राहुल गांधी दिल्लीत राहतात, निवडणूक उत्तर प्रदेशातील अमेठीत व आता देशाचे शेवटचे टोक असलेल्या केरळ मधील वायनाड मध्ये निवडणूक लढवित आहेत, हे काँग्रेसवाल्यांना चालते मग आंबेडकर अमरावतीत का चालत नाहीत…काँग्रेस भाजपाचा कपटी डाव ओळखा
नॅशनल फोरम/अमरावती/दि/
राहूल गांधी दिल्लीत राहतात आणि उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा निवडणूकीत उभे राहतात. आता तर अमेठी सोडून ते केरळ मधील वायनाड मध्ये निवडणूकीला उभे राहत आहेत, हे सर्व काँग्रेसवाल्यांना चालते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर हे अमरावती मध्ये उभे राहिल्यानंतर कॉंग्रेसवाल्यांनी थयथयाट सुरू केला आहे. दरम्यान संपूर्ण विदर्भात आंबेडकरी जनतेची प्रत्येक मतदारसंघात मोठी संख्या आहे. स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील भंडारा लोकसभा निवडणूकीत उभे होते. आंबेडकरी घराण्याची व विदर्भाची जवळची नाळ आहे. त्यामुळे आनंदराज आंबेडकर अमरावतीत उभे राहिले तर त्यात नवीन काही नाही. असे असतांना देखील काँग्रेसवाल्यांनी थयथयाट सुरू केला आहे. तसेच मागील काही दिवसात जातीय व धार्मिक वातावरण तयार केले जात आहे. बुद्ध विहारावर गुलाल टाकणे, बुद्ध विहाराची कमान पाडणे तसेच श्रीराम जयंतीच्या दिवशी त्यांचे झेंडे काढलेले नसतांना देखील झेंडे काढल्याचा कांगावा करून जातीय धार्मिक धु्रविकरण करण्याचा प्रयत्न अमरावतीत केला जात आहे. अमरावतीमध्ये काँग्रेस-भाजपाची हातमिळवणी झाली आहे. काहीही करून आंबेडकरी घराण्यातील वंशज आनंदराज आंबेडकर यांना निवडणूकीतून पाडण्याचा चंग बांधला आहे. परंतु अमरावतीमध्ये रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांना एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, ओबीसी बहुजन आघाडीसह सर्व रिपब्लिकन संघटनांनी पाठींबा दिला आहे. त्यात आंबेडकरी मतदान साडेचार लाख असून, मुस्लिम मतदार साडेतीन लाखाच्या आसपास आहेत. ओबीसींची संख्याही लक्षणिय आहेत. त्यामुळे आनंदराज आंबेडकर विजयावर शिक्कामोर्तब करणार हे निश्चित झाल्याने काँग्रेस-भाजपाचे पित्त खवळले आहे. त्यामुळेच अमरावतीमध्ये जातीय-धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे. अशा वेळी आंबेडकरी जनतेने काँग्रेस-भाजपाचे कपटी डाव ओळखुन त्यांना धडा शिकविला पाहिजे.
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीतून पाडल्याचा हिशोब चुकता करणार-
अमरावतीमधील सर्व रिपब्लिकन संघटना, एमआयएम, ओबीसी बहुजन आघाडी आणि वंचित वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांना पाठींबा देवून त्यांच्यासाठी अमरावतीमध्ये प्रस्थापितांविरोधात लढत देत आहेत.
