्यांवर कठोर का...
खडक पोलीस स्टेशन मध्ये डीओंची दादागिरी, जो देगा उसका भला, जो नही देगा … तो आगे चला..

खडक पोलीस स्टेशन मध्ये डीओंची दादागिरी, जो देगा उसका भला, जो नही देगा … तो आगे चला..

पोलीस क्राइम
khadak police pune खडक पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकाऱ्यांची पाचही बोटे तुपातच असतात हे खरे आहे काय… पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरातील बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुले हातात कोयता, हॉकीस्टीक सारखी हत्यारे घेवून दहशत माजवित सुटले आहेत. चिल्लर पार्टी सारखी वानर सेना संपूर्ण शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेला आग लावत सुटली आहेत. सगळीकडे दशहतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुख्यात असलेल्या गुन्हेगारांच्या टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. असे असतांना खडक पोलीस स्टेशन मधील डीओंची दादागिरी समोर आली असुन अनेक पोलीस कर्मचारी त्रस्त झाले असल्याची माहिती नॅशनल फोरमला मिळाली आहे. त्यामुळे त्या दादागिरी करणाऱ्या डीओंवर सहायक पोलीस आयुक्त किंवा उपआयुक्तांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. नॅशनल फोरम प्रतिनिधीला दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 1 ...