Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीतील अलीबाबाच्या गुहेतून 40 चोरांना अटक

कुप्रसिद्ध रॉकी व विकी ॲन्थोनी याचे जुगार अड्ड्यावर छापा कारवाई,
साडेतील लाखाचा मुद्देमाल जप्त
पुणे/दि/नॅशनल फोरम प्रतिनिधी/
दोन नंबरचा धंदा करणारा गॅम्बलर पोलीसांना चकवा देण्यासाठी काय काय करू शकतो हे चंदन नगर पोलीस स्टेशन हद्दीतील जुगार अड्डयावरील कारवाई वरून दिसून आले आहे. सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी या अलीबाबाच्या गुहेचा शोध लावला असून त्यातील 40 चोरांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय सुमारे साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. चंदननगर पोलीस स्टेशनला हा धंदा माहिती नव्हताच असेही म्हणता येणार नसले तरी, राजेश पुराणिक यांच्यासारख्या मातब्बर पोलीस अधिकाऱ्याने पुण्यातील जुगाऱ्यांना चांगलेच हेरले आहे. त्यामुळेच त्यांच्या चाणाक्ष बुद्धीने ही अलीबाबची गुहा शोधण्यात यश आले आहे.


बुधवारी सायंकाळच्या सुमारास अवैध मटक्याच्या धंद्याबाबत मिळालेल्या बातमीनुसार, चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, खराडी नाक्याजवळील अल कुरेशी हॉटेल (लातूर बिर्याणी) च्या मागे, पत्र्याच्या शेडमध्ये, इमारतीच्या रुममध्ये व बाहेर मोटरसायकलवर बसून, सुरू असलेल्या कल्याण मटका व इतर प्रकारचे जुगार, पैशावर गैरकायदेशीररीत्या खेळत व खेळवत असलेचे समजलेने, पंचासमक्ष सदर ठिकाणी रात्रौ 20:35 वा. चे सुमारास छापा टाकून कल्याण मटका व इतर जुगार वगैरे खेळणारे 27 आरोपी, खेळवणारे 6 आरोपी, व पाहीजे आरोपी 7 ( पैकी 2 जुगार अड्डा मालक व 5 पळून गेलेले अनोळखी इसम) असे एकुण 40 इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4(अ), 5 व 12 (अ) अन्वये चंदननगर पोलीस ठाणे येथे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
जुगार अड्ड्यावरील अटक केलेल्या आरोपीची नावे-
अ) मोटार सायकलवर कल्याण मटका जुगार घेणारे/रायटर/मॅनेजर.
1) विश्वनाथ बापूराव तिवारी, वय 32 वर्षे, रा.ठी. लेन नं. 12, तुळजाभवानी गल्ली, खराडी, पुणे (मोटर सायकलवर जुगार घेणारे)
2) विजय गौतम सपकाळ, वय 49 वर्षे, रा. ठी. टाटा गार्डन, सातव गॅरेजच्या पाठीमागे, यश अपार्टमेंट, तळमजला, चंदन नगर, पुणे (मोटार सायकलवर जुगार घेणारे),
3) सुरज कलसिंग अभंग, वय 43 वर्षे, रा. कंजारभाट वस्ती, येरवडा, पुणे, (मोटर सायकलवर जुगार घेणारा)
ब) पत्र्याच्या शेड, इमारतीच्या रुम मधील जुगार घेणारे रायटर
4) शरीफ इस्माईल शेख, वय 35 वर्षे, रा. ठी. 216, मंगळवार पेठ, जुना बाजार, पुणे.
5) दत्ता श्रीमंत गायकवाड, वय 32 वर्षे,
6) संदीप भगवान चौधरी, वय 42 वर्षे,
क) पाहीजे आरोपी, जुगार अड्डा मालक
7) विक्टर उर्फ विकी डॅनियल अँथनी, वय 41 वर्षे, रा.ठी. सर्वे न. 56/3, आपले घर सोसायटी , खराडी, पुणे, धंदा. जुगार अड्डा मालक.
8) लॉरेन्स उर्फ रॉकी (पुर्ण नांव माहीत नाही) खराडी, पुणे ,धंदा जुगार अड्डा मालक.
ड) पैशावर मटका जुगार खेळणारे खेळीं आरोपींची नांवे.
1) सुरेश बबन शिंदे, वय 43 वर्षे, रा.ठी.
