Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

कोयता विक्री करणाऱ्यांवर क्राईम ब्रँच युनिट क्र. 1 ची छापेमारी,
निलेश साबळे, अजय थोरात यांची धडक कारवाई,

Crime Branch unite no.1

पुणे/दि/नॅशनल फोरम/
भारती विद्यापीठच्या यंगस्टार पोलीसांनी कोयत्याची दशहत माजविणाऱ्यांना साऊथच्या चित्रपटासारखे ऑन द स्पॉट कायदयाचा बडगा उगारल्यानंतर, आता गुन्हे शाखा युनिट क्र. 1 कडील निलेश साबळे व अजय थोरात यांनी देखील, ज्या कोयत्यांच्या बळावर शहरात, कोयत्याची दहशत माजविली जात आहे, ते कोयते नेमके येतात तरी कुठून याच्या शोधार्थ पेट्रोलिंग करीत असतांना, जुन्या बाजारासह संपूर्ण शहर पालथे घालते. शेवटी फरासखाना हद्दीतील बोहरी आळीत कोयता विक्री करीत असल्याचे आढळुन आल्यानंतर, दे दणादण कारवाई करण्यात आली.


बोहरी आळी येथे सुमारे 105 कोयते जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान जप्त करण्यात आलेले कोयते आणि छापेमारी करून पकडण्यात आलेले कोयत्यात साम्य आढळले असल्याचे दिसून येत आहे. मागील एक महिन्यात संपूर्ण पुणे शहरात कोयत्याची एवढी दहशत माजविली आहे की, हा विषय विरोधी पक्ष नेते श्री. अजित पवार यांना राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडला होता. पुणे शहरात कोयत्याची एकच टोळी नसून, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अल्पवयीन मुलांकडून ही दशहत माजविली जात असल्याचे समोर आले आहे. (सविस्तर बातमी थोड्याच वेळात…)