दलित, आदिवासी, ओबीसी, भटक्या विमुक्त, मुस्लिम, ख्रिश्चन या समाजाला लोकसभा व राज्यांच्या विधानमंडळामध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1932 साली पुणे कराराच्या माध्यमातून न्यायहक्क मिळवून घेतले. पुढे भारतीय संविधानामध्ये लोकसभा व विधानसभेत राखीव जागांची तरतूद करून वंचित शोषित, शेतकरी, कष्टकरी वर्गाला पुरेसे प्रतिनिधित्व दिले, तथापि काँग्रेस 60 वर्ष व पुढे आता भाजपाने त्यांच्या पक्षांमध्ये आंबेडकरी चळवळीच्या बाहेरील व त्यांच्याच पक्षातील गुलाम असणाऱ्यांना लोकसभेत, विधानसभेत निवडणुकीला उभे करून राखीव जागेवरून बुजगावणे निवडून आणले. भारतीय संविधानाचा अंमल सुरू झाल्यानंतर आज 75 वर्षात हीच परिस्थिती आहे. वंचित, शोषित, कष्टकरी वर्गातील नेतृत्वाला पुढे येण्याची कधी संधी दिली नाही, या वर्गामध्ये नेतृत्व उभा राहू दिले नाही. या वर्गाला कधीच प्रतिनिधित्व मिळू दिले नाही, त्यामुळे आज बहुजन समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे आज सर्व बहुजन समाज रिपब्लिकन सेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून नेतृत्व करीत आहे. उपेक्षित वर्गातील नेतृत्व पुढे येत असल्याने वंचित बहुजन आघाडीने देखील या वर्गाला पुरेसं प्रतिनिधित्व दिलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र रिपब्लिकन, वंचित विरुद्ध भाजप असा सामना होत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर अमरावती राखीव लोकसभा मतदारसंघाचे रिपब्लिकन सेनेचे उमेदवार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, ओबीसी बहुजन आघाडी सह तमाम रिपब्लिकन संघटनांनी पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. मागील वीस ते पंचवीस दिवसांपासून अमरावतीमध्ये आंबेडकरमय वातावरण झाले आहे. सर्वत्र लाखोंच्या सभा होत आहेत. सर्वत्र आनंदराज आंबेडकर यांना पाठीबा मिळत असल्याने काँग्रेस, भाजपा, शिवसेना व इतर राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत.
रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांच्या लाखोंच्या सभा होत आहेत. नागरिकांचा प्रचंड उत्साह दिसून येत आहे. अमरावतीमध्ये आंबेडकरी जनता व संघटनांचे एकमत झाले आहे. त्यातच मुस्लिम समाज देखील मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. त्यामुळे भेदरलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना यांच्याकडून आंबेडकरी जनतेमध्ये प्रचंड गैरसमज, संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. छोट्या मोठ्या वृत्तपत्रातून, टीव्ही चॅनल मधून, यूट्यूब वरून आंबेडकरी जनतेमध्ये संभ्रम आणि गैरसमज पसरण्याचा प्रयत्न केला जात आहे. तथापि सर्व रिपब्लिकन संघटना, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, ओबीसी बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्या विजयावर अमरावतीच्या जनतेने शिक्कामार्फ केले आहे.
दरम्यान अमरावती असो की अकोला लोकसभा मतदारसंघ. या दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेस, भाजपा, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून आंबेडकरी घराण्यातील उमेदवाराविरुद्ध गरळ ओकत आहेत. सर्व प्रस्थापित भांडवलदार, उद्योगपती, शासन, पोलीस ,प्रशासन एकत्र येऊन आंबेडकरी जनतेवर प्रचंड दबाव निर्माण करीत आहेत. रिपब्लिकन व वंचित मधील कार्यकर्त्यांना टार्गेट केले जात आहे. पोलिसांकडून त्रास दिला जात आहे. प्रस्थापित पक्षांकडून उद्योगपती व भांडवलदारांना हाताशी धरून काही ठिकाणी प्रलोभाने दाखवण्यात येत आहेत. काही ठिकाणी खाकी, काही ठिकाणी कोर्टाचा वापर केला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये अमरावतीमधील आंबेडकरी जनतेने एकजूट दाखवून ज्या काँग्रेसवाल्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वेळा लोकसभा निवडणुकीतून पाडले त्याचा हिशोब चुकता करण्याची सुवर्णसंधी आज अमरावती मधील जनतेला मिळालेली आहे.
अमरावती या राखीव असलेल्या लोकसभा मतदारसंघातून आज आनंदराज आंबेडकर निवडणूक लढवीत आहेत. ते आंबेडकरी घराण्याचे वंशज आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. एक उच्च विद्या विभूषित उमेदवार आहेत. त्यामुळे राखीव जागेचा खरा हेतू साध्य होणे गरजेचे आहे. तथाकथित काँग्रेसची व तथाकथित भाजपच्या बिन बुडाच्या बुजगावण्याला, गुलाम उमेदवाराला मतदान करून आपले मत वाया घालू नये. राखीव जागेचा हेतू साध्य होणे महत्त्वाचा आहे. आनंदराज आंबेडकर यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याची जबाबदारी आज अमरावती मधील आंबेडकरी जतनेची आहे. संविधानासाठी निधड्या छातीने पुढे आलेल्या ओबीसी, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन हे देखील आज संविधानासाठी लढत आहेत. आज जर संविधान टिकवायचे असेल तर आणि लोकशाहीचे सामाजीकरण करण्यासाठी आनंदराव आंबेडकर यांना लोकसभेत पाठवणे काळाची गरज आहे असे आवाहन रिपब्लिकन सेनेच्या वतीने अमरावतीच्या जनतेला करण्यात येत आहे.