2) महावीर मल्हारी माने, वय 32 वर्षे,
3) चेतन ज्ञानेश्वर दोरके, वय 22 वर्षे,
4) जावेद तोलादी बागवान, वय 35 वर्षे,
5) सुरेश देवचंद डोंगरे, वय 42 वर्षे,
6) पंजाब रामभाऊ शिरसाठ, वय 37 वर्षे,
7) अरुण राणू अवचित्ते, वय 36 वर्षे,
8) तोहित फयूम शेख, वय 18 वर्षे,
9) जालिंदर केरु घोरपडे, वय 30 वर्षे,
10) विकास कल्याण धुरंदर, वय 22 वर्षे,
11) नागेश शिवाजी वन्नाळे, वय 26 वर्षे,
12) ज्ञानेश्वर विजय सोनवणे, वय 28 वर्षे,
13) संजय प्रल्हाद शेट्टी, वय 38 वर्षे,
14) कमलाकर शिवाजी गवळी,
15) कैसर लतीफ शेख,
16) अनिल वसंता दिगोळे,
17) सुरेश गोपाल इंगळे, वय 55 वर्षे,
18) सुनिल दगडू राठोड, वय 37 वर्षे,
19) शरद हरिदास मुटे, वय 30 वर्षे,
20) संतोष भानुदास इंदलकर, वय 31 वर्षे,
21) अजय ज्ञानेश्वर खलसे,
22) शंकर रामा लष्करे ,
23) साहेबराव सिताराम मस्के,
24) नागप्पा रामा मस्के, वय 25 वर्षे,
25) संदीप चंद्रकांत थोरात, वय 60 वर्षे,
26) सुब्बा रेड्डी, वय 48 वर्षे,
27) चंद्रकांत महादेव राऊत, वय 27 वर्षे,
28 ते 32) असे 5 अनोळखी इसम घटनास्थळावरुन पळून गेलेले.
अटक/कारवाई करण्यात आलेल्या आरोपीत इसमांकडून, (6 रायटर व 27 खेळी व 2 पाहिजे आरोपी व 5 अनोळखी इसम (पळून गेलेले ) असे एकुण 40 आरोपी) रु.3,50,810/- रु.चा एकुण मुद्देमाल (त्यामध्ये रोख रु. 25, 410/- , तसेच रु. 1,30,500/- किंमतीचे 27 मोबाईल सेट्स व रु. 11,900/- रु चे जुगाराचे साहित्य, 1,83,000/- रु किमतीच्या 6 मोटर सायकल्स) हस्तगत करण्यात आला आहे.
अटक/कारवाई केलेल्या आरोपी विरुद्ध चंदन नगर पोलिस स्टेशन येथे गु. र. क्र. 237 /2022, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4 अ, 5 व 12 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही तर अलीबाबाची गुहाच..!
खराडी नाक्या पासून अवघ्या 200 मिटर अंतरावर सुरु असलेला हा जुगाराचा अड्डा बाहेरुन बघीतला तर नवख्या माणसाला ओळखू न येणारा असा आहे. खराडी नाक्या जवळील अल कुरेशी हॉटेलच्या (लातूर बिर्याणी) बाहेर ठेवलेल्या तंदूर भट्टी शेजारी एक लोखंडी जाळी ठेवली असून तेथून एका वेळी फक्त एक माणूस आत प्रवेश करु शकेल अशी व्यवस्था केली आहे. त्या लोखंडी जाळीलगत जाड कापडाचा गडद रंगाचा अतिशय मळका असा पडदा लावलेला असून त्यामुळे आत लाईट सुरू असला तरीही बाहेरच्या व्यक्तीस आतले काहीच दिसत नाही. त्या पडद्या शेजारी एक सलूनचे दुकान असुन तेथे या जुगार अड्ड्यावरचे शुटर्स (इंन्फॉर्मर्स) बसलेले असतात. ते बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीबाबत आतल्या व्यक्तीस मोबाईल वरुन माहिती पुरवतो. पोलीस येणार असल्याची माहिती मिळाल्यास सर्व जुगारींना पाठीमागच्या बाजुने अथवा इमारतीच्या डाव्या बाजूला असलेल्या गेटने पळवून लावले जाते व शेजारच्या बसक्या रुममधून दिलेला विद्युत पुरवठा खंडित केला जातो.
बाहेरच्या जाळीतून आत जाताना कल्पना येत नाही पण आतला परीसर म्हणजे जणू काही अलीबाबाची गुहाच आहे.
