Friday, November 15 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

मार्केटयार्ड,बिबवेवाडी,कोंढवा पोलीस स्टेशनच्या माकडचेष्ठा
पोलीस आयुक्त साहेब, आता तुम्हीच सांगा…. गुन्हेगारांवर पोलीसांची दहशत राहणार तरी कशी…

Market Yard, Bibvewadi, Kondhwa Police Station’s monkey check

पुणे/दि/ नॅशनल फोरम प्रतिनिधी/
पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बदलीवर पुणे शहरात आलेल्या नवनियुक्त पोलीस उपआयुक्तांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, पुणे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारांमध्ये पालिसांची दहशत कायम असली पाहिजे. यासाठी प्रत्येक परिमंडळ उपआयुक्तांनी त्यांच्या हद्दीतील टोळ्या, भाईगिरी, दादागिरी करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याचे प्लनिंग करावे. तसेच महिला सुरक्षितता, वाहतूक कोंडी सोडविणे, मार्शलिंग वाढविणे, हद्दीत शांतता ठेवण्यासाठी प्रत्येक पोलीस उपआयुक्त परिमंडळ प्रमुखांनी लक्ष देण्याचे त्यांनी सुचित केले आहे. तसेच नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे शहर पोलीस सदैव कटिबद्ध असून, दादागिरी, गुंडगिरी करणाऱ्या गुन्हेगारंचे रेकॉर्ड तयार करून त्यांच्यावर कारवाई करावी, कुणाचाही मुलहिजा न ठेवता गुन्हेगारीचा बिमोड करण्यास प्राधान्य दयावे तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये महिलांनी दाखल केलेले अर्ज पेंडींग न ठेवता त्यावर तातडीने कारवाई करावी अशा सुचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या आहेत. दरम्यान मार्केटयार्ड, बिबवेवाडी आणि कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील कारभार हा पोलीस आयुक्तांच्या आदेशा विरूद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या पोलीस स्टेशनच्या कामकाजावर नियंत्रण आणण्याची आवश्यता निर्माण झाली आहे.


पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील मार्केटयार्ड, बिबवेवाडी व कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सर्वाधिक गर्भ श्रीमंत व अतिगरीब दारिद्रय रेषेखालील कामगार अशी लोकवस्ती आहे. थोडक्यात अतिगर्भश्रीमंत व अती दरिद्री-गरीब अशा दोन टोकांचा भुप्रदेश आहे.याच भागात सर्वात मोठा व्यापार असला तरी याच भागात सर्वाधिक गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व आहे. या गुन्हेगारी टोळ्यांकडून पंचतारांकित स्वरूपाचे हॉटेल, पब, क्लब चालविले जातात. मटका जुगार अड्डे, हातभट्टी, देशी विदेशी दारूची तस्करी देखील याच भागात अधिक होते. गुटखा आणि गांजा तर संपूर्ण पुणे शहराला याच भागातून पुरवठा होतो. याच धंदयातून गुन्हेगारी टोळ्यांना आर्थिक रसद मिळत आहे. जो पर्यंत या भागातील बेकायदा व अवैध धंदयाची साखळी तोडली जात नाही. तो पर्यंत कायदा आणि सुव्यवस्था ही निव्वळ कागदावर रेखाटल्या सारखी आहे.
कोंढवा पोलीस स्टेशन –
कोंढवा पोलीस स्टेशन मधील पोलीसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन वेळा कारवाई केल्याने, पोलीस आयुक्तांनी, कोंढवा पोलीस स्टेशनचा सर्व कारभार स्वतःकडे वर्गीकृत केला आहे. आता कोंढवा पोलीस स्टेशवर थेटच पोलीस आयुक्तांचे बारीक लक्ष आहे. कोंढव्यामध्ये सर्वाधिक हुक्का पार्लर, गांजा आणि अंमली पदार्थांची मोठी बाजारपेठ उभी राहिली आहे. त्याच बरोबर गुटख्याचे सर्वाधिक मोठे कोठार याच भागात आहेत. थोडक्यात गुन्हेगारी टोळ्यांकडून थेटच मटका, जुगार अड्डे, ऑनलाईन लॉटरी, गांजा व गुटख्यासहित अंमली पदार्थांची विक्री केली जात आहे. हुक्का पार्लर, क्लब च्या माध्यमातून दरदिवशी लाखो कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. गुन्हेगारी टोळ्या देखील याच भागात सर्वाधिक आहेत.
मार्केटयार्ड पोलीस स्टेशन –
आशिया खंडातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आहे. व्यापाऱ्यांच्या मोठ मोठ्या सोसायट्या आहेत. तसेच आनंदनगर, डॉ. आंबेडकर नगर सारख्या गरीब लोकवस्तीच्या झोपडपट्या देखील आहेत. याच भागात मामू आणि अच्छुचा उच्छाद अधिक वाढला आहे. एकाच इसमाचे एकाच वेळी 12 ते 15 मटका जुगार अड्डे, सोरट, गांजासहित अंमली पदार्थांची विक्री केली जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील एकही जागा अशी नाहीये की जिथे अवैध धंदा सुरू नाही. सगळीकडे अवैध धंदे सुरू आहेत. गेट नं 1 असो की 9 नंबर, मटण शॉप असो की, बैल बाजार, गोडसे हॉटेल तर निमंत्रण हॉटेल, आईमाता मंदिर असो की, सिटी प्राईड, आंबेडकर नगर असो की आनंदनगर सगळीकडे याचेच अवैध व बेकायदेशिर धंदे. त्यात कमी म्हणून एक दोन महिला गांजा सहित अंमली पदार्थांची विक्री करतात.
पुढे रमीचे क्लब देखील खड्यासहित गंगाधाम मध्ये धामधुमीत सुरू आहेत. पोलीस कारवाई कुठपर्यंत कारवाई करणार… एका धंदयावर कारवाई झाली तर 10 पैकी 9 धंदे तर चालुच राहणार…. त्यामुळे अच्छूला कुठलाही धरबंद राहिलेला नाही. पोलीसांचे थोडेही नियंत्रण नाही. काल परवा आयुक्तालयास सादरीकरण झाले आहे. सामाजिक सुरक्षेविना हा भाग कोणत्या गुन्हेशाखेकडे दिला जातोय हे पाहणे आवश्यक ठरणार आहे.
बिबवेवाडी पोलीस स्टेशन –
कामगार आणि दारिद्रयरेषेखाली जगणाऱ्या नागरीकांचा हा भाग आहे. कमालीची गरीबी,हातावरचे पोट. बिगारी रोजंदारीचे काम मिळाले तर चुल पेटणार अशी त्यांची अवस्था. त्यातच ओठा, वरची चाळ खालची चाळ, पापळ मध्ये तर गुन्हेगारी टोळ्यांचे सर्वस्व आहे. पार्कींग करून ठेवलेल्या शेकडो दुचाकी वाहनांना एकाच वेळी आगी लावण्याची पहिली घटना ही बिबवेवाडीत घडली. त्यानंतर गाडी जाळण्याचे लोण संपूर्ण शहरभर पसरले आहे. इथेही हातभट्टी आणि गुटख्याचा मोठा बाजार आहे. जाईन त्या गल्ली बोळात रात्रौ हातभट्टी घेवून रस्त्यावर नागरीक दिसून येतील. पुण्यात ड्राय डे असला तरी बिबवेवाडीत ड्राय डे कधीच नसतो. पान टपरी असो की, किराणा दुकान… सगळीकडे गुटखा हमखास मिळतोच. पुढे ऑनलाईन लॉटरी, मटका जुगार अड्डे, पत्ता क्लब हे ओघाने पुढे आलेच. या तीनही पोलीस स्टेशन हद्दीत स्पा मसाज पार्लरच्या नावाने महिला व मुलींचा वापर वेश्याव्यवसायासाठी केला जात आहे. त्यातही स्थानिकांचा सहभाग अधिक आहे. चोऱ्या देखील याच भागात अधिक होतात.
मार्केटयार्ड, बिबवेवाडी आणि कोंढवा पोलीस स्टेशवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने वेगळी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.