बाहेरच्या रस्त्यावर उभे राहिले तर हॉटेल व सलूनच्या मधली बोळ एक लोखंडी जाळी टाकून बंद केल्याचे दिसते. पण ती जाळी सरकावून आत प्रवेश केल्यावर पडद्यामागे सुमारे 15 40 ची मोठी शेड आहे. त्यालगत डाव्याबाजूला एक 1212 ची रूम आहे. त्यारुमच्या उजव्या बाजूला असलेल्या दरवाजा उघडला की पुन्हा एक सुमारे 15 25 ची रुम आहे. या तीनही रुम मध्ये सर्व प्रकारच्या जुगाराचे टेबल्स लावलेले आहेत. येथे पंखा, खुर्च्या, चहा, पाणी, वगैरेची व्यवस्था केली आहे.या अड्ड्याच्या पाठीमागच्या बाजूला दोन ठिकाणी पळुन जाण्यासाठी जागा केलेली आहे. या जुगार अड्ड्याचे दोनही मालक, जुगार अड्ड्याचे शेजारच्या बैठ्या खोलीत राहात असून सदरचा धंदा हा त्यांचा वडीलोपार्जित जुना धंदा असल्याचे समजते.
गेल्या काही दिवसांपासून सामाजिक सुरक्षा विभागाकडून जुगार धाड सत्र सुरू असल्याने जुगार चालकांनी नविन शक्कल लढवून मोबाईल जुगार सुरू केला आहे. यात जुगार रायटर हा एखाद्या रीक्षात अथवा दुचाकी वर बसून खेळी कडून मटका व रक्कम स्विकारतो. पोलीस कारवाईची थोडी जरी खबर लागल्यास त्याच गाडीवरून पसार होतात. पण आजच्या कारवाईत ज्या दुचाकीवरून मोबाईल मटका खेळला जात होता त्या दुचाकी सुद्धा जप्त करण्यात आली आहे.
सदरची कारवाई श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदीप कर्णिक, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. रामनाथ पोकळे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे व श्री. श्रीनिवास घाटगे, मा. पोलीस उपायुक्त, गुन्हे यांचे आदेश व मार्गदर्शनखाली,
सामाजिक सुरक्षा विभागाकडील व. पो. नि. राजेश पुराणिक,
मपोहवा मोहिते, मपोहवा शिंदे ,पो.ना इरफान पठाण, पोना कांबळे, यांच्या पथकाने केली आहे. विशेष म्हणजे माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आदेशानुसार सदर कारवाई तीन परीक्षा पोलीस उपनिरीक्षक यांचे एक पथकही सहभागी झाले होते

जुगाऱ्यांकडून राजेश पुराणिक यांच्या बदलीसाठी देव पाण्यात ठेवले
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांची बदली कधी होणार… 1 जुलैला नक्की बदली होणार… सरकार बदलले आहे, नक्की बदली होणार… कोण अजबच तर्क लावत आहेत, काय म्हणे, साहेब रिटायर्ट होणार आहेत… संपूर्ण पुणे शहरात जुगार अड्डा मालकांनी राजेश पुराणिक यांचा धसका घेतला आहे. एक एक अटकळी बांधत आहेत.
ही शासनाची यंत्रणा आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या ह्या ठरलेल्या असतात. परंतु जिथे बदली व पदस्थापना दिली जाते तिथे किती अधिकारी, पदाचा अधिकार वापरत असतात हे आपण पाहतच आहोत. दरम्यान शंभरात एक तरी पुराणिक यांच्या सारखे लढवय्ये असतातच.
बदली जेंव्हा होईल तेंव्हा होईल. त्यांच्या बदलीसाठी देव पाण्यात ठेवून बसलेले पुण्यात काही कमी नाहीत हे देखील तितकेच खरे आहे. श्री. राजेश पुराणिक यांच्या बदलीसाठी पुण्यातून विशिष्ठ स्वरूपाची ताकद लावली गेली असल्याचे समजते. थेट महासंचालनालयात जातांना हायकोर्टाच्या कॅन्टीनसह सम्राट पर्यंत कुणी कुणी खलबते केली आहेत त्याची वार्ता आता पसरत आहे. दरम्यान गृहमंत्रालयपर्यंत पाहोचण्याच्या आतच सरकारवर गडांतर आले आहे. आता बदलीसाठी आकांत करणारे देखील राजकीय वाताहत पाहून हवालदिल झाले आहेत. बदली होईल तेंव्हा होईल परंतु पुणे शहर स्वच्छ करण्याचा विडा पुराणिकांनी उचलला आहे एवढं मात्र नक